सिंधूताई सपकाळ वर निबंध | Essay on Sindhutai sapkal in marathi

Essay on Sindhutai sapkal in marathi सिंधुताई सपकाळ वर निबंध : सिंधुताई सपकाळ या केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांच्या कार्यामुळे लोकपरीचीत आहे. त्यांनी अनाथ मुले आणि स्त्रियांसाठी केलेले कार्य आज अनेकांना प्रेरणा देते. त्यांच्यामुळेच आज अनेक अनाथ आणि बेघर मुलांना अनाथ आश्रमात सहारा मिळाला आहे. म्हणूनच त्यांना अनाथांच्या माई म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

आजच्या या पोस्टमध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या वर निबंध लिहून दिलेला आहे. या निबंधातून सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती, त्यांचा जीवन संघर्ष, त्यांचे कार्य, त्यांना मिळालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत.

सिंधूताई सपकाळ वर १०० शब्दात निबंध | Essay on Sindhutai sapkal in marathi in 100 words

सिंधुताईचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी झाला. सिंधुताई सपकाळ या भारतातील समाजसुधारक आहेत त्यांना लोक माई या नावाने ओळखतात. त्याकाळी भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूप कठीण होते. त्यांना चूल आणि मूल फक्त एवढेच अधिकार प्राप्त होते त्यामुळे त्यांची पिळवणूक व्हायची. गरीब असो वा श्रीमंत त्यांना समाजातील अडचणींना सामोरे जावे लागायचे. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदारी आणि लवकरच लग्न यामुळे त्यांना चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.

सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 12 व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले. सिंधुताई सपकाळ यांचे पती त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. त्यांच्या कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हते. जंगलात लाकडे गोळा करायला गेल्यावर सापडलेली तुकडे माय घरी आणायच्या व ते नंतर वाचण्यासाठी लपवून ठेवायच्या.

सिंधुताईच्या पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यांना मारून घराबाहेर काढले. त्या वेळी सिंधुताई गरोदर होत्या हे मूल माझं नाही असं त्यांच्या पतीचे म्हणणं होतं. अशा अवस्थेत त्या गोठ्यात येऊन राहिल्या. आणि त्या वेळेस त्यानी गोठ्यामध्ये मुलीला जन्म दिला. यातूनच त्यांना समाजातील अनाथ आणि बेघर लोकांसाठी अनाथ आश्रम उघडण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केली.

सिंधूताई सपकाळ वर ३०० शब्दात निबंध | Essay on Sindhutai sapkal in marathi in 300 words

सिंधुताई यांना सुरुवातीला जीवन जगणे खूप कठीण वाटू लागले कारण त्यांच्यकडे राहण्यासाठी घर नव्हते व खाण्यासाठी देखील काही नव्हते. म्हणून सिंधुताई रेल्वे स्टेशनवर भीक मागायच्या आणि त्यातूनच आपले पोट भरायच्या. स्टेशनवर उगड्यावर राहणे शक्य नव्हते. म्हणून माईने समशनात राहायला सुरुवात केली. मृत देहाची अंत्यविधी करून लोक निघाले की माई त्यांच्या मागे जायच्या त्यांना भीक मागायच्या. त्यांनी आपली मुलगी दगडूशेठ हलवाई या माणसाला दत्तक दिली. कारण त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनू शकतील.

बरेच वर्षात परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिखलदरा येथे पहिले आश्रम काढले. आपल्या जीवनाचे धडे घेत असताना त्यांनी महाराष्ट्रात आनाथांसाठी सहा अनाथाश्रम बनवले. अनाथ आश्रम चालवण्यासाठी सिंधुताईंनी कधीच कोणापुढे हात पसरले नाहीत. सार्वजनिक व्यासपीठावर आतुर प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचित आणि बेघर लोकांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला.

लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी आशा गमावली नाही. त्यांच्या माहेरी त्यांनी महिलांच्या शोषणाविरुद्ध लढा दिला. या लढाईनंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल हे त्यांना माहीत नव्हते. सिंधुताई यांनी असहाय आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. याच संघर्षामुळे त्यांना समजले की देशात अनेक अनाथ मुली आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरवले की जो कोणी त्यांच्याकडे येईल त्यांच आई म्हणून मी सांभाळ करीन.

सिंधुताई यांनी अनेक मुले दत्तक घेतली होती. त्या मुलांचे चांगले पालनपोषण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांची स्वतःची मुलगी वकील आहे. दत्तक घेतलेल्या मुलांपैकी काहीजण डॉक्टर झाले तर काहीजण इंजिनीयर,वकील झाले आहेत. सिंधुताईंनी अनाथ मुलांचे पालन पोषण करण्यासाठी अनेक अनाथ आश्रम काढले. समाजसेविका म्हणून त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

सिंधूताई सपकाळ वर ५०० शब्दात निबंध | Essay on Sindhutai sapkal in marathi in 500 words

सिंधुताई सपकाळ यांच्यामध्ये उत्तम संवाद कौशल्य होते. त्यामुळे त्या विविध ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलायच्या आणि तसेच व्याख्याने देखील द्यायच्या. 2010 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट काढण्यात आला. त्या चित्रपटाचे नाव मी सिंधुताई सपकाळ असे आहे.

सिंधुताईंनी वेगवेगळ्या ठिकाणे अनेक संस्था स्थापन केल्या. त्यांच्या पहिल्या संस्थेचे नाव “ममता बाल सदन” हे आहे. त्यांनी या संस्थेची स्थापना कुंभारवळण या गावांमध्ये केली. अशाप्रकारे अनाथांचे पालन पोषण करून त्यांच्या जीवनाला आसरा दिला. सिंधुताई ला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांना अग्रगण्य सामाजिक योगदान करता पहिला पुरस्कार मिळाला.

सिंधुताई ला अनेक पुरस्कार मिळू लागले. त्यातील काही पुरस्कार रकमेच्या स्वरूपात मिळाले ती रक्कम सिंधुताई ने आश्रमासाठी वापरली. त्यांनी अनाथ मुलांचे पालन पोषण केलेे. त्यांचे आयुष्य मार्गाला लावले म्हणून सिंधुताई चे नाव “अनाथ मुलांची आई” असे पडले. सिंधुताई सपकाळ यांना माई म्हणून देखील ओळखली जाते.

सिंधुताई या समाज सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सिंधुताई देखील कविता लिहित असत. त्यांच्या कवितांमध्ये जीवनाचे संपूर्ण सार आढळते. त्यांच्या पतीने घराबाहेर काढल्यानंतर त्यांच्या आईने घरात आधार दिला असता तर त्या आज इतक्या मुलांचे आई बनल्या नसत्या. सिंधुताई भाषणात आपली कहाणी इतरांना प्रेरणा देण्यासाठी सगळीकडे सांगायच्या. त्यांचे सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मुलांसोबत राहणे,त्यांचे स्वप्न साकार करणे. या गोष्टी त्यांना अतिशय आनंद वाटायचा.

Leave a Comment