झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | jhade lava jhade jagva essay in marathi

jhade lava jhade jagva essay in marathi झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी : मित्रांनो आज आपण ज्या हवेशीर आणि थंड वातावरणाचा आनंद घेत आहोत त्याचे कारण म्हणजे झाडेच आहेत. आपल्या सर्व मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या देखील आपल्याला झाडाकडूनच मिळतात. पण आज झाडांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे आणि याचे अनेक वाईट परिणाम दिसून येते आहेत. त्यामुळे आज नव्याने झाडे लावण्याची खूप आवश्यकता आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आज आपण याच विषयावर म्हणजेच झाडे लावा आणि झाडे जगवा या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. झाडे वाचवा, झाडे लावा पृथ्वी वाचवा यासारख्या विषयावर देखील हा निबंध वापरला जाऊ शकतो. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल!

झाडे लावा झाडे जगवा निबंध १०० शब्दात | jhade lava jhade jagva essay in marathi in 100 words

वृक्ष हे मनुष्याचे खरे मित्र आहेत. त्यामुळेच संतांनी देखील वृक्षांची महता गायली आहे. संत तुकाराम वृक्षांचे महत्त्व समजून सांगताना म्हणतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती!” यातून त्यांनी वृक्ष हेच मनुष्याचे खरे मित्र आहेत.

वृक्षतोड केल्यावर काय होतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण ती थांबवणे गरजेचे आहे. झाडे वाचवण्यासाठी जंगलाचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. झाडे आपले नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात आणि आपले जीवन सुरक्षित ठेवतात. संत तुकाराम महाराजांनी मानवाचे आणि वृक्षाचे सुंदर शब्दात नाते सांगितल आहे. झाडांची संख्या कमी होत आहे आणि प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपण वृक्षांची लागवड केली पाहिजे आणि त्यांचे संगोपन ही केले पाहिजे.

झाडे लावा झाडे जगवा निबंध २०० शब्दात | jhade lava jhade jagva essay in marathi in 200 words

वृक्षांचे मानवी जीवनात खूप महत्व आहे. तासभर ऑक्सिजन देनाऱ्या डॉक्टरला आपण देव म्हणतो आणि जी वृक्ष आपल्याला संपूर्ण आयुष्यभर ऑक्सिजन पुरवतात त्यांची मात्र आपण कदर करत नाही, त्यांना किंमत देत नाही. आपण झाडे लावतो तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल , शुद्ध हवा मिळेल.

आज झाडांची संख्या कमी होत आहे त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे आणि त्याचे दुष्परिणाम मनुष्य भोगत आहे. त्यामुळे झाडे लावणे खूप गरजेचे आणि त्यापेक्षा त्यांचे संगोपन करणे ज्यास्त महत्वाचे आहे. प्रत्येक घरातून एक झाड जरी लावले तरी भरपूर झाडे होतील. रस्त्याच्या कडीने झाडे लावली आणि ती जपली तर त्याचा फायदा प्रवाश्यांना नक्कीच होईल आणि वातावरण देखील नियंत्रणात राहील.

झाडे लावा झाडे जगवा निबंध ३०० शब्दात | jhade lava jhade jagva essay in marathi in 300 words

झाडे ही एक नैसर्गिक संपत्ती आहे. झाडांना वृक्ष, तरू या नावांनी देखील ओळखले जाते. झाडामुळे परिसराला शोभा येते. त्यांच्यामुळेच निसर्गाचे सौंदर्य वाढते. वृक्षांना निसर्गाचा दागिना देखील म्हणता येईल. झाडे वाटसरुंना थंड आणि शीतल छाया देतात. त्यांच्या सावलीत आपल्याला स्वस्थ आणि आनंदी वाटते.

दाट झाडे मोठ्या प्रमाणात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणात ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण कमी होऊन प्रदूषण नियंत्रित राहते. तसेच वातावरणात कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण नियंत्रित राहिल्याने ग्लोबल वॉर्मिग, आम्ल वर्षा यासारख्या समस्याचे संकट देखील दूर होते.

सर्वात महत्वाचे म्हणजे मनुष्यांना जिवंत राहण्यासाठी लागणारा ऑक्सिजन हा वातावरणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे वृक्ष हे सर्वच सजीवासाठी जीवनदाता आहेत. जिथे जास्त झाडे असतात त्या ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू नियंत्रित राहतं.

झाडे लावा झाडे जगवा निबंध ५०० शब्दात | jhade lava jhade jagva essay in marathi in 500 words

मानवी जीवनामध्ये झाडांचे खूप महत्त्व आहे. आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन हा झाल्यामुळेच मिळतो. तसेच मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा या झाडापासून च पूर्ण होतात. झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले वरदान आहे. मानवी जीवन व झाड यांच्यात एक अतूट नातं आहे.

झाडांपासून मानवाला अनेक उपयोग होतात . झाडे आपल्याला लाकूड ,भाज्या ,फळे, फुले, थंडगार सावली, औषध, झाडाची साल यापेक्षा अधिक काही आपल्याला देतात. तसेच झाडांपासून आपल्याला फर्निचर, औषधी, फायबर यासारख्या खूप उपयोगी वस्तू देखील मिळतात.

आपल्याप्रमाणेच पशुपक्षी सुद्धा झाडांवर अवलंबून राहतात. अनेक पक्षी झाडांवर घरटी बांधून राहू लागतात. ऊन आणि पाऊस याच्या पासून बचाव करण्यासाठी ते झाडाचा निवारा घेतात. झाडावरची फळे आणि फुले खाऊन आपले पोट भरतात. वृक्ष सर्वांनाच मदत करतात ते मनुष्याप्रमाणे स्वार्थी नाहीत किंवा कुणाचा तिरस्कार ही करत नाहीत.

आपण मनुष्य लोक आपल्या स्वार्थासाठी त्यांचा कत्तल करतो तरीही ते आपल्याला थंड हवा आणि गोड फळे देतच राहतात. मनुष्याने वृक्षातील हा गुण अंगिकरण्यासारखा आहे. झाडे कमी होत राहिले तर ऑक्सिजन, पाणी व अन्न मिळणे सुद्धा कठीण होऊन जाईल.

म्हणून आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. झाडे हे निसर्गाचे सौंदर्य आहेे. त्यामुळे आपण हे निसर्गाचे सोंदर्य जपले पाहिजे आणि त्याचा आस्वाद देखील घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज आहे.

Leave a Comment