माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ऋतूंचा देश” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडीचा असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात वेगवेगळ्या शब्दात दोन तीन निबंध लिहिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्हाला नक्कीच आवडतील.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (१०० शब्दात)

Essay on rainy season in marathi
माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध

भारत देशामध्ये तीन ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. मलाही पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

या ऋतूमध्ये दिवसभर खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी थंड आणि आल्हादायक असते. आकाशात काळे ढग थैमान घालून असतात आणि ते सतत गर्जत असतात. या दिवसातील पाऊस सर्वानाच हवा हवासा असतो.

प्रत्येकजण आपापल्या परीने पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात. यात केवळ बालकेच नव्हे तर अगदी वृध्द देखील आपला आनंद व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. पशु – पक्षी, झाडे झुडपे सर्वजण या पावसात न्हावून निगतात. सगळीकडेच खूप आनंदाचे वातावरण असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (२०० शब्दात)

मला सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. याचे कारण म्हणजे मला पावसामध्ये भिजायला खूप आनंद मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसात मी सतत भिजत उड्या मारून माझा आनंद व्यक्त करत असतो.

पण यामुळे मला कित्येक वेळा सर्धी देखील होते. पण मला याची काहीच फिकीर नसते. मी तरीसुद्धा पावसाळ्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतो.

पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा हा ऋतू असतो. त्यामुळे सर्वत्र उन असते आणि प्रत्येक ठिकाणी खूप गर्मी देखील होत असते. या दिवसात तापमान पन्नासी गाठते. वातावरण खूप तापलेले असते. जीवाची अगदी लाही लाही होत असते. शिवाय सर्वत्र पाणी टंचाई ही देखील एक मुख्य समस्या असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटते लवकर पाऊस पढावा आणि वातावरणातील गर्मी निघून जावी. वातावरण अगदी थंड होऊन जावे. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी. यासाठी प्रत्येक मनुष्य पावसाची आत्मत्तेणे वाट पाहत असतो.

केवळ मनुष्यच नव्हे अगदी पशू पक्षी देखील या गर्मीला त्रासलेले असतात. ते देखील पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत असतात. कोकिळा त्याच्या मंजुळ आवाजात पाऊस पडावा यासाठी गायन करत असतो. शिवाय त्याच्या संगतीला सुंदर मयुरनृत्य करणारा मोर देखील साथ देत असतोच की.

भारत देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. यात संपूर्ण धरती नहावून निघते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील गर्मी निघून जाते आणि वातावरण थंड आणि आल्हादायक बनते. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (३०० शब्दात)

भारत देशात पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो आणि तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपतो. हा ऋतू उन्हाळा ऋतूच्या नंतर येणारा ऋतू आहे. उन्हाळा ऋतूमध्ये उन आणि गरमी यामुळे लोकांची खूप तगमग होते. त्यामुळे प्रत्येक जण या गरमी पासून सुटका करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या आधी पासूनच लोकांची पावसाळा ऋतुसाठी तयारी सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. रंगीबेरंगी छत्र्यांचे, रेनकोट चे बाजारात मोठेमोठे स्टॉल लागतात.

मी देखील माझ्या बाबसोबत बाजारात छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी जातो. आम्ही घरातील सर्व सदस्यासाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट विकत घेतो. मला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी पिवळ्या रंगाची छत्री माझ्यासाठी विकत घेतो.

मिर्गाचा पहिला पाऊस पडला की सर्वांचीच तहान भागते, सर्वांच्याच पाण्याचा प्रश्न मिटतो. संपूर्ण धरणी पहिल्या पावसात भिजून निघते. असे म्हणतात की चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पिवून जगतो. त्यामुळे चातकाची तहान भागते. रानावनात मोर नाचताना दिसून येतात.

पावसाळा ऋतूमध्ये पहिला पाऊस पडला की सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंद व्यक्त करू लागतात. लहान मुले पावसाच्या पहिल्या सरी बरसत असताना पाण्यात उड्या मारतात, नाचतात. आई वडील ओरडले तरी ते ऐकत नाहीत. ते आपल्याच धुंदीत असतात.

पहिल्या पावसाचा आनंद केवळ लहान मुलेच घेत नाहीत तर यात प्रौढ व्यक्तींचा देखील समावेश असतात. पशु पक्षी, झाडे देखील आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात.

भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव पार पाडतात. लोक या सणातून मेघराजाची पूजा करतात, त्याला खूप खूप धन्यवाद देतात आणि संपूर्ण पावसाळा असाच बरसत राहा अशी त्याला विनंती देखील करतात.

पावसाळा ऋतुमधिल वातावरण खूपच प्रसन्न असते शिवाय अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. त्यामुळे खूप लोकांना पावसाळा ऋतू आवडतो. मी देखील पहिल्या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच तो कधी दुःख देखील आणतो. या ऋतूमध्ये कधी पाऊस इतका जास्त पडतो की अगदी नद्यांना पुर येतो, पाणी गाव शहरात शिरते, शेतातील पिके वाव्हून जातात, घरे बुडतात, रस्ते बंद पडतात, वाहतूक ठप्प पडते, यात अनेक माणसे, पशू पक्षी आपला जीव देखील गमावतात.

हे पावसाचे रुद्र रूप खूपच भयानक असते. अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणत वित्त हनी तर होतेच शिवाय काही प्रमाणात जीवित हनी देखील होते. याच कारणामुळे कित्येक लोकांना हा ऋतू नावडता देखील आहे.

पण निसर्ग नेहमीच असे रुद्र रूप धारण करत नाही. निसर्ग जेंव्हा कोप करतो तेंव्हा त्याचे असे रुद्र रूप पाहायला मिळते. मला मात्र लहानणापासूनच हा ऋतू खूप आवडतो, या ऋतूमध्ये बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरित आपला आनंद व्यक्त करावासा वाटतो. त्यामुळे मी दरवर्षी पहिल्या पावसात मनसोक्त भिजतो.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (५०० शब्दात)

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीसाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त असते. शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. नदी, तलाव, धरणे ही जरी शेतीला वापरण्यात येणारी पर्यायी स्रोत असली तरी ते संपूर्ण वर्षभर उपलब्ध नसतात. उन्हाळ्यात यातील देखील पाणी आटते.

त्यामुळे उन्हाळा ऋतूमध्ये शेतकऱ्याला फार पाणी टंचाई जाणवते. पाण्यावाचून शेतातील पिके कोलमडून पडतात. अशा वेळेस जगाचा अन्नदाता असणारा शेतकरी राजा पावसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो. तो आकाशाकडे डोळे लावूनच असतो, कधी पाऊस पडेल याची वाट पाहत?

केवळ शेतकरीच नव्हे तर इतर लोक, पशू पक्षी, झाडे वनस्पती, नद्या, नाले, तलाव देखील पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनच पाणी टंचाई जाणवत असते. सगळीकडेच पिण्याच्या पाण्याची समस्या असते.

अशा वेळेस सगळ्यांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन मिर्गाच्या तोंडाला म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. हा पहिला पाऊस पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता असते. यामध्ये संपूर्ण धरती माय न्हावुन निघते.

वातावरणातील उष्णता नष्ट होऊन वातावरण थंड होऊन जाते. नद्या नाले तुंभ भरून वाहू लागतात.झाडे झुडपे, वेली वनस्पती सर्वजण या पावसात मनसोक्त भिजतात. सगळीकडेच आनंद पसरतो.

पहिल्या पावसाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचा सुंदर वास सुटतो. हा मातीचा वास मला खूप आवडतो. कोकिळा, चातक यासारख्या पक्ष्यांची तहान भागते. मोर पक्षी हर्षाने टेकडीवर जाऊन मयुर्नृत्य करायला लागतात. या दिवसात मोरांचा हा नाच पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.

पावसाळा (essay on rainy season in marathi) ऋतुमधील पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी राजा कामाला लागतो. त्याची पेरणीची लगबग चालू होते. या दिवसांमध्ये आकाश निळेभोर असते, सतत काळेकुट्ट ढग आकाशात जमा व्हायला लागतात. कधी पावसाच्या सरी रिमझिम बरस्तात तर कधी हाच पाऊस धो धो करून बरसू लागतो.

पावसाळा ऋतूमध्ये कधी कधी पाऊस दोन चार दिवसाची सारखी हजेरी च लावतो. अशा वेळेस बहुदा शाळा, कॉलेजांना सुट्टीच मिळते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना आनंदच होतो. आम्ही देवाला प्रार्थना करू लागतो, देवा असाच पाऊस पडू दे आणि आमच्या शाळेला दोन तीन दिवस आणखी सुट्टी मिळू दे.

त्यावेळेस मात्र हे गाणे नक्कीच आठवते –

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…

पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस बरसत असतो. नद्या नाल्या तुडुंब भरून वाहतात. रस्त्यावरील खळग्यात पाणी साचते. त्यामुळे अशा वातावरणात छत्री, रेनकोट घालून चालू पावसातून शाळेत जाण्यात खूप मज्जा येते. आम्ही साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून त्यांची शर्यत लावत असत. हा खेळ खेळण्यात मला खूप मज्जा वाटत असे.

पावसाळा ऋतूमध्ये पाऊस सुरू झाला की थंड वातावरणात गरम गरम भजे खाण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे पाऊस चालू असला की आई आमच्यासाठी गरम गरम कांदाभजी बनवते. मला थंड वातावरणात कांदाभजी खायला खूप आवडते.

पावसाळा हा ऋतू खूप प्रसन्न वातावरणाचा असतो. सगळीकडे थंडगार वारे वाहू लागते , उन्हाळा ऋतूमध्ये सुकलेली झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार होऊ लागतात. सर्वत्र पाणीच पाणी होते. या ऋतूमध्ये खूप आनंद मिळतो. मला हा पावसाळा ऋतू खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi या विषयावर चार निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध पहिली पासून ते बारावी पर्यंत खूप उपयुक्त आहेत.

माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi हा निबंध मी खूप सुंदर शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी माझी आशा आहे. तुम्हाला इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्या विषयावर पुढील पोस्टमध्ये नक्की निबंध लिहितो.

हे निबंध देखील अवश्य वाचा :

1 thought on “माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi”

Leave a Comment