माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali in marathi लिहिलेला आहे.
दिवाळी वर मराठी निबंध सर्वच विद्यार्थांसाठी खूपच उपयुक्त आहे. माझा आवडता सण दिवाळी निबंध my favourite festival diwali essay in marathi हा तुम्हाला नक्कीच आवडेल.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
दिवाळी वर 10 ओळीचा निबंध | 10 lines on my favourit festival diwali in marathi
- दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.
- हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या सणाची तारीख निश्चित नसते.
- दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते.
- दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.
- दिवाळीच्या दिवशी अंगाला उठणे लाऊन अंघोळ करण्याची प्रथा आहे.
- दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
- दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाहुबिज होय. या दिवशी बहीण भावला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते.
- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवू लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.
- दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाब जमून हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात)
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जातेच शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात.
मला तसे तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात पण दिवाळी हा माझा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दिवाळी या सणाचे वर्णन दीपोत्सव असे देखील करतात. कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.
दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण भारताबाहेर विदेशात राहणारे हिंदू धर्मीय लोक देखील मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येतात.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील आठ ते दहा दिवस सुट्या असतातच. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. तेंवहापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते.
गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासठी एक मोठा आकाश कंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळींची मदत देखील लाभते. नंतर हा आकाशकंदील गावच्या मध्यभागी लावण्यात येतो.
आमच्या घरी देखील मी आणि माझी बहिण मिळून एक छोटा आकाश कंदील बनवतो. आई आणि आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात.लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. यात सर्वांचे आवडते गुलाब जमून तर मला खूपच आवडतात. दिवाळीच्या अगोदर आम्ही सर्वजण मिळून घराची आणि अंगानाची स्वच्छता करतो.
दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते.दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आंघोळ केली जाते.
घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात आणि आनंदाने फराळाचे पदार्थ खातात. या दिवशी पाहुण्यांना आणि मित्रांना घरी फराळाला बोलावण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरातील प्रौढ मंडळी लहान चिमुकल्यांना पैसे आणि भेटवस्तू देतात.
ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप जास्त आवडते.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्य साठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याचे शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
दिवाळी हा सण खूपच आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळी वर मराठी निबंध, माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi लिहून दिलेला आहे. हा सण इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही वापरू शकता.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही दिवाळीला कश्या प्रकारे मज्जा करता, ते देखील कमेंट करून कळवा, धन्यवाद…!