मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh :- दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग, अनुभव, घटना घडत असतात ज्या की दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यात काही चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव असतात तर काही भयानक प्रसंग देखील असतात. अशा घटना नेहमी दीर्घकाळ लक्षात राहतात.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh या विषयावर निबंध लिहिलेला आहे. या निबंध मार्फत मी पाहिलेला अपघात याचे वर्णन केलेले आहे. हा निबंध शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh ( ७००+ शब्दात )

Mi pahilela apghat marathi nibandh
मी पाहिलेला अपघात मराठी निबंध

मानवी आयुष्यात वावरत असताना डोळ्यासमोर काही असे भयानक प्रसंग घडतात की जे पाहिल्यानंतर मन अगदी सुन्न होते. असे भयानक प्रसंग कधीही विसरत नाहीत, ते नेहमी आठवत राहतात. माझ्याही आयुष्यात असाच एक भयानक प्रसंग घडला होता. तो मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat marathi nibandh या विषयामध्ये मांडत आहे.

मी आणि माझा मित्र सुधीर आम्ही दोघे नेहमीप्रमाणे शाळेत निघालो होतो. सकाळची वेळ होती त्यामुळे सर्व ठिकाणी शांतता होती. आमच्या शाळेत जाण्यासाठी आम्हाला एक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पलीकडे जावे लागते. त्यामुळे तो रस्ता ओलांडतात आम्ही नेहमी काळजी घेतो. शिवाय आम्हाला घरून देखील रस्ता सावकाश ओलांडण्यासाठी सूचना मिळतात.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला थांबून रस्ता ओलांडत होतो. पण तेवढ्यात ट्रॅफिक सिग्नल सुरू, दिवा हिरवा झाला. त्यामुळे पुन्हा रस्त्यावरील रहदारी सुरू झाली. आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला थांबून सिग्नल लाल होण्याची वाट पाहत होतो.

Also read : जल हेच जीवन आहे / जल हैं तो कल हैं मराठी निबंध

तेवढ्यात कर्र….. असा जोरात ब्रेकचा आवाज आला. आम्ही दोघेही मी आणि माझा मित्र काय झाले म्हणून त्या रोडकडे पाहत होतो. त्या ब्रेकचं आवाज एवढा कर्कश होता की माझ्या मनात धडधडायला लागले. मला वाटले नक्कीच काहीतरी वाईट घडले.

तो आवाज एका बसचा होता. एक बाईक आणि बसचा जोरदार अपघात झाला होता. पश्चिमेकडून दोन व्यक्ती बाईकवर खूप जोरात येत होते आणि त्यांच्याच दिशेने एक बस देखील येत होती. पण अचानक बसचे ब्रेक फेल झाले. बसचालकाचा ताबा सुटला आणि बस अगदी वेगाने त्या बाईक स्वारांना जाऊन धडकली.

त्यामुळे सर्व लोक त्या ब्रेकच्या आवाजाच्या दिशेने धावली. अपघात स्थळी लोकांची तोबा गर्दी जमली. आम्हीही त्या दिशेने धावलो. लोकांची गर्दी सारत आम्ही अपघात स्थळी आलो. त्याठिकाणी बस आणि एका मोटारसायकल चा भीषण अपघात झालेला होता.

हा अपघात एवढा भयानक होता की त्यात एका बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुसरा देखील गंभीर जखमी झाला होता. बसच्या चाकाखाली मोटारसायकल आल्यामुळे ती अगदी चकणाचुर झालेली होती. बसचे देखील समोरचे तोंड आणि काच फुटले होते. बस समोर अगदी रक्ताचा सडा सांडला होता.

सुदैवाने बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते. बसचालक आणि बसमधील दोन प्रवासी यांना देखील खूप सारे लागले होते. त्यातील एकाचे डोके फुटून बसमध्ये पूर्ण रक्त सांडत होते. पण कुणीही त्या जखमी व्यक्तींना हाथ लावायला तयार नव्हते.

त्यातीलच काही लोकांनी पोलीस आणि रुग्णवाहिका यांना फोन लावून बोलावून घेतले. पण रुग्णवाहिका आणि पोलीस यायला वेळ लागत होता. त्यातील एकाची तब्येत एवढी गंबिर होती की त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. त्याच्या डोक्याला मार लागल्याने खूप रुक्त सांडत होते. पण कुणीही त्यांना हाथ देखील लावत नव्हते. सर्वजण कडेने थांबून तमाशा बघत होते.

तेवढ्यात दोन युवकांनी त्या व्यक्तीला उचलले आणि एका रिक्षात बसवून दवाखान्यात घेऊन गेले. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली आणि त्या मागोमाग रुग्णवाहिका देखील आली. रुग्ण सेवकांनी अपघात ग्रस्त व्यक्तींना रुग्णवाहिकेत टाकून त्यांना दवाखान्यात दाखल केले.

पोलिसांनी घटना स्थळीचा पंचनामा केला. रस्त्यावर पडलेली मोटारसायकल आणि बस बाजूला केली आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. तो पर्यंत वाहतुकीची खूप कोंडी झालेली होती. वाहतूक सुरुळीत वाहायला अर्धा तास लागला.

आम्ही दोघे तिथेच होतो. शाळेला खूप उशीर झालेला होता. तो भीषण अपघात पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. भीतीने माझे अंग थरथर कापत होते. त्यामुळे आम्ही शाळेत न जाता सावकाश रस्ता ओलांडून घराच्या दिशेने निघालो.

मात्र तो प्रसंग डोळ्या समोरून जाता जात नव्हता. त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. त्यामुळे मला आणखीनच भीती वाटत होती. आम्ही वेगाने घरी गेलो.

Also read : माझे आवडते शिक्षक मराठी निबंध

मी घरी गेल्यानंतर आई बाबांना घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. आईने माझे कान फुंकले आणि माझी समजूत काढली. मला हातपाय धुवून आराम करायला सांगितले. मात्र मला राहून राहून तोच प्रसंग आठवत होता. त्या गंभीर असलेल्या व्यक्तीचे काय झाले असावे ? तो वाचला असावा की…? अशा प्रश्नांनी माझ्या मनात थैमान घातले होते.

तो प्रसंग अगदी माझ्या मनावर कोरला गेला होता. तो माझ्या आयुष्यातील पहिला मी पाहिलेला अपघात (mi pahilela apghat marathi nibandh) होता. आजही तो अपघात माझ्या जश्यास तसा लक्षात आहे.

टीप : विद्यार्थि मित्रांनो ! या पोस्टमध्ये मी तुम्हाला मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्ही पहिली पासून ते दहावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता.

मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat marathi nibandh तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment