[शिमगा] होळी सण मराठी निबंध | essay on holi in marathi

होळी सण मराठी निबंध (essay on holi in marathi) :- भारत देश हा अनेक धार्मिक लोकांचा निवासस्थान आहे. या देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, आनंदाने सण उत्सव साजरे करतात. यातच होळी हा सण देखील संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या सणाचे विविध धर्मात खूप महत्व आहे.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला होळी सण मराठी निबंध essay on holi in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. माझा आवडता सण होळी हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.

होळी सण मराठी निबंध essay on holi in marathi {१०० शब्दात}

होळी हा सण फाल्गुन महिन्यातील वद्य पैरणीमेला साजरा केला जातो. हा सण होलिका दहन, शिमगा, धुळवड, दोलयात्रा अश्या अनेक नावाने ओळखला जातो. या सणाला रंगांचा सण देखील म्हटले जाते. होळी हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

होळी हा सण दोन दिवसांचा असतो. यातील पहिला दिवस म्हणजे धुलीवंदन असतो. या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येऊन होळी तयार करतात. होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवून होळीची पुजा करतात. या दिवशी होळीला नारळ अर्पण केले जाते. आगीत जळालेले नारळ लोक प्रसाद म्हणून खातात.

होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. या दिवशी मुले एकमेकांना रंग लावतात, एकमेकावर पणी फेकतात, आनंद लुटतात. होळीच्या दिवशी पुरणाचा आणि गोडधोड स्वयंपाक जेवायला केला जातो.

(शिमगा) होळी सण मराठी निबंध essay on holi in marathi {३०० शब्दात}

होळी हा माझा खूप आवडता सण आहे. हा सण संपूर्ण भारतभर खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाला विविध भागात वेगवेगळे महत्व आहे. हा सण काही भागात वसंत ऋतूच्या आगमनात साजरा केला जातो तर काही भागात या सणाला सांस्कृतिक आणि पारंपरिक कारण आहे.

होळी या सणांच्या दिवशी एकमेकांना रंग लावला जातो, गुलाल आणि रंगांची उधळण केली जाते त्यामुळेच या सणाला ” रंगांचा सण ” म्हणून देखील ओळखले जाते. हा सण मराठी महिन्यातील शेवटच्या महिन्यात येतो. हा सण फाल्गुन पौर्णिमा पासून ते वद्य पौर्णिमा पर्यंत साजरा केला जातो.

या काळात वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. सर्वत्र हिरवळ आणि विविध रंगीबेरंगी फुलांनी नटलेली झाडे दिसू लागतात. वातावरण अगदी आल्हादायक असते. अशा वातावरणात होळी हा सण लोकांना आणखीनच आनंद देतो. लोक या उत्सवात तल्लीन होऊन जातात.

Also read : माझा आवडता छंद मराठी निबंध

हा सण शेतकरी वर्ग देखील खुप आनंदाने साजरा करतो. या दिवसात शेतातील कामे संपून पीक हातात आलेले असते. शेतकरी राजा देवाने दिलेल्या पीकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तो इष्ट देवतांची पूजा करून त्यांना शेतात बहरून आलेले पीक अर्पण करून देवाला धन्यवाद देतो. शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने होळी हा सण साजरा करतो.

होळी सण (holi festival essay in marathi) म्हणजे आदिवासी जमातींमध्ये जणू दिवाळीच असते. आदिवासी लोक होळी हा सण खूप आनंदात साजरा करतात. आदिवासी जमातीत होळी सण १० ते १५ दिवस साजरा केला जातो. यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. या लोकांचा होळी सण पाहणे खूपच मजेशीर असते.

आदिवासी लोक होळी सणाला पारंपरिक वेशभूषा करतात, अंगावर छान रंगकाम करतात. तसेच हे लोक ढोल आणि ताशांच्या धुंदीत अप्रतिम पारंपरिक नृत्य आणि गायन करतात. याच्यातून आदिवासी लोकांच्या संस्कृतीचे दर्शन घडते. हे लोक देखील होळी बनवून होळीची पुजा करतात. होळी आनंदाने साजरी करतात.

प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणते न कोणते कारण असते. त्याचप्रमाणे होळी हा सण साजरा करण्यामागे देखील अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. यात भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची आख्यायिका सर्वानाच प्रचलित आहे.

राजा हरिण्याकश्यप यांचा प्रल्हाद नावाचा एक पुत्र होता. तो विष्णूचा भक्त होता त्यामुळे तो सतत विष्णूचा जप करत असे. पण राजा हरिण्याकश्यापला देवांची पूजा करणे मान्य नव्हते. ते स्वताला देवापेक्षा महान मानायचे. पण राजाने सांगूनही भक्त प्रल्हाद देवाचे नाव घेणे सोडत नसे.

त्यामुळे राजा हरिण्याकश्यप आणि त्याची बहीण होलिका या दोघांनी मिळून भक्त प्रल्हाद ला मरण्याचे ठरवले. होलिका ही हरिण्याकश्यप ची बहिण होती. तिला अग्नीत जिवंत राहण्याचे वरदान मिळालेले होते. त्यामुळे तिने प्रल्हाद घेऊन आगीत प्रवेश केला. पण त्यात भक्त प्रल्हाद ला काहीही न होता होलिका अग्नीत जळून भस्म झाली. तेंव्हापासून होळी हा सण साजरा केला जातो.

” सत्याचा असत्यावर विजय ” असा अर्थ या सणाचा होतो. सत्याचा नेहमी विजय होतो अशी शिकवण या होळी सणातून समाजातील लोकांना मिळते.

(शिमगा) होळी वर मराठी निबंध essay on holi in marathi {५०० शब्दात}

होळी (होळी मराठी निबंध) हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या सणाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व दिले जाते. हा सण महाराष्ट्र, गोवा, गुजरात, पंजाब, राजस्थान, मणिपूर, हिमाचल प्रदेश, या सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाला विविध प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत. शिवाय होळी साजरी करण्याची पद्धत देखील वेगळी असते.

होळी (essay on holi in marathi) या सणाला महाराष्ट्रात आणि कोकणातील समुद्र किनारी वसलेल्या वस्त्यांमध्ये ‘ शिमगा ‘ असे म्हटले जाते. तर याच सणाला उत्तर आणि दक्षिण भारतात होलिका दहन, शिमगा, दोलायात्रा, हुताशनी मुहोत्सव या नावांनी ओळखले जाते.

संपूर्ण भारतात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असला तरी या सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते. ती म्हणजे अग्नीपूजा. होळी या सणाच्या दिवशी अग्निला खूप महत्व दिले जाते.

Also read: माझी शाळा मराठी निबंध

या दिवशी लाकडे, शेणाच्या गोवऱ्या यापासून होळी तयार केली जाते. गावातील सर्व लोक या सणाला एकत्र जमतात. एकत्र होळीची पूजा करतात. होळीला नारळ आणि पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. होळीच्या भोवताली पाणी फिरवून होळीला प्रदिक्षणा घातल्या जातात.

या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना आनंदात शिव्या देऊन मौज घेतात. पण या दिवशी कुणीही या गोष्टीचा राग मानून घेत नाहीत. लहान मुले तर यादिवशी खूप खुश असतात. ते देखील बोंब मारण्याचा विलक्षण क्षण दवडत नाहीत.

हा सण म्हणजे बंधुबावाचा आणि एकोप्याचे प्रतीक आहे. या दिवशी सर्व एकत्र येऊन आनंदात होळी हा उत्सव साजरा करतात.

या दिवशी सर्वांच्या घरी पुरण पोळीचा स्वयंपाक आणि गोडधोड जेवायला केले जाते. हा पुरण पोळीचा नैवेद्य होळीला दाखवल्या नंतर आणि होळीची पुजा केल्यानंतरच घरोघरी जेवायला सुरुवात केली जाते. पुरण पोळी हा महाराष्ट्रातील प्रमुख खाद्य पदार्थ आहे.

होळी हा सण महाराष्ट्रात दोन दिवसांचा असतो. इतर राज्यात तो ५ ते १५ दिवसांपर्यंत साजरा केला जातो. होळीचा पहिला दिवस म्हणजे धुळवड असतो यालाच काही भागात धुळीवंड, धुलीवंदन असेही म्हटले जाते.

धुलिवडच्या दिवशी सर्व लोक एकत्र जमून लाकडे आणि शेणाच्या गोवऱ्या यापासून होळी तयार करतात. सर्वजण होळीला नैवैद्य अर्पण करून होळीची पुजा करतात. संध्याकाळी सर्वजण पुरणाचा स्वयंपाक आणि गोडधोड खाऊन आनंदी होतात.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी असतो. या दिवशी सर्व लोक एकमेकांना गुलाल आणि रंग लाऊन रंगपंचमी साजरी करतात. या दिवशी लहान मुले खूपच आनंदीत असतात. ते सुद्धा या दिवशी रंग आणि पाणी यांच्यासोबत खेळून मौज करतात. हा संपूर्ण दिवस लोक रंग खेळून आनंद व्यक्त करतात.

टीप : विद्यार्थि मित्रानो, आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला होळी मराठी निबंध essay on holi in marathi या विषयावर खूप उत्कृष्ट निबंध लिहिलेला आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

होळी सण मराठी निबंध essay on holi in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment