सूर्य उगवला नाही तर…मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh :- सूर्य हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक अनमोल रत्न आहे. त्याच्या असण्यानेच आज पृथ्वीवर सजीव सृष्टी जगणे संभव आहे. पण जर सूर्य उगवला नाही तर…सूर्य नसता तर….असा विचार करणे देखील खूप भयानक आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh हा निबंध लिहून दिलेला आहे. हा एक वैचारिक निबंध आहे. यातून विद्यार्थांची वैचारिक क्षमता तपासली जाते. या प्रकारचे निबंध हमखास परीक्षेत विचारले जातात.
सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh
एके दिवशी रात्री मला अचानक झोपितुन जाग आली. मला वाटले सकाळ झाली असावी म्हणून मी खिडकी उघडून पाहिली तर काय बाहेर पूर्ण काळोख होता. मी पुन्हा निपचित पडून राहिलो पण झोप मात्र लागता लागणा. त्यामुळे मी खिडकीच्या बाहेर पाहत असताना अचानक माझ्या मनात प्रश्न पडला की जर सूर्य उगवला नाही तर / सूर्य नसता तर किंवा सूर्य संपावर गेला तर…मी विचार करू लागलो.
सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh (५०० शब्दात)
जर सूर्य उगवला नाही तर खूप मज्जा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही. लवकर आवरून शाळेत जाण्याची कटकट नाही. शाळा नाही म्हटल्यावर गृहपाठ देखील पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.
बेडवर मनसोक्त झोपता येईल. कंटाळा येत नाही तोपर्यंत बेडवर निपचित पडून राहता येईल. आई बाबा कुणीही लवकर उठ म्हणून आग्रह करणार नाही. घरातील कामे करावी लागणार नाहीत.
सूर्य जर उगवला नाही तर बाहेर पूर्ण अंधार असेल. त्यामुळे कुणीही दुकानावर जाऊन काही आणण्यासाठी बाहेर पाठवणार नाही. आई बाबा कुठलेही काम सांगणार नाहीत. बेडवर बसून मनसोक्त मोबाईल पाहता येईल. मोबाईलवर हवा तेवढा वेळ गेम खेळता येईल. टीव्ही पाहता येईल. कॅरम, लुडो, सापशिडी यासारखे गेम खेळता येतील.
सूर्य उगवला नाही तर बाबा ऑफिसला जाणार नाहीत. ते घरीच आराम करतील. सर्व परिवार एकत्र घरीच असेल. सर्वांसोबत खेळायला, मोज मस्ती करायला खूप मज्जा येईल. एकत्र मिळून टीव्ही वर सिनेमा पाहता येईल, आईच्या आवडत्या सीरियल पाहता येतील.
बाहेर खेळायला बोलवायला मित्र येणार नाहीत. त्यादिवशी वर्तमानपत्र देखील येणार नाहीत. खेळाचे मैदान एकटे पडेल. सर्व लोक आपापल्या घरात आराम करतील. कुणीही घराच्या बाहेर पडणार नाही. सूर्य उगवला नाही तर हे सर्व चांगले परिणाम होतील पण त्याबरोबरच खूप सारे दुष्परिणाम देखील भोगावे लागतील.
सूर्य हा पृथ्वीवरील एकमेव ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे सूर्य जर उगवला नाही तर पृथ्वीवर कधीही दिवस उजाडनार नाही. सर्वत्र काळोख पसरेल. उजेडाचा एक किरनही पृथ्वी पर्यंत येणार नाही. सर्वत्र हाहाकार माजेल.
झाडांना वेलींना सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्यामुळे झाडे वाळून जातील. शेती पिकणार नाही, शेत शिवारे ओसाड पडतील. शेतकरी हताश होईल. सूर्यप्रकाश नसल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. पाऊस पडणार नाही. नद्या नाले ओसाड पडतील. पृथ्वीवरील पाण्याचे आणि अन्नाचे स्रोत नष्ट होतील.
पाणी आणि अन्नावाचून पशू पक्षी, प्राणी, जनावरे, गाई गुरे मृत्यू पावतील. संपूर्ण पृथ्वी ओसाड पडेल. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल. माणूस देखील राहणार नाही.
त्यामुळे जर सूर्य उगवला नाही तर (surya ugavla nahi tar marathi nibandh) असा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो. असा विचार करणे देखील खूप भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे सूर्य नसेल तर पृथ्वीवर कुणीही उरणार नाही. पाणी आणि अन्न न मिळाल्याने सर्वच सजीव सृष्टी संपुष्टात येईल.
सजीवाच्या अस्तित्वासाठी सूर्याचे असणे फार गरजेचे आहे. तो असेल तरच वनस्पती जगू शकतील, प्रकाश संशलेशन प्रक्रियेद्वारे अन्नघटक तयार करू शकतील, शेती पिकुन माणसांना अन्न धान्य मिळू शकेल.
सूर्य असेल तरच पाण्याचे बाष्पीभवन होईल, पाऊस पडू शकेल, सजीवसृष्टी ला पिण्यासाठी, झाडांना वनस्पतींना जगण्यासाठी पाणी मिळू शकेल.
सूर्य आहे म्हणूनच पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे जर सूर्य उगवला नाही तर किंवा सूर्य नसता तर पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टी संपुष्टात येऊन पृथ्वी ओसाड पडेल. पृथ्वीवर भयावह परिस्थिती ओढवेल.
टीप : विद्यार्थि मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला सूर्य उगवला नाही तर surya ugavla nahi tar marathi nibandh, सूर्य नसता तर किंवा सूर्य संपावर गेला तर या विषयावर वैचारिक निबंध लिहून दिलेला आहे.
जर surya ugavla nahi tar काय बदल होतील, पृथ्वीवर कश्याप्रकारे भयावह परिस्थिती ओढवेल याचे स्पष्ट विश्लेषण या निबंधाच्या माध्यमातून केलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमचे विचार देखील समाविष्ट करा जेणेकरून निबंध परिपक्व बनेल आणि तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळतील.
इतर एखाद्या विषयावर तुम्हाला निबंध हवा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा , धन्यवाद…!
हे निबंध देखील अवश्य वाचा :
- मी शिक्षक झालो तर मराठी निबंध
- नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध
- पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध