गुढीपाडवा वर निबंध मराठी | gudi padwa essay in marathi

गुढीपाडवा मराठी निबंध gudi padwa essay in marathi :- भारत देश हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने बहरलेला आहे. या देशात तिथीनुसार अनेक सांस्कृतिक आणि पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा सण हा देखील भारत देशातील संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गुढीपाडवा हा सण भारत देशातील बऱ्याच राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा वर मराठी निबंध gudi padwa essay in marathi वेगवेगळ्या शब्दात लिहून दिलेला आहे. माझा आवडता सण गुडी पाडवा हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.

गुढीपाडवा मराठी निबंध | gudi padwa essay in marathi (१०० शब्दात)

गुढीपाडवा हा वसंत ऋतूमध्ये येणारा खूप महत्वाचा सण आहे. हा सण हिंदू संस्कृतीतील खूप पवित्र सण मानला जातो. त्यामुळे खूप लोक या दिवसापासून चांगल्या कामाची सुरुवात करतात. यादिवशी अनेक लोक नवीन वाहने, सोने चांदी खरेदी करतात. या सणाला वैज्ञानिक महत्व देखील आहे. या दिवशी कडुनिंबाचा दहाला खाल्ला जातो ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरुळीत होण्यास मदत होते.

गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी घरातील आणि अंगणातील स्वच्छता करून दारात गुडी उभारली जाते. गुडी उभारू परिवारातील सर्व सदस्य एकत्र गुढीची पूजा करतात. गुडी तयार करण्यासाठी बांबूच्या काठीचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील लोक या दिवशी नवीन वर्ष साजरे करतात.

गुढीपाडवा मराठी निबंध | gudi padwa essay in marathi (३०० शब्दात)

संपूर्ण जग १ जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरे करतो. पण महाराष्ट्रातील वासियांसाठी नवीन वर्ष म्हणजे गुडी पाडवा हा सण. गुडी पाडवा सणाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र वासी नवीन वर्ष साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात नवीन वर्ष खूप मोठ्या उत्साहाने साजरा केले जाते. या दिवशी लोक एकमेकांना गुडी पाडवा सणाच्या शुभेच्छा बरोबरच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देतात.

Also read : प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात गुडी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुडी पाडवा हा सण सौर पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशातील अनेक राज्यात गुढीपाडवा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.

या सणाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. काही धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथानुसार असे सांगण्यात येते की गुढीपाडवा सणाच्या दिवशी भगवान विष्णूने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. त्याच्या अनुषंगाने हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.

तर काही ठिकाणी अशी आख्यायिका सांगण्यात येते की या दिवशी भगवान श्री राम , लक्ष्मण आणि सितामाता चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले होते. त्यावेळी आयोद्यावसियांनी भगवान रामाचे स्वागत करण्यासाठी आपल्या घराला तोरून बांधून आणि घराभोवती गुडी उभारू आनंद साजरा केला होता. तेंव्हापासून आजही चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.

गुढीपाडवा (gudi padwa essay in marathi) सणाच्या दिवशी घरातील सर्व सदस्य सकाळी लवकर उठून अंघोळ करतात. नवीन पारंपरिक पोशाख परिधान करतात. या दिवशी सर्वांच्या घरात पुरण पोळीचा गोडधोड स्वयंपाक बनवला जातो. घरातील आणि अंगणातील स्वच्छता केली जाते. खेडेगावात घरासमोरील अंगणात सडा टाकला जातो.

सडा टाकून स्वच्छ केलेल्या अंगणात घरातील स्त्रिया सुंदर रांगोळी काढतात. घरासमोर खिडकीजवळ गुडी उभारली जाते. यासाठी उंच बांबूच्या काठीचा वापर केला जातो. काठीच्या टोकाला एक रेशमी कपडा बांधून त्यावर तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. गुडीचा गळ्यात साखरेची गाठी बांधली जाते.

गुडीच्या भोवताली सुंदर रांगोळी काडली जाते. घरातील स्त्रिया गुढीची पूजा करून नैवैद्य दाखवतात आणि नंतर संपूर्ण सहपरिवार एकत्र गोडधोड जेवण करतो. सायंकाळच्या वेळी गुडी उतरवली जाते.

गुढीपाडवा सण मराठी निबंध | gudi padwa essay in marathi (५०० शब्दात)

गुडी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात साजरा केला जातो. वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा सण आहे. हा सण मराठी दिनदर्शिका नुसार चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

हा सण कित्येक ठिकाणी वसंत ऋतूच्या आगमनात साजरा केला जातो. या वेळी झाडे झुडपे हिरवीगार होतात, त्यांना नवी पालवी फुटते, रंगीबेरंगी फुले लागतात. वातावरण शांत आणि आल्हादायक असते. अशा वातावरण गुडी पाडवा हा सण लोकांच्या आनंदात आणि उत्साहात आणखीनच भर पाडतो.

गुडी पाडवा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे सांगितले जातात. यामध्ये सर्वात प्रसिद्ध कथा अशी आहे की यादिवशी भगवान राम चौदा वर्षांचा वनवास संपवून आपल्या साम्राज्यात परत आले होते. त्यावेळी तेथील लोकांनी घरासमोर गुडी उभारून त्यांचे स्वागत केले होते. तेंव्हापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

Also read : पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

गुढीपाडवा (gudi padwa festival essay in marathi) सणाच्या दिवशी स्त्रिया संपूर्ण घराची साफ सफाई आणि स्वच्छ्ता करतात. तसेच गोडधोड स्वयंपाक बनवतात. गुढीपाडवा या सणाला खूप महत्व आहे. हा सण खूप पवित्र मानला जातो. या दिवशी सुरू केलेले काम नक्कीच सफल ठरते अशी निष्ठा लोकांची आहे.

त्यामुळे खूप लोक गुढीपाडव्याचा दिवशी नवीन काम – उद्योग सुरू करतात. मागील झालेल्या चुका विसरून नव्याने कामाला लागतात. या दिवशी सुरू केलेले काम यशस्वी होते असा लोकांमध्ये विश्वास आहे. तसेच लोक यादिवशी गाडी, वाहने, सोने यासारख्या नवीन वस्तू देखील खरेदी करतात.

गुढीपाडव्याला घराच्या समोर एका पाठावर गुडी उभारली जाते. पाठच्या बाजूला रांगोळी काढली जाते. गुढीला फुले वाहून पूजा केली जाते. गुडी उभारण्यासाठी उंच काठीचा वापर केला जातो. ही काठी सकाळी गरम पाण्याने स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर गुडीच्या टोकाला नवीन कापड बांधले जाते. त्यावर कडुलिंबाचा दहाला आणि साखरेची गाठी ठेवली जाते आणि नंतर त्यावर पालथा कलश ठेवला जातो.

ही गुडी नंतर घरासमोर एक पाठावर ठेवली जाते. घरातील सर्व माणसे गुडीची पूजा करतात आणि झेंडूची फुले वाहून पाया पडतात. गुढीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी गूळ आणि कडुलिंबाचा दहाला यांचा प्रसाद खाल्ला जातो. यादिवशी कडूनिबाच्या पानाला खूप महत्व दिले जाते. या दिवशी कडुनिंबाचा दहाला आणि गूळ प्रसाद म्हणून खाल्ला जातो.

यामागे शास्त्रीय कारण आहे. कडुलिंब ही एक गुणकारी वनस्पती आहे. कडुलिंबाचा दहाला खाल्याने पोट साफ होऊन रक्त शुद्ध होते. त्यामुळे यादिवशी कडूलंबाचा दहाला आणि गूळ खाण्याची प्रथा आहे.

गुढीपाडव्याचा दिवशी महिला झेंडूच्या फुलांचे हार बनवतात. आंब्याच्या पानांचे तोरण बनवले जाते. हे तोरण घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्यांना बांधले जाते. सकाळी उभारलेली गुडी संध्याकाळी उतरवली जाते. या दिवशी घरातील सर्व मंडळी गोडधोड पदार्थ खावून आनंदित असतात. हा सण खूप लोकांना आवडतो. मला देखील गुढीपाडवा सण खूप खूप आवडतो.

टीप : विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा वर मराठी निबंध gudi padwa essay in marathi या विषयावर अत्यंत सुंदर शब्दात निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध शालेय विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त आहे.

माझा आवडता सण गुढीपाडवा essay on gudi padwa in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment