नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध | नदी बोलू लागली तर…मराठी निबंध (nadiche atmavrutta marathi nibandh)

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा नदी बोलू लागली तर…मराठी निबंध nadiche atmavrutta marathi nibandh :- नदी ही निसर्गाने मानवास दिलेली सर्वोत्तम भेट आहे. नदी ही मानवासाठी जीवनदायिनी आहे. तिच्यामुळे आज कित्येक सजीवांना पिण्यासाठी पाणी मिळते. मानव देखील नदीतील पाण्याचा शेतीसाठी, उद्योगधंद्यात, आणि स्वच्छतेसाठी वापर करत असतो.

पण आज नद्यांचे स्वरूप बदलून गेले आहे. नद्यांची अवस्था अत्यंत खराब होत चालली आहे जणू त्यांचे एखाद्या मोठ्या गटरमध्ये विलागिकरण झाले आहे. नदीला जर वाचा असली असती तर ही तिची दयनीय अवस्था पाहून ती काय बोलली असती? ही अवस्था पाहून नदी बोलू लागली तर…

नमस्कार मंडळी आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा नदी बोलू लागली तर…मराठी निबंध (nadiche atmavrutta marathi nibandh) या विषयावर दोन तीन निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध | नदी बोलू लागली तर… Nadiche atmavrutta marathi nibandh

मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या गावाकडे गेलो होतो. एके दिवशी सायंकाळी असेच खूप बोर होत आहे म्हणून मी आमच्या गावच्या नदीच्या किनाऱ्यावर फिरायला गेलो.

मी लहानपणी नेहमी या नदीकिनारी माझ्या बाबांसोबत फिरायला यायचो. येथील वातावरण खूपच शांत आणि हवेशीर असायचे. या नदीच्या परिसरात खूप सारी झाडे होती. शिवाय नदीचे पात्र देखील खूप स्वच्छ आणि सुंदर होते. त्यामुळे येथे खूप प्रसन्न वाटायचे. यावेळेस मी खूप वर्षानंतर म्हणजेच जवळपास १० – १५ वर्षानंतर गावी आलेलो होतो.

पण यावेळेस नदीचे स्वरूप मात्र काही वेगळेच दिसत होते.नदीचे पाणी आटत चालले होते शिवाय नदीचे पात्र देखील खूपच अस्वच्छ दिसत होते. हे कश्यामुळे झाले असावे याच विचारात मी रमलो होतो तेवढ्यात मला नदीतून आवाज आला… कसला विचार करतोयस? माझी ही दयनीय अवस्था कशी झाली याचाच ना? थांब तुला मी माझी नदीची आत्मकथा सांगते. असे बोलून नदीने तिचे आत्मवृत्त (nadiche atmvrutta marathi nibandh) सांगायला सुरुवात केली….

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध | नदी बोलू लागली तर… Nadiche atmavrutta marathi nibandh (७००+ शब्दात)

Nadiche atmavrutta marathi nibandh
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध

माझं नाव गोदावरी आहे. तसे तर लोक मला अनेक नावांनी ओळखतात. गंगा, नदी, सरिता, राघिनी, तनुजा, तटीनी ही काही माझीच नावे आहेत. माझा जन्म उंच डोंगरातून झाला आहे. ज्यावेळेस मी डोंगरातून उगम पावले त्यावेळी माझे स्वरूप अत्यंत लहान होते, मी एक छोटासा झरा होते.

पण जशी जशी मी समोर वाहत राहिले माझे पात्र विस्तारत गेले. डोंगरदऱ्यात म्हणजेच माझ्या उगम स्थानापासून मी तुम्हा मनुष्यवस्ती पर्यंत वाहत आले. तुमची जीवनदायिनी बनले. पण मला तुमच्यापर्यंत यायला खूप कष्ट सोसावे लागले. मला वाटेत डोंगर, दऱ्या, मोठी दगडे, झाडे – झुडपे या सर्वांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

पण मी थांबले नाही. निरंतर चालतच राहिले, प्रत्येक दुःख सहन केले तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी, तुमची जीवनदायिनी बनण्यासाठी. आज मी लाखों लोकांची जीवनदायिनी आहे. ज्या पाण्याला तुम्ही मनुष्यलोक अमृत म्हणता ते माझीच देन आहे. सर्वच जीव – जंतू, पशू – पक्षी, प्राणी, मनुष्य पाण्यासाठी माझ्यावर अवलंबून आहेत.

मी सर्वांनच माझ्या पाण्याचा आस्वाद घेऊ देते. कुणाचीही तिरस्कार करत नाही. माझ्यासाठी सृष्टीतील सर्व जीव एक समानच आहेत. माझे मन खूप साफ आणि मोकळे आहे. मी कुठलाही विचार न सतत करता वाहत राहते. माझे कार्य नित्य नेमाने करत असते.

तुम्ही माणसांनी देखील माझ्याकडून ही सीख घ्यायला हवी. ज्याप्रमाणे मी कुठलीही मनात इच्छा न ठेवता मोकळ्या मनाने वाहत राहते. माझे काम नित्य नेमाने करत राहते. तुम्ही सुद्धा तुमचे काम – कार्य नियमित आणि नित्य नेमाने करायला हवे. काम करत असताना फळाची अपेक्षा अजिबातच ठेवू नका. फक्त स्वतःचे काम करत रहा. एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

पण तुम्ही लोक फार आळशी असता. तुम्हाला वाटते की मी माझे कार्य करायला सुरुवात केली की लगेच मला यश, पैसा, प्रसिद्धी मिळावी. तुमच्यात अजिबात संयम नसतो. कार्य चालू केल्यानंतर काही काळातच ते सोडून देता, यश मिळत नाहीये म्हणून हार मानता, खचून जाता. यापुढे कधीही असे विचार आले तर माझ्याबद्दल नक्की विचार करा.

मी अनेक जीव जंतूचे निवासस्थान आहे. त्यामुळे कित्येक लोकांची भूक देखील भागवते. तुम्ही मनुष्य लोक माझ्यातील मासे, खेकडे खाऊन तुमचे पोट भरता. जंगलातील अनेक प्राणी अन्नासाठी माझ्यावर अवलंबून असतात.

माझ्यातील पाणी वापरूनच आज शेत शिवार समृध्द होत आहेत. शेतात हिरवीगार पिके आनंदात डोलत आहेत. माझ्यामुळेच आज कित्येक कारखाने चालत आहेत. या कारखान्यासाठी माझेच पाणी वापरले जाते.

माझ्याच पाण्यापासून तुम्ही लोक वीज निर्मिती, ऊर्जा निर्मिती करता. तुमची बरीचशी कामे माझ्याशिवाय होत नाहीत.

पूर्वी मी खूप समृध्द आणि प्रसन्न असायचे व दुथडी भरून वहायचे. पण आज माझे स्वरूप अत्यंत दयनीय आहे. तुम्ही माणसांनी स्वतः च्या हवासापोटी माझी ही अवस्था केली. माझ्यात घरातील सांडपाणी, शहरातील गटारीचे पाणी, कारखान्यातील केमिकल युक्त विषारी द्रव्य, माझ्यात सोडले. मला पार दूषित आणि घाणेरडे केले. हीच केली का तुम्ही माझ्या उपकाराची परतफेड? तुम्ही लोक मला देवी मानता, माझी पूजा करता. मग देवीला कुणी असे दूषित आणि घाणेरडे करत का?

मी तुमच्यासाठी किती कष्ट सोसले उंच डोंगरातून अनेक अडथळचा सामना करत, येवढं लांबचा प्रवास करत तुमच्यासाठी इतापर्यंत आले आणि तुम्ही माझ्यासोबत असे वर्तन केले. तुम्हाला हे पटतय का?

तुम्ही लोकांनी माझी फार वाईट अवस्था केली आहे. त्यामुळेच आज माझे नदीपात्र अत्यंत दूषित झाले असून त्यातील पाणी आटत आहे. याची तुम्हाला एक दिवस किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे. आजकाल जो पाऊस कमी पडतो आहे, दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे, निसर्ग कोप करत आहे, हे सर्व याचेच परिणाम आहेत.

तुम्हा माणसाकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही परिस्थिती बदलवू शकता. मला काही सोने – नाने, पैसा, संपत्ती नकोय. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला स्वच्छ ठेवावे, माझा परिसर दूषित करू नये… कृपा करून मला माझे आनंदाने जीवन जगू द्या !

येवढं ऐकल्यानंतर अचानकच आवाज बंद झाला अन् मी शुध्दीवर आलो….

मला हे नदीचे आत्मवृत्त वाचून खूपच वाईट वाटले. आपण मनुष्य लोक किती स्वार्थी असतो न…स्वतच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा गैरवापर करतो. नदीची झालेली अवस्था खूपच वाईट आहे. मनुष्याने नदिसोबत असे करायला नको होते ! असे बोलून मी ही तिथून निघून गेलो…

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा नदी बोलू लागली तर मराठी निबंध (nadiche atmavrutta marathi nibandh) लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्ही पहिली ते बारावी पर्यंत कोणत्याही परीक्षेत लिहू शकता. तसेच यात तुम्ही तुमचे देखील विचार समाविष्ट करा म्हणजे निबंध आणखीनच सुंदर होईल.

नदीचे आत्मवृत्त / नदीची आत्मकथा (nadiche atmavrutta marathi nibandh) हा निबंध कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!!!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment