माझी शाळा मराठी निबंध (my school essay in marathi)

माझी शाळा मराठी निबंध (my school essay in marathi) :- नमस्कार मंडळी ! शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्वाची असते. आपल्यावर लहानपणी होणारे सर्व संस्कार या शाळेतून च होत असतात. येथून आपल्या भावी आयुष्याची शिदोरी आपल्याला मिळत असते , जी की संपूर्ण आयुष्यात आपल्या सोबत असते.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझी शाळा मराठी निबंध ( my school essay in marathi) वेगवेगळ्या शब्दात लिहून दिला आहे. हा निबंध तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल !

माझी शाळा निबंध १० ओळीत ( 10 lines on my school essay in marathi )

१) शाळा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कणा असते.

२) एक आदर्श नागरिक होण्यासाठी आवश्यक सर्व संस्कार आपल्याला शाळेतून च मिळतात.

३) माझ्या शाळेचे नाव भारतीय बाल विद्या मंदिर असे आहे.

४) माझी शाळा परभणी शहराच्या मध्यभागी स्थित आहे.

५) माझ्या शाळेमध्ये पाहिले ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग उपलब्ध आहेत.

६) माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूपच प्रेमळ आणि दयाळू आहेत. तसेच ते प्रसंगी खूप कडक देखील होतात.

७) माझ्या शाळेतील तीन मजली भव्य इमारत आहे. त्यात २५ पेक्षा जास्त वर्ग खोल्या आहेत.

८) माझ्या शाळेचे मुख्यद्यापक श्री धनावडे सर आहेत. ते स्वभावाने खूपच कडक आहेत.

९) माझ्या शाळेचा गणवेश देखील खूपच सुंदर आहे. आमच्या शाळेत गणवेश घालून येणे अनिवार्य आहे.

१०) माझी शाळा खूपच सुंदर आहे.

माझी शाळा मराठी निबंध my school essay in marathi (२०० शब्दात )

majhi shala nibandh: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेचे खूप महत्वाचे स्थान असते. मला देखील लहानपापासूनच शाळेत जायला खूप आवडते. मी लहानपणी ४-५ वर्षांचा असताना आमच्या गावातील अंगणवाडीत जात असे. अंगणवाडीत खूप छान छान गोष्टी आणि कविता ऐकायला मिळत असत. तेंव्हा पासूनच मला शाळेचा खूप लळा लागला आहे.

आता मी इयत्ता तिसरी वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ममता माध्यमिक विद्यालय असे आहे. माझी शाळा गंगाखेड शहरातील ममता कॉलनी येथे आहे. माझ्या शाळेची इमारत खूपच मोठी आहे. आमची शाळा दोन मजली आहे. तसेच तिसऱ्या मजल्याचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे काही पुढच्या वर्षी माझी शाळा तीन मजली होणार आहे.

माझ्या शाळेच्या पहिल्या मजल्यावर १२ वर्गखोल्या, एक मुख्यद्यापाक ऑफिस, संगणक कक्ष आणि शिक्षकांच्या विश्रांतीसाठी एक हॉल आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर देखील १२ वर्गखोल्या आहेत आणि एक प्रयोगशाळा देखील आहे.

माझ्या शाळेच्या समोर खूप मोठे मैदान आहे. तेथेच आमच्या शाळेचे सर्व खेळाचे आयोजन केले जाते. याच मैदानावर कबड्डी, खो खो आणि क्रिकेटचे सामने खेळले जाते. आमच्या शाळेने जिल्हा आणि राज्य पातळीवर अनेक खेळामध्ये पारितोषिके मिळवली आहेत.

मला माझी शाळा खूप खुप आवडते.

माझी शाळा मराठी निबंध my school essay in marathi (३०० शब्दात )

माझ्या आयुष्यात शाळेचे खूप महत्वाचे स्थान आहे. मी अनेक अविस्मरणीय अनुभव शाळेत असताना अनुभवले आहेत. माझ्यासाठी शाळा म्हणजे एक विद्येचे मंदिर आहे आणि त्यातील सर्व शिक्षक अगदी देवरुपी आहेत. कारण मला अवगत असलेली सर्व विद्या आणि ज्ञान मी याच विद्येच्या मंदिरातून मिळवले आहे.

माझ्या शाळेचे नाव भारतीय बाल विद्या मंदिर असे आहे. माझी शाळा परभणी शहराच्या मध्यभागी आहे. माझ्या शाळेची इमारत खूपच सुंदर आहे. माझी शाळा चौकोनी आकाराची आहे. तिन्ही बाजूला वर्गखोल्या आहेत आणि समोरच्या बाजूला शाळेचा मुख्य गेट आहे.

माझी शाळा (majhi shala nibandh) तीन मजली आहे. यात जवळपास ३० वर्गखोल्या आहेत. तसेच माझ्या शाळेत प्रशस्त वाचनालय, संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा देखील आहे. आमच्या शाळेची प्रयोगशाळा खूपच मोठी आणि सर्व उपकरणे युक्त आहे. यात प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य आणि केमिकल्स उपलब्ध आहेत. मी आजपर्यंत विज्ञानातील अनेक प्रयोग याच प्रयोग शाळेतून प्रत्यक्ष करून पाहिले आहेत.

आमच्या शाळेतील वाचनालय देखील खूपच भव्य आहे. यात सर्व भाषेतील आणि सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. शिवाय यात सर्व पुस्तके अगदी सोयीस्कर पद्धतीने ठेवलेली आहेत. प्रत्येक भाषेच्या पुस्तकाची वेगवेगळी दालने आहेत. त्यामुळे जे पुस्तक हवं आहे ते पुस्तक लवकरात लवकर मिळते.

मी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी वाचनालयातून एक पुस्तक वाचण्यासाठी घरी घेऊन जात असे. हे पुस्तक बहुधा एखाद्या रंजक गोष्टीचे असे. कारण मला शालेय जीवनात रंजक आणि अद्भुत गोष्टी वाचायला खूप आवडायच्या. मी ते पुस्तक आठवडाभर वाचून पुन्हा पुढच्या शनिवारी परत करत असे.

आमच्या शाळेतील संगणक कक्ष देखील खूपच आद्यवत आहे. यात अनेक संगणक आणि सर्व प्रकारची उपकरणे जसे की प्रिंटर, फॅक्स मशीन, स्कॅनर उपलब्ध आहेत. मी सर्वात पहिल्यांदा संगणक चालवायला याच शाळेतून शिकलो.

माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूपच प्रेमळ आणि दयाळू आहेत. असे असले तरी ते विद्यार्थ्यांना वचक बसावा यासाठी कित्येक वेळा कठोर देखील होतात, आवश्यक त्या ठिकाणी विद्यार्थांना शिक्षा देखील करतात.

माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप छान शिकवतात. ते विद्यार्थांना विषय अगदी सहजपणे समजावा यासाठी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन विषयातील संकल्पना स्पष्ट करतात. जेणेकरून विद्यार्थांना विषयातील कठीण संकल्पना देखील लवकर समजतील.

मी या शाळेतून अनेक अनुभव कमावले आहेत जे की माझ्या नेहमी स्मरणात राहतील. खरच सर्वांना हेवा वाटावा अशी माझी शाळा सुंदर आहे.

माझी शाळा मराठी निबंध my school essay in marathi (५०० शब्दात)

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. माझी शाळा परभणी जिल्यातील एका खेडेगाव ची आहे. माझी शाळा जरी जिल्हा परिषद म्हणजे सरकारी शाळा असली तरी सुद्धा ती एखाद्या खाजगी शाळेला लाजवेल अशीच सुंदर आहे.

माझ्या शाळेची इमारत एक मजली आहे. त्यात १० वर्ग खोल्या आणि एक मुख्याध्यापक कक्ष आहे. तसेच शाळेत एक स्वयंपाक घर देखील आहे. जेथे शाळेतील सर्व विद्यार्थांसाठी दुपारच्या जेवणाची सोय केली जाते. आमच्या शाळेतील दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीच्या वेळी आम्हाला खिचडी, गोड भात, कडी खिचडी, मटकी, वटाणे यासारखे खाऊ खायला मिळतात.

माझी शाळा माझ्या गावापासून २ किमी अंतरावर आहे. त्यामुळे मी व माझ्या गावातील काही मित्र आम्ही सर्वजण सायकलने शाळेत जातो. मित्रांसोबत मज्ज्या – मस्ती करत शाळेत जाण्यात खूपच आनंद मिळतो.

शाळेच्या वाटेत एक छोटा ओढा आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात कित्येक वेळा ओढ्याला पाणी आले की आमची शाळा बुडते. पण या कारणामुळे शिक्षक आमच्यावर कधीच रागावत नाहीत. ज्या दिवशी ओढ्याला पाणी येते, त्या दिवशी आम्ही ओढ्याच्या कडेला बसून मज्जा मस्ती – करतो. त्यामुळे शाळेत जाणे नकोसे कधीच वाटत नाही.

आमच्या शाळेच्या भिंतीवर खूप छान रंगरंगोटी केलेली आहे. त्यावर प्राणी आणि पक्ष्यांची सुंदर चित्र आहेत. तसेच काही भिंतीवर गणिताचे पाढे, उजळणी, मराठी बाराखडी यांचे चार्ट देखील बनवलेले आहेत. आम्ही चालत – बोलत ते चार्ट वाचत असतो.

आमची शाळा दोन एकर परिसरात बांधलेली आहे. शाळेची इमारत बदामी रंगाची आहे. इमारत छोटी जरी असली तरी खूपच सुंदर आहे. आमची शाळा इयत्ता सातवी पर्यंत आहे. आठवी पासूनचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

शाळेचा परिसर खूपच निसर्गरम्य असा आहे. शाळेच्या समोर छोटे मैदान आहे, त्याच्या कडेने फुलांची झाडे लावलेली आहेत. आम्ही दुपारच्या सुट्टीमध्ये या झाडांना पाणी घालतो. शाळेच्या समोर मैदानात तिरंगा ध्वज आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी शाळेत वेगळीच मज्जा असते. आम्ही या दिवसांमध्ये शाळेची स्वच्छ्ता करून शाळेची सुंदर सजावट करतो.

शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात अनेक मुले भाषणे देतात, गीत गातात. शाळेत सभागृह नाही. पण शाळेचे सर्व कार्यक्रम शाळेच्या मैदानात च खूप सुंदर साजरे केले जातात. त्यामुळे आम्हाला सभागृहाची कमतरता कधीच भासत नाही.

आमच्या शाळेचे मुख्यध्यापक श्री जाधव सर आहेत. ते खूप कडक आहेत पण मुलावर प्रेम देखील तेवढेच करतात. ते नेहमी आमच्या वर्गावर येऊन आम्हाला छान गोष्टी सांगत असतात. पण ते वर्गात आल्यानंतर शिस्तीचे खूप पालन करावे लागते कारण त्यांना बेशिस्तपणा आजिबात पसंद नाही. यामुळे ते कित्येक वेळा मुलांना शिक्षा देखील करतात.

शाळेतील इतर शिक्षक देखील खूपच चांगले आहेत. ते देखील आम्हाला खूप छान शिकवतात. आमच्या शाळेत अभ्यासाबरोबरच खेळला देखील तेवढेच महत्व दिले जाते. आमच्या शाळेत विविध खेळाची तयारी देखील करून घेतली जाते. यामुळे आजपर्यंत आमच्या शाळेने अनेक खेळात बक्षिसे मिळविली आहेत.

या शाळेने मला खूप काही दिले आहे. खूप सारे संस्कार मला या शाळेतून मिळाले आहेत. एक आदर्श नागरिक कसा असतो, मी याच शाळेतून शिकलो. शाळेतील अनेक सुंदर अनुभव माझ्या मनात साठवले आहेत. माझी शाळा मला खूप आवडते आणि ती माझ्यासाठी नेहमीच आदर्श असेल.

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझी शाळा मराठी निबंध (my school essay in marathi) याबद्दल माहिती दिली. यासाठी वेगवेगळ्या शब्दात तीन निबंध लिहून दिले आहेत. ते तुम्हाला नक्कीच आवडतील अशी अपेक्षा आहे.

तसेच माझी शाळा निबंध (my school essay in marathi) तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा निबंध तुमच्या मित्र – मैत्रिणीसोबत देखील शेअर करा, धन्यवाद…!!!

1 thought on “माझी शाळा मराठी निबंध (my school essay in marathi)”

Leave a Comment