रक्षाबंधन वर निबंध | rakshabandhan essay in marathi

Rakshabandhan essay in marathi रक्षाबंधन वर निबंध : आपल्या संस्कृतीत स्त्रीला घरची लक्ष्मी (देवी) मानले जाते. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा त्या मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची हा टिळा असतो. राखीचा धागा हा नुसताच धागा नसून ते स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा पवित्र धागा आहे. त्यामुळे बहीण आणि भावाच्या या नात्यात राखीला खूप महत्व आहे.

आजच्या या पोस्टमध्ये रक्षाबंधन या विषयावर अत्यंत सुंदर शब्दात निबंध लिहून दिलेला आहे. या निबंधातून रक्षाबंधन सणाची संपूर्ण माहिती, हा सण कसा साजरा केला जातो, सणाचे महत्व, सणाशी संबंधित पौराणिक कथा व तसेच या सणाची विविध भागात आणि विविध धर्मात असलेली ओळख या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. हा सण सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत.

रक्षाबंधन वर १०० शब्दात निबंध | rakshabandhan essay in marathi in 100 words

भारतीय संस्कृती मधील रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सव म्हणून साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. देशभरात या सणाची वेगवेगळी नावे आहेत. रक्षाबंधन हे नाव( संरक्षणाचे बंधन) असेही आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते व भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. हुमायून ने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली. नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदू-मुस्लीम यांच्यात सलोखा निर्माण करण्यासाठी एकमेकांच्या हातावर राखी बांधण्याची विनंती केली. या सर्व उदाहरणातून पूर्वीच्या काळात देखील रक्षाबंधन हा सण साजरा केला जायचा हे दिसून येते.पुरानी कथा व इतिहास चाळता रक्षाबंधन या सणात अनेक बदल आढळून आलेले दिसतात.

बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून आपल्या भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो ही प्रार्थना करतात. तसेच भाऊ देखील आयुष्यभर बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो आणि तिला खाऊ आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देखील देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता निर्माण करणारे बंधन आहे.

रक्षाबंधन वर २०० शब्दात निबंध | rakshabandhan essay in marathi in 200 words

” रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग ” असे या दिवशी राखीचे वर्णन केले जाते. बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग घेऊन येतो असा त्याचा अर्थ आहे. हा सण लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदात साजरा करतात. स्त्री किती मोठी झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हे यातून दिसून येते.

रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजात वाव मिळतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. स्त्रीचे वय कितीही असले तरी तिला रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरची ओढ लागते. लग्नानंतर तिच्या जीवनात बदल झाला असला तरी माहेरची नाती आपल्या हृदयात कायम जपून ठेवते. मुलगी, आई, पत्नी, बहिण अशी नाती जपत असताना ती एकाच वेळी अनेक कर्तव्य पार पाडत असते. बरेच वेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. रक्षाबंधन हा मने जुळवणारा सण आहे.

आपली बहीण सुखात राहू अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच ओक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतिक म्हणून राखी बांधते. तसेच भाऊ देखील आपल्या बहिणीला या बदल्यात तिला ज्या भेटवस्तू आवडतील त्या देत असतो. पातळतल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मी ने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मूर्ती केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

यातून पूर्वीच्या काळात देखील रक्षाबंधन साजरे केले जायचे याचा संदर्भ दिसून येतो. फक्त या सणात काळानुसार खूप सारे बदल झाले आहेत, पूर्वीच्या परंपरा आणि आजच्या आधुनिक युगातील परंपरा यात अमुलाग्र बदल झाला आहे. परंतु या सणाचा उद्देश मात्र आज देखील भावाने बहिणीचे रक्षण करणे हाच आहे.

रक्षाबंधन वर ५०० शब्दात निबंध | rakshabandhan essay in marathi in 500 words

रक्षाबंधन हा भारतीय संस्कृती मध्ये साजरा केलं जाणारा खूप महत्वाचा सण आहे. हा सण हिंदू धर्मातील जवळपास सर्वच जाती आणि समुदायात साजरा केला जातो. या सणाला आणेक पौराणिक कथांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा सण बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढवणारा सण आहे. तसेच हा सण खूप पवित्र मानला जातो.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधायची असते आणि त्यामागे आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा अन भावाने बहिणीचे संरक्षण करावे हे महत्त्व असते. रक्षाबंधन हा सण भारतातील पवित्र आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला हिंदूच नव्हे तर इतर धर्माचे लोक सुद्धा आनंदाने साजरा करतात. हा सण रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखला जातो.

बहिण-भावाचे नाते अतुलनीय आहे. एकमेकांसाठी ते काही करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत. हा सण त्यांच्या पवित्र नात्याला अनेक घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला हा सण भाऊ आणि बहिणी साठी खूप खास असतो. मोहक वातावरणात असा प्राणी कोणताही नाही की त्याची आनंदात नसण्याची इच्छा होणार नाही.

हिंदू साठी संपूर्ण श्रावण महिना हा उत्सवाचा महिना असतो. या महिन्यात नागपंचमी आणि रक्षाबंधन हे महत्वाचे सण साजरे केले जातात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकू अक्षता लावून आरती ओवाळते. आणि त्याचे तोंड गोड करून त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. जेव्हा एखादी भारतीय स्त्री पुरुषाला राखी बांधते आणि त्याला आपला भाऊ बनवते. तेव्हा तो पुरुष मरेपर्यंत त्या राखीचा मान राखतो आणि तिचे रक्षण करतो. त्यामुळे रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे.

रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण बाजारातून सुंदर राखी घेऊन येते. भावाला पाठावर बसून त्याला राखी बानते आणि ओवाळते. हा सण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी बहीण आणि भाऊ दोघे सकाळी लवकर उठतात आणि स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. भाऊ बहिणीच्या गावी जाऊन तिच्याकडून राखी बांधून घेण्यास खूप उत्सुक असतो. हा सण बहीण आणि भावाच्या नात्यातील खूप पवित्र सण आहे.

Leave a Comment