माझे बाबा मराठी निबंध | My father essay in marathi

My father essay in marathi माझे बाबा मराठी निबंध, माझे बाबा निबंध, माझे वडील निबंध: बाबा म्हणजे सर्वांच्याच घरातील आधार स्थंभ आणि सर्वांच्यात आयुष्यातील सुपर हिरो असतो. त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या बाबांचा म्हणजेच वडिलांचा खूप हेवा वाटतो. बाबाच घरातील सर्व व्यवहार सांभाळतात, घरात आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट बाबाच उपलब्ध करून देतात. बहुदा बाबा मनाने कठोर जरी असले तरी त्यांच्याविषयी सर्वांच्याच मनात आदर आणि प्रेम असते.

शाळेत असताना माझे बाबा निबंध लिहायला असतो, तुम्हाला तुमच्या बाबा बद्दल ३०० – ५०० शब्दात निबंध लिहायला सांगितला जातो. त्यामुळे या पोस्टमध्ये आम्ही माझे बाबा या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल !

माझे बाबा मराठी निबंध १०० शब्दात | My father essay in marathi in 100 words

बाबा म्हणजे परिवाराचा आधार स्तंभ किंवा घरातील मजबूत पाया. बाबांबद्दल बोलणे झाल तर शब्द कमी पडतात. त्यांचे माझ्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. आज मी जे काही आहे तो फक्त माझ्या बाबा मुळेच आहे. त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आजही माझ्या सोबत आहे आणि त्यामुळेच आज मला समाजात मान आणि सम्मान मिळत आहे.

जीवनात आईप्रमाणेच बाबांचे देखील खूप महत्त्व आहे. बाबा हे शिस्तप्रिय आणि कडक असले तरी ते मनाने खूप चांगले असतात. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. घरातील सगळी जबाबदारी ही माझ्या बाबांवर असते. मी माझ्या बाबावर खूप प्रेम करतो आणि माझ्यावर बाबाही तेवढेच प्रेम करतात. आमच्या दोघांचे नाते अत्यंत घट्ट आणि अतूट आहे. बाबांनी मला रागावले तरी मी कधीही बाबांचा राग धरत नाही.

माझे बाबा मराठी निबंध २०० शब्दात | My father essay in marathi in 200 words

संध्याकाळच्या जेवनांची चिंता करते ती आई आणि संपूर्ण जीवनाची चिंता करतात ते बाबा असतात. आपले बाबा हे असेच असतात जे आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलाबाळांची इच्छा पूर्ण करण्यात घालवतात. ते आपले प्रत्येक हट्ट पुरवतात. पण ते स्वतः मात्र साधेच राहतात. स्वतःसाठी कुठलीच वस्तू खरेदी करत नाहीत.

आपण पडलो, ठेच लागली की लघेच आपण आई ग असे म्हणतो. आणि जर आपल्या जवळ एखादे जड ओझे दिली तर आपण बाप रे किती जड आहे असे म्हणतो. छोठे संकट आले की आपल्याला आई आठवते आणि मोठे संकट आले की नेहमी बाबाच आठवतात.

लहानपणी आपल्या हाताला धरुन जे चालायला शिकवतात ते बाबा असतात. माझे वडील शेती व्यवसाय करूनच माझे पालनपोषण करतात. ते स्वतः कष्ट करून परिवाराला सुखी ठेवतात. कुटुंबाच्या आनंदातच त्यांचा आनंद असतो. आपले बाबा आपल्याला ओरडतात कारण आपण आपल्या जीवनामध्ये काही चांगले करावे म्हणून.

माझे बाबा मराठी निबंध ३०० शब्दात | My father essay in marathi in 300 words

सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी माझे बाबा आहेत. माझ्या जीवनात बाबांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. माझे बाबा शेतकरी आहेत. माझे बाबा माझा एक चांगला मित्र आहे आणि चांगले मार्गदर्शक देखील. माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत असतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन देखील करतात. त्यांच्यामुळेच आज मी एका चांगल्या ठिकाणी कार्यरत आहे.

माझ्यासाठी मूल्यवान रत्न म्हणजे माझे बाबा आहेत. बाबांनी दिलेले संस्कार आणि शिक्षण एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी मला प्रेरणा देतात. माझे बाबा सकाळी लवकर उठतात आणि आम्हालाही उठतात. आम्हाला व्यायाम करायला सांगतात आणि स्वतःही करतात. ते निरोगी शरीरासाठी नेहमी प्रयत्न करतात. आम्हाला बाहेरचे रस्त्यावरील खाद्य पदार्थ खायला मना करतात.

लहानपणापासूनच काही झाले की आई आपल्याला सांगते की हे करू नको ते करू नको नाही तर मी बाबांना सांगते. असे आपली आई आपल्याला नेहमी म्हणत असते. बाबा ओरडतील या भीतीने आपण कधीही वाईट काम करत नाहीत. सर्वांप्रमाने मी देखील माझ्या बाबांना खूप घाबरतो. ते मनाने खूप शांत आणि प्रेमळ जरी असले तरी वेळे प्रसंगी तेवढेच कठोर देखील होतात.

माझे बाबा माझे सर्व हट्ट पुरवतात. कोणी वडिलांना बाबा, पप्पा, असे म्हणतात. मी माझ्या बाबांना पप्पा असे म्हणतो. आपले वडील हे नेहमी आपल्या भविष्याचा विचार करत असतात. त्यांना नेहमीच वाटत असते की आपल्या मुलाने खूप शिकावे आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करावी. त्यासाठी ते लहानपणापासूनच आपल्याला मार्गदर्शन करत असतात.

माझे बाबा मराठी निबंध ५०० शब्दात | My father essay in marathi in 500 words

माझे वडील हे माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहेt. मला त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवायचे आहे. सतत घरच्यांच्या सुखासाठी झटणारे, घरच्यांची काळजी घेणारे, सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन त्याचा आदर करणारे असे माझे बाबा आहेत. पण कोणत्याच गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहू नये असे ते नेहमी म्हणतात.

आईची माया ही जीवनात स्नेह आणि प्रेम निर्माण करत असते तर वडिलांची माया ही जेवण घडवत असते. आपले आई-वडील आपल्यावर नेहमी चांगले संस्कार करतात. आई म्हणजे जिने आपल्याला जन्म दिला हे सुंदर जग दाखवले आणि आपले बाबा हे आपले जीवन सुंदर आणि सफल होण्यासाठी कष्ट करतात.

माझे बाबा हे खूप शिस्तप्रिय आहेत. ते नेहमी मला शिस्त शिकवतात आणि माझ्याकडून नेहमी शिस्त पाळण्याची आशा ठेवतात. घरी येणाऱ्या प्रत्येक वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायला शिकवतात. मी माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींची प्रशंसा करतो त्या व्यक्ती म्हणजे माझे आई-वडील आहेत.

मला माझ्या आईवडिलांविषयी खूप गर्व आहे. मी माझे नशीब खूप चांगले समजतो कि माझ्या आयुष्यात मला असे आई-वडील मिळाले. चांगले कुटुंब मिळाले. माझे माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे. माझे बाबा मला खूप खूप आवडतात.

Leave a Comment