प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा विकास करून आपले दैनंदिन जीवन सुखी तर केले पण यामुळे त्याचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

आज प्रदुषण ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे या विषयावर शालेय विद्यार्थ्यासाठी नक्कीच निबंध लिहिण्यासाठी प्रश्न असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी प्रदुषण एक समस्या मराठी निबंध किंवा प्रदुषण वर मराठी निबंध essay on pollution in marathi या विषयावर सुंदर निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे .

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi

Essay on pollution in marathi
प्रदुषण एक समस्या मराठी निबंध

प्रदुषण ही निसर्गाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. आज मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा जो र्हास होत आहे त्याला कारणीभूत म्हणजे हे प्रदुषण आहे. अतिशय सुंदर असणारा निसर्ग आज या प्रदुषण रुपी आजाराने जडला आहे. पण प्रदुषण म्हणजे नेमकं काय ?

हवेत, पाण्यात, वातावरणात असे काही घटक स्थिरावतात की ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. पर्यावरणाचे संतुलन बिगडवणाऱ्या सर्व घटकांना प्रदूषके असे म्हटले जाते आणि यापासून च प्रदुषण (essay on pollution in marathi) निर्माण होते. आज घडीला प्रदूषणाची मुख्य तीन प्रकार आहेत ते म्हणजे जल प्रदुषण, ध्वनी प्रदुषण आणि हवा प्रदुषण.

मानवाने विकासाच्या हवसापोटी अनेक संशोधन केले, शोध लावले, नवीन तंत्रज्ञान विकसित केले मात्र त्याचबरोबर निसर्गाचा देखील तेवढाच अपव्यव केला. कारखाने, फॅक्टरी, दवाखाने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली. रस्त्याकाठची झाडे तोडून रस्ता रुंदीकरण केले, मोठे मोठे राष्ट्रीय महामार्ग बांधले.

त्यामुळे वनांचे प्रमाण कमी झाले. झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांची, प्राण्यांची निवस्थाने नष्ट झाली. कित्येक पशू पक्षी दुर्मिळ झाले. पूर्वी मोठ्या संख्येने नियमित दिसणारे पशू पक्षी आज क्वचितच पाहायला मिळत आहेत, ते देखील केवळ अभयारण्यात ! आता जंगलेच उरली नाहीत तर बिचारे पशू पक्षी तरी कसे जगतील ?

झाडे तोडल्यामुळे आणि पशू पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने निसर्गाचे चक्र कोलमडले. पूर्वी नियमित पडणारा पाऊस आज क्वचितच पडत आहे. दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. त्सुनामी, चक्री वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली आहे.

झाडे कमी झाली, पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढून ग्लोबल वॉर्मिग सारखी जागतिक समस्या निर्माण झाली आहे.

मानवाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट शक्य झाली आहे. जग अगदी जवळ आले आहे. प्रत्येकाचे हातात मोबाईल आहेत हवे तेंव्हा जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे शक्य आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धती आली त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शाळा, महाविद्यालये करणे, ऑनलाईन अभ्यास करणे , हवी ती माहिती मिळवणे शक्य झाले आहे. पण मोबाईल हे विकसित तंत्रज्ञान पशू पक्ष्यांच्या जीवावर उठले आहे. या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाहीत.

मोबाईल आणि मोबाईलच्या टॉवर मधून निघणाऱ्या आत्मघाती सिग्णलमळे कित्येक पक्षी त्यांचे आयुष्य संपवत आहेत. याच कारणाने आज पक्ष्यांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर एकदिवस सर्व पशू पक्षी नष्ट होतील.

आज ज्याप्रमाणे आपण डायनासोर ची चित्रे पाहून कल्पना करतो की पूर्वीच्या काळी अश्या प्रकारचा डायनासोर नावाचा एक प्राणी अस्तित्वात होता. त्याचप्रमाणे जर पक्षीच उरले नाहीत तर येणाऱ्या पिढीला पक्षी केवळ चित्रात पाहायला मिळतील. भविष्यात खूपच भयावह परिस्थिती ओढवू शकते.

मानवाने दळणवळणाच्या पद्धतीमध्ये देखील खूप विकास केला. बैलगाडी, घोडागाडी यासारखी पूर्वीची दळणवळणाची साधने संपुष्टात येऊन त्यांची जागा आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त वाहनांनी घेतली आहे. यामुळे दळणवळण नक्कीच सोयीचे आणि सुलभ झाले आहे. आज या तंत्रज्ञानामुळे जगाला वळसा घालने देखील शक्य आहे.

पण आज याच दळणवळणाच्या साधनांमुळे कित्येक समस्या देखील निर्माण केल्या आहेत. मोटारसायकल, कार, चारचाकी वाहने यामध्ये डिझेल, पेट्रोल यासारख्या इंधनाचा वापर केला जातो. ही इंधने ज्वलणातून कार्बन डायऑक्साइड (CO२), कार्बन मोनॉक्साईड (CO) यासारखी विषारी आणि घातक वायू बाहेर सोडतात.

त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढून उष्माघाताचा समस्या निर्माण होतात. याच कारणामुळे तपांबर आणि स्थितांबर यासारख्या पृथ्वीच्या आवरणात आढळणारा ओझोन चा थर पातळ होत आहे.

त्यामुळेच सर्याकडून येणारी अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर पडत आहेत. त्यामुळे अनेक सजीवांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय यामुळे सजीवांना त्वचेचे रोग देखील होत आहेत. आम्ल पर्जन्य ही देखील यातूनच उद्भवणारी एक समस्या आहे.

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi (भाग २)

Essay on pollution in marathi
प्रदूषण वर मराठी निबंध

जल प्रदुषण ही देखील आज घडीला उपस्थित सर्वात भयानक समस्या आहे. यामुळे पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण कमी तर झालेच आहे शिवाय जे पाणी उपलब्ध आहे ते देखील पिण्यायोग्य राहिले नाही.

मानवाने स्वताच्या विकासापोठी निसर्गाची पर्वा केली नाही. शहरातील सांड पाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी द्रव्य, शहरातील घाण सर्रास नदीत, तलावात सोडून दिली. त्यामुळे जलिय प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा यासारखे विविध आजार निर्माण झाले. आज घडीला जल प्रदुषण ही मानवासमोरील सर्वात मोठी समस्या आहे.

शिवाय गाड्यांच्या हॉर्न चा आवाज , कारखान्यातून निर्माण होणारा कर्कश आवाज यापासून निर्माण होणारे ध्वनी प्रदुषण (essay on pollution in marathi) ही देखील सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी समस्या अस्तित्वात आहेच की !

मानवाने खूप विकास केला, माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचला. पण मानवाने निसर्गाचा विचार करायला हवा होता. तो जशी स्वतःची काळजी घेतो तसेच त्याने निसर्गाला देखील जपायला हवे होते. निसर्गातील साधन संपत्तीचा जपून वापर करायला हवा होता. नाहीतर आज या प्रदूषणामुळे समस्या निर्माण झाल्याचं नसत्या !

मानव आजही परिस्थिती बदलवू शकतो, झालेल्या चुका सुधारू शकतो. झाडे लावून, पशू पक्ष्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखू शकतो. पण विकासाच्या मटक्यात आडकलेला मनुष्य या गोष्टी लक्षात घेईल का ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

पण जर निसर्गाचा समतोल राहिला नाही तर भविष्यात पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाला नक्कीच धोका आहे, हे देखील माणसाने लक्ष्यात ठेवायला हवे !

मला शेवटी येवढेच म्हणावेसे वाटते –

काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे !

टीप : विद्यार्थि मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

तुम्हाला प्रदुषण वर निबंध essay on pollution in marathi हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच इतर कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध लिहून हवा असेल तर ते ही कमेंट करून सांगा, धन्यवाद…!

Leave a Comment