पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh :- पुस्तके हे आपले गुरू असतात. त्यामुळे शिक्षकानंतर जर सर्वात जास्त ज्ञान मिळविण्याचा आपल्यासाठी कोणता स्रोत असेल तर तो म्हणजे पुस्तक. पण हेच पुस्तक जे आपल्याला शब्दरुपी ज्ञान देत असते ते पुस्तक बोलू लागले तर…

नमस्कार मंडळी ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी पुस्तकाचे आत्मवृत्त / मनोगत मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh हा निबंध लिहिला आहे. या निबंधातून मी स्पष्ट केले आहे की जर पुस्तक बोलू लागले तर काय होईल, ते आपल्याशी काय बोलेल.

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh (४०० शब्दात)

Shetkaryache atmavrutta marathi nibandh
शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

मला नवनवीन गोष्टीची आणि सुंदर कवितांची पुस्तके वाचायला खूप आवडतात. त्यामुळे मी शाळा सुटली की नेहमी अर्धा तास शाळेच्या वाचनालयात गोष्टींची आणि कवितांची पुस्तके वाचत बसत असे.

मी एके दिवशी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेतील वाचनालयात पुस्तक वाचण्यासाठी गेलो. तेथील एका कपाटातून पुस्तक काढत असताना चुकून ते पुस्तक माझ्याकडून खाली पडले..तेवढ्यात आई गं…! असा आवाज आला.

त्यामुळे कोण बोलले म्हणून मी इकडे तिकडे पाहत होतो. पण पुन्हा आवाज आला “अरे, इकडे तिकडे काय पहात आहेस. मीच बोलतोय तुझा जवळचा मित्र पुस्तक.” असे बोलून त्याने आपले पुस्तकाचे आत्मवृत्त / पुस्तकाचे मनोगत pustakache atmavrutta marathi nibandh सांगायला सुरुवात केली.

माझे नाव रंजक गोष्टी आहे. मी खूप दिवसांपासून या वाचनालयात पडून आहे. इथे माझी कुठलीही साफ सफाई नव्हती. शिवाय माझी काळजीही कुणी घेत नसे. त्यामुळे खूप धूळ माझ्यावर साचली होती, मी अगदी धुलीखली दबून गेलो होतो.

पण जेंवापासून तू या वाचनालयात यायला लागलास तेंव्हा कुठे माझ्या जगण्याला अर्थ आला. या वाचनालयात एवढी सारी पुस्तके असताना देखील तू वाचण्यासाठी माझी निवड केलीस, तो दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. खरच त्यादिवशी मला स्वतःचा खूप अभिमान वाटला. मी देखील काही लोकांसाठी खूप आवडता आहे, याची मला जाणीव झाली.

माझा जन्म मुबई शहरातील एका पुस्तकाच्या कारखान्यात झाला आहे. तेथेच माझी संपूर्ण रचना तयार करण्यात आली. छपाई मशिनद्वारे माझ्या पानावर छान छान गोष्टी छापण्यात आल्या. सुंदर चित्रांनी युक्त आकर्षक असे माझे मुखपृष्ठ बनवण्यात आले आणि असे माझे रूप तयार झाले.

या वाचनालयात येण्यापूर्वी मी मुबई शहरातील एका पुस्तक प्रदर्शनात ठेवलेला होतो. तेथे नेहमी हजारो लोक यायची. विविध पुस्तके चाचपायची. त्यात एखादे कुणीतरी मलाही उघडून पाहायचे. माझे एकदोन पाने पाहायचे आणि मला तिथेच टाकून समोर जायचे.

कुणीही माझी काळजी करायचे नाही. मी जर खाली पडलो तर मला कुणी उचलायचे देखील नाही. तसेच मला तुडवून अनेक लोक समोर जायचे. माझी काळजी घेणारा मला कुणीही मित्र मिळाला नाही.

पण जेंव्हा पासून मी या शाळेतील वाचनालयात आलो आहे तेंव्हापासून तूच माझा अगदी जवळचा मित्र बनला आहेस. तूच माझ्यावर साचलेली धूळ साफ करून मला वाचनासाठी घेतलेस. मला नेहमी व्यवस्थित माझ्या ठिकाणी ठेवलेस. मी जर खाली पडलो तर मला उचलून माझ्या जागी ठेवलेस. जेंव्हा पासून तू माझा मित्र बनला आहेस तेंव्हापासून मी खूप आनंदात आहे.

तू जेवढी माझी काळजी घेतोस तेवढी काळजी माझी आजपर्यंत कुणीच घेतली नव्हती. त्यामुळे माझी तुझ्याकडे एकच विनंती आहे की तू जे वर्तन माझ्यासोबत केलेस, तेच तू सर्व पुस्तकांशी ठेव. तुझ्याकडे असलेल्या सर्व पुस्तकांची तू अशीच काळजी घे, तुला कधीही ज्ञान कमी पडणार नाही.

देव सर्व पुस्तकांना असाच मित्र किंवा मालक देवो ! असे बोलून त्या पुस्तकाने त्याचे बोलणे थांबवले…

पुस्तकाचे हे शब्द ऐकून मला खूप प्रसन्न वाटले. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh (६०० शब्दात)

मला वाचनाचा खूप छंद आहे त्यामुळे माझ्याकडे जवळपास सर्वच प्रकारचे पुस्तके आहेत. तसेच माझ्या आवडीच्या काही कादंबऱ्या देखील माझ्याकडे आहेत. मी नेहमीप्रमाणे रविवारी माझे पुस्तकांचे कपाट साफ करत होतो. माझे सर्व पुस्तके व्यवस्थित क्रमवार लावत होतो. तेवढ्यात माझी नजर एका पुस्तकाकडे गेली, त्यावर खूप धूळ बसलेली होती. मी ते पुस्तक साफ केले आणि वाचण्यासाठी टेबलावर ठेवले.

मी ते पुस्तक खूप दिवसापूर्वी घेतलेले होते पण काही कारणास्तव अर्धेच वाचलेले होते. ते पुस्तक इतिहास या विषयाचे होते. ते पुस्तक वाचत असताना मला अचानक आवाज आला. नमस्कार ! मी पुस्तक बोलतोय.. असे बोलून पुस्तकाने त्याचे आत्मवृत्त (pustakache atmavrutta marathi nibandh) सांगायला सुरुवात केली.

माझं नाव प्राचीन भारताचा इतिहास असे आहे. माझा जन्म पुण्यातील एका पुस्तक निर्मिती कारखान्यात झालेला आहे. दोन तीन लेखकांनी मिळून माझी निर्मिती केलेली आहे.

सुरुवातील माझे पाने एकत्रित करून त्यावर छपाई मशीन द्वारे लेखकांनी लिहिलेले शब्द छापले गेले. नंतर माझ्या सर्व पानांना एकत्रित टाचन पिन द्वारे जोडले गेले. त्यावेळेस मला फार वेदना झाल्या. कारखान्यात माझ्या सारखीच अनेक पुस्तके छापली जास्त होती.

नंतर आम्हा सर्वांना संच करून पुस्तकाच्या दुकानात विकण्यासाठी पाठवण्यात आले. मी पुण्यातील आप्पा बळवंत चौक येथील एका मोठ्या पुस्तक दुकानात पोहचलो. मला खूप आनंद झाला. तेथे इतर खूप सारे पुस्तके होती. प्रत्येकाचे नाव वेगवेगळे होते. मला त्या पुस्तकातील एका रखाण्यात ठेवण्यात आले.

त्या दुकानात दररोज खूप सारे लोक यायचे, त्यांना हवी ती पुस्तके विकत घ्यायचे आणि निघून जायचे. ज्या पुस्तकांची विक्री व्हायची त्यांना नवीन मालक मिळत असे आणि त्यांची त्या दुकानातून सुटका देखील होत असे त्यामुळे त्या पुस्तकांना खूप छान वाटायचे.

माझी जेंव्हा निर्मिती झाली तेंव्हा मला वाटले होते की माझ्यावर लिहिलेला इतिहास वाचण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता असेल मला लवकरच नवीन मालक मिळेल. पण तसे काहीच झाले नाही. मी खूप दिवसापासून याच दुकानात धूळ खात पडून होतो.

मला नेहमी वाटायचे असा एखादा तरी व्यक्ती असेल ज्याला माझ्यावर लिहिलेला शुर वीरांचा इतिहास वाचायला आवडेल. मी नेहमी त्या व्यक्तीची म्हणजे माझ्या नवीन मालकाची वाट पाहत असे .

एका दिवशी माझ्या शोधात तू तिथे आलास. माझी विचारपूस केलीस आणि मला त्या दुकानातून तुझ्या घरी घेऊन गेलास. माझी त्या दुकानातून सुटका झाली होती आणि मला एक नवीन मालक मिळाला होता. त्यामुळे मी अगदीच आनंदात होतो.

मला वाटले होते तू माझे नियमित वाचन करशील, माझी काळजी घेशील आणि माझ्यावर आता धूलही साचून राहणार नाही. सुरूवातीला तू मला घरी आणल्यानंतर तू देखील खुप खुश होतास आणि माझ्यावरील इतिहास वाचायला उत्सुक देखील !

पाहिले आठ – दहा दिवस तू माझे नियमित वाचन केलेस, माझी काळजी घेतलीस, माझा पुष्टा खराब होऊ नये म्हणून मला कव्हर लावलेस. माझे वाचन झाले की तू मला व्यवस्थीत टेबलावर ठेऊन देत असे.

पण त्यातच तुझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या त्यामुळे तू मला पुस्तकाच्या कपाटात ठेवलेस आणि तुझा परीक्षेचा अभ्यास करायला लागलास. मला वाटले होते की तू परीक्षा संपल्या की लगेच मला वाचण्यासाठी बाहेर काढण्यात येईल.

पण तसे काही झाले नाही. तुला माझा विसर पडला. तू मला तसेच अर्ध्यावर सोडून इतर पुस्तके वाचण्यास सुरुवात केलीस. त्यामुळे मला खूप दुःख झाले. मी पूर्वीप्रमाणेच एका कपाटात कैद झालो, माझ्यावर धूळ साचायला सुरू झाली. धुळीने माझे अंग अगदी घान झाले होते, माझा जीव या कपटामध्ये गुदमरत होता. मला वाटले होते माझा याच कपाटात शेवट होतो की काय ?

पण आज पुन्हा योगायोगाने आपली भेट झाली. तुला माझे स्मरण झाले आणि तू मला साफ करून परत वाचण्यासाठी बाहेर काढलेस. नाहीतर मला वाटले होते की मला आता कुणीही वाचणार नाही. माझ्यावर धूळ बसून, माझे पाने कुईजून माझा अंत होणार. येथेच माझा शेवट होणार.

पण आज तू मला पुन्हा मुक्त केलेस त्यामुळे मी खूपच आनंदीत आहे. पण तुला माझी एक विनंती आहे, माझं एकशील का ?

माझी तुला एवढीच विनंती आहे की तू हे पुस्तक वाचून झाल्यास कृपया कपाटात किंवा अशा ठिकाणी मला ठेऊ नकोस जेथे माझ्यावर धूळ बसेल. त्यापेक्षा तु असे कर की हे पुस्तक तू तुझ्या अशा मित्राला दे की त्याला माझ्यावर लिहिलेला इतिहास वाचण्यात उत्सुकता असेल आणि त्याही मित्राला विनंती कर त्याचे पण वाचून झाल्यास त्याच्या पुढील मित्राला हे पुस्तक दे.

त्यामुळे मी नेहमी वाचला जाईल. मी कुठे कैदही होणार नाही आणि माझ्यावर धुळही साचणार नाही ! येवढे बोलून पुस्तकाने त्याचे बोलणे थांबवले…

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला पुस्तकाचे मनोगत / पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakachye atmavrutta marathi nibandh या विषयावर दोन निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

पुस्तकाचे आत्मवृत्त pustakachye atmavrutta marathi nibandh हा लेख तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment