Maji aaji marathi nibandh, my grandmother essay in marathi माझी आजी मराठी निबंध : आजी ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. घरामध्ये आजी असेल तर घराला शोभा येते, घरात प्रेमाचे वातावरण तयार होते. आजी सर्वांशी प्रेमाने वागते आणि सर्वांनाच त्यांच्या कामात काही न काही मदत करत असते त्यामुळे सर्वांनाच आजीचा हेवा वाटतो.
आजच्या या पोस्टमध्ये majhi aaji marathi nibandh माझी आजी या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. या निबंधातून आजी बद्दल वर्णन आणि ती सर्वांनाच कशी प्रेमाने एकरूप करते याचे यथार्थ वर्णन केलेले आहे. त्यामुळे हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
माझी आजी मराठी निबंध | Maji aaji marathi nibandh (100 words)
माझी आज खूप प्रेमळ, दयाळू आणि शांत स्वभावाची आहे. मला माझी आजी खूप चांगली वाटते. ती कधीही आमच्यावर ओरडत नाही किंवा आम्हाला मारत देखील नाही. माझी आजी मला नेहमी प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजावून सांगते. माझी आजी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. मी माझ्या आजी वर खूप प्रेम करतो.
माझी आजी मला कधी ही रागवत नाही. माझा हातून काही चूक झाली तेव्हा ती मला रागवन्या एवजी प्रेमाने सांगते. आई-बाबा मला रागावले तर माझी बाजू घेते. माझी आजी आईला घरकामात खूप मदत करते. माझी आजी माझी खूप काळजी घेतली. ती नेहमी मला चांगले आणि वाईट त्यांच्यातील फरक सांगते. मला आजी नेहमी राजकुमार आणि राजकुमारी यांच्या गोष्टी सांगते. माझी आजी माझ्यासाठी एक गोष्टीचे पुस्तक आहे.
माझी आजी मराठी निबंध | Maji aaji marathi nibandh (300 words)
आजी ही तर आपल्या मैत्री सारखी असते आपल्या मनातलं सर्व काय आपण तिच्याजवळ बोलू शकतो. ती आपल्याला प्रत्येक संकटांमध्ये किंवा दुःखांमध्ये आपल्या सदैव पाठीशी उभी असते. मी माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट, समस्या सर्वात अगोदर माझ्या आजीला सांगतो ती मला त्या समस्येवर उत्तम तोडगा सांगते, तिने सांगितलेला तोडगा माझ्यासाठी नेहमीच मोलाचा ठरतो.
हळव्या मनाला माझ्या समजून घेणारी, जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहचविणारी अशी माझी आजी आहे. तिने पाचवी पर्यंत शिक्षण घेतले आहे असे ती सांगते पण ती अजूनही गणितामध्ये खूपच हुशार आहे. ती दैनंदिन व्यवहारातील गणिते अगदी काही क्षणात बोटावर मोजून च करते, त्यामुळे मला तिचे खूप नव्वल वाटते. ती मला नेहमी शिक्षणाचे महत्व पटवून सांगते आणि खूप शिकून मोठा साहेब हो असा आशीर्वाद देखील देते.
आजी मला नेहमी तिच्या बालपणीचे किस्से सांगत असते, ते ऐकण्यात मी खूप गुंग होतो तसेच त्या काळातील हलाखीची परिस्थिती पाहून मन अत्यंत दुःखी देखील होते. तिने मला अनेक सुंदर कविता आणि ओव्या शिकवल्या आहेत.
आजीचे नाव सुखाच्या प्रत्येक क्षणात असावं. आजी म्हणजे घरातील सौंदर्य असते. कुटुंबाला आपल्या नातवंडा ती खूप प्रेम करते. आजी आपल्यावर चांगले संस्कार करते. आपल्यावर आधी संस्कार आजी-आजोब करतात आणि नंतर आपले आई वडील. माझ्या आजीच्या हाताला खूप चव आहे. तिने बनवलेलं जेवण मी खूप आवडीने खातो. माझी आजी मला दरोज नवीन पदार्थ करुन देते. त्यामुळे माझी आजी मला खूप आवडते.
माझी आजी मराठी निबंध | Maji aaji marathi nibandh (500 words)
मी लहान असताना शाळेत जायचो तेव्हा माझी आजी मला पैसे किव्हा गोड खाऊ द्यायची. मला माझी आजी गप्पा मारायला खूप चांगले वाटते. मी नेहमी आजी सोबत गप्पा मारत बसतो. मला आजी नेहमी तिच्या बालपणीच्या गोष्टी व अनुभव सांगायची.
तिने बालपणी खूप हलाखीचे जीवन जगले आहे, त्यावेळी दोन वेळेचे जीवन देखील मिळायचे नाही असे ती सांगते. त्यामुळे आजीने लहानपणी खूप हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत. ती आम्हाला नेहमी अन्नाचा आदर करायला सांगते.
जेवण उष्टे सोडले तर आमच्यावर खूप ओरडते. तिचे म्हणणे आहे अन्न हे पूर्णब्रह्म असते त्यामुळे त्याचा आदर करायला हवा. तिच्या गोष्टीतून आणि आणुभवातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
माझी आजी सकाळी लवकर उठते. सर्वात अगोदर अंघोळ करते. अंघोळ झाल्यानंतर ती देवपूजा करते आणि मग आईला घर कामात भरपूर मदत करते. तसेच आईला स्वयंपाकात नवे जुने पदार्थ बनवायला शिकवत अ सते. माझ्या आजीच्या हाताला खूप चव आहे, तिने बनवलेले जेवण मला खूप आवडते.
शेजऱ्याना आणि घरातील सदस्यांना आजीचा खूप आधार वाटतो. ती सर्वांच्याच हाकेला धावून जाते. ती कोणत्याही समस्येवर उत्तम तोडगा काढते त्यामुळे घरातील सर्वजण कोणत्याही कामात आजीचा सल्ला नक्की घेतात.
तसेच माझी आजी आमच्या घरातील वैद्य देखील आहे. तिला प्रत्येक आजारावर घरगुती उपाय माहिती आहे. त्यामुळे घरात कुणी आजारी पडले तर ती त्याला आयुर्वेदिक औषध देते, त्यामुळे तो लगेच बरा होतो. मला वाटते की आजीचा आशीर्वाद आम्हाला सर्व दुःखा पासून दूर ठेवतो त्यामुळे सर्वजण आजीचा आशीर्वाद नक्की घेतात.
माझे बाबा तर नियमित कामाला जाण्यापूर्वी आजीचा आशीर्वाद घेतात. माझी आजी आमच्या सोबात नेहमी वेळ घालवते. ती श्रीकृष्णाची खूप मोठी भक्त आहे, नेहमी देवाचे नाव घेते. नेहमी देवाचे नाव घेण्यात यावे म्हणून तिने घरातील सर्व लेकरांची नवे देवाची ठेवली आहेत. आमच्या कुटुंबातील सर्वांनाच आजीचा खूप हेवा वाटतो.