माझी आई निबंध मराठी | My mother essay in marathi

My mother essay in marathi माझी आई निबंध मराठी : आई हा शब्द उच्चारला की मनात वात्सल्याचा पाझर फुटतो. आई म्हणजे अगदी देवाचे स्वरूप. असे म्हटले जाते की देव सर्वच ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही त्यामुळे त्याने आईची निर्मिती केली. खरोखरच आईची महिमा अगाध आहे. ती आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक संकटात आपल्या सोबत असते. आपल्यावर खूप प्रेम करते आणि आपले लाड देखील पुरवते. त्यामुळे आई सर्वांना खूप आवडते.

आजच्या या पोस्टमध्ये माझी आई निबंध, माझी आई वर निबंध मराठी लिहून दिलेला आहे. हा निबंध १००,३०० आणि ५०० अश्या वेगवेगळ्या शब्दात लिहून दिलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हा निबंध वापरू शकता. हा निबंध अत्यंत सुंदर शब्दात लिहून दिलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल.

माझी आई निबंध मराठी १०० शब्दात | My mother essay in marathi in 100 words

मातृदेवो भव हे आपल्या भारतीय संस्कृतीत गायलेले आईचे वर्णन आहे. आई म्हणजे देवाचे रूप. आई हा शब्द खरोखरच खूप अनमोल आहे. आई या शब्दात दोन अक्षरे आहेत. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशी आई या शब्दाची फोड केली जाते. असे म्हणतात की आईची माया ही दगडाला ही पाझर फोडू शकते. येवढे जास्त प्रेम आहे ही आपल्या मुलांवर करत असते.

आई म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रेमाचे स्थान आहे. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती आमच्या घरासाठी खूप कष्ट करते. घर स्वच्छ ठेवते. तिचा चेहरा खूप हसरा आहे. ती सर्वांशी प्रेमाने वागते. आई या शब्दात नभा इतके सामर्थ्य दडलेले आहे. आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके आहे. सर्व देवात आई हे दैवत मोठे आहे.

माझी आई निबंध मराठी २०० शब्दात | My mother essay in marathi in 200 words

आई या शब्दात संपूर्ण विश्व समावले आहे. आई हे एक अशी व्यक्ती आहे तिची तुलना शब्दात केली जाऊ शकत नाही. माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही उठण्यापूर्वी तिने स्वयंपाक घरातली कामे आवरलेली असतात. नंतर आम्ही उठल्यानंतर आम्हाला चहा, नाश्ता देते. आमच्यासाठी रोज आवडीचे जेवण बनवते. सर्वांची खूप काळजी घेते.

सर्वांच्याच आयुष्यातील पहिला गुरू म्हणजे आपली आई असते. ती आपल्या जन्मापासून आपल्यावर संस्कार करते. कसे वागायचे, कसे राहायचे शिकवत असते. माझी आई देखील मला नेहमी चांगल्या सवयी शिकवते. ती मला सकाळी लवकर उठवते, स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायला सांगते. ती नेहमी मोठ्यांचा आदर करायला सांगते.

आईची तुलाना जगात कोणाशीही करता येणार नाही अशी आपली आई असते. आई पुढे स्वर्गातले महात्मे कमी आहे. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आईची माया कधीच आटत नाही.

माझी आई निबंध मराठी ३०० शब्दात | My mother essay in marathi in 300 words

आई थोर गुरु आहे. म्हणून तर बापूजी म्हणतात एक आई 100 गुरुहूनही श्रेष्ठ आहे. लहान मुलाच्या तोंडातून पहिला शब्द येतो तो म्हणजे आई. मुलांच्या जन्मापासून ते स्वतःच्या पायावर उभे राही पर्यंत त्यांच्या सुखदुःखात उभी राहणारी ती म्हणजे आई असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले आहे.

आईबद्दल आपणा सर्वांना आदर आहे. जेव्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रत्येक क्षणाला आईच आपल्याला कठीण परिस्थितीमधून बाहेर काढते. म्हणून सगळ्यांना आपली आई खूप प्रिय असते.

आईची ममता कधी कमी पडत नाही घरांमध्ये कठीण प्रसंग येतो तेव्हा ती आईच असते जी तिचं सुख सोडून आपल्याला आनंदी ठेवते. ती स्वतःचा कधीच विचार करत नाही. आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेल्या संस्कारामध्ये आईचा खूप मोठा वाटा असतो . आई नेहमी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते.

माझी आई निबंध मराठी ५०० शब्दात | My mother essay in marathi in 500 words

आई ही ममता आणि वात्सल्याची स्वरूप आहे. आईसारखे दैवत कुठेही नाही. ती प्रत्येकाच्या जीवनातील एक वरदान आहे. तिच्या आशीर्वादानेच आपण घडलो. आई बद्दल सांगायचं झालं तर शब्द कमी पडतात. माझी आई खूप प्रेमळ आहे. माझी आई खूप शांत आहे. आई हा शब्द किती गोड आहे. जिच्या उदरातून आपण जन्म घेतला आहे.

प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपली आई, जी माऊली फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर मिळाली तर आपल्या मुलांसाठी जीवाचं राण सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही. या जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती अशी असते जी सगळ्यांपेक्षा 9 महिने जास्त आपल्याला ओळखत असते ती म्हणजे आपली आई. आकाश आणि ईश्वराचे एकत्रीकरण असलेला शब्द म्हणजे आई होय. तिच्या एवढी काळीजी करणारा आपल्या जीवनात कोणीच नाही.

आईच्या रूदयात आपल्या मुलांसाठी जे प्रेम असते ते न मोजता येणार प्रेम असतं. आईचं प्रेम हे इतरांच्या प्रेमापेक्षा खूप मौल्यवान असतं. आपण खुप नशिबवान आहोत आपल्याला आईचं प्रेम मिळालं आहे.

माझी आई मनाने खूप शांत आणि प्रेमळ आहे. ती भल्या पहाटे उठून कामाला लागते, घरातील सर्व कामे आवरते. तिला स्वच्छता खूप आवडते. त्यामुळे ती नेहमी आमचे घर आणि घराचे अंगण स्वच्छ करत असते. तिला घरात घरात कचरा केलेला मुळीच आवडत नाही. त्यामुळे ती कित्येक वेळा माझ्यावर ओरडते देखील.

माझी आई जरी मनाने खूप शांत असली तरी ती वेळे प्रसंगी खूप कठोर देखील होते, कधी कधी शिक्षा देखील करते. पण तिच्यामुळेच मला आज सर्व चांगल्या सवयी लागल्या आहेत. ती नेहमी स्वच्छ राहायला शिकवते. मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी आदराने बोलायला सांगते. माझ्याकडून गृहपाठ देखील करवून घेते.

माझ्या आईला खूप छान स्वयंपाक बनवता येतो. ती रोज आमच्यासाठी नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते. तिने बनवलेले सर्व पदार्थ आम्हाला खूप आवडतात. माझी आई माझी खूप काळजी घेते. मला माझी आई खूप आवडते.

Leave a Comment