माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi (१०००+ शब्दात)

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi :- पोपट हा पक्षी खूपच सुंदर आहे त्यामुळे तो जवळपास सर्वच लोकांना आवडतो. त्याचे मिटू मिटू… असे आवाज करणे कानाला अगदी मंत्रमुग्ध करत असते. पोपट हा पक्षी दिसायला जितका सुंदर आहे तितकाच त्याचा आवाज देखील गोड आणि मधुर आहे.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi वेगवेगळ्या शब्दात लिहून दिलेला आहे. यात पोपट पक्ष्यावर १० ओळीचा निबंध, २०० शब्दात, ३०० शब्दात आणि ५०० शब्दात असे चार निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

माझा आवडता पक्षी पोपट वर १० ओळीचा निबंध (10 lines essay on parrot in marathi)

१) पोपट या पक्ष्याला इंग्रजीत parrot असे म्हटले जाते.

२) पोपट हा पक्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान, नेपाळ यासारख्या अनेक देशामध्ये आढळतो. तसेच तो युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये देखील बऱ्याच देशात आढळतो.

३) पोपट या पक्ष्याला भारत देशामध्ये मिटू, राघू, मैना या नावाने देखील ओळखण्यात येते.

४) देशभरात अनेक रंगाचे पोपट आढळून येतात.

५) भारत देशामध्ये आढळून येणारे पोपट पक्षी हे हिरव्या रंगाचे असतात.

६) पोपट हा पक्षी खूपच सुंदर दिसतो.

७) पोपटाला टोकदार आणि आकुड चोच असते. त्यामुळे पोपट हा पक्षी कठीण कवचाची फळे देखील फोडून खाऊ शकतो.

८) पोपटाला तिखट मिरची आणि पेरू खूप आवडतो.

९) पोपट हा पक्षी मिटू मिटू… असा मधुर आवाज काढतो.

१०) पोपट हा पक्षी मला खूप खूप आवडतो.

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi (२०० शब्दात)

imgonline com ua CompressToSize HCEazSPvqdgXg
पोपट पक्ष्यांवर निबंध

पोपट हा पक्षी खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. त्याचे रूप पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या मोहात पडतो. पोपट हा खूप लोकांचा आवडता पक्षी देखील आहे. पोपट हा हिरव्या रंगाचा असतो.

मला देखील पोपट हा पक्षी खूप खुप आवडतो. पोपटाला लाल रंगाची चोच असते. ही चोच खूपच टोकदार आणि समोरच्या बाजूला वाकलेली असते. त्यामुळे पोपट कितीही टणक कवचाची फळे खाऊ शकतो.

पोपटला फळे खायला खुप आवडतात. तो पेरू, चिकू, बोर, डाळींब यासारखी फळे खातो. तसेच त्याला तिखट मिरची खायला पण खूपच आवडते. पोपट हा पक्षी जंगलात, रानावनात दिसून येतो. तसेच पोपट हा पाळीव पक्षी देखील आहे. त्याला पाळणे अनेक लोक पसंद करतात.

पोपट हा पक्षी पाळल्यावर त्याला एका पिंजऱ्यात ठेवले जाते. त्या पिंजऱ्यात त्याच्यासाठी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था देखील केलेली असते. पिंजऱ्यात छोट्या वाटीत पाणी ठेवले जाते आणि पोपटाला खाण्यासाठी काही फळे ठेवली जातात.

पोपट हा पक्षी खूपच गोड आवाज काढतो. तसेच पोपट माणसांप्रमाणे बोलू देखील शकतो. तो शब्द एकूण जश्यास तसे बोलतो. अनेक वेळा तो राम राम, नमस्कार, गूड मॉर्निंग म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत देखील करतो. त्यामुळे खूप लोकांना पोपटाचे कौतुक वाटते.

पोपट हा पक्षी हिरव्या, लाल, गुलाबी, पिवळ्या अश्या अनेक रंगाचा असू शकतो. तर काही देशात रंगीबेरंगी पोपट देखील आढळून येतात. पोपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो खूपच शांत आणि संयमी असतो. पण त्याला त्रास दिल्यास तो प्रसंगी चोच देखील मारतो.

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi (३०० शब्दात)

लहानपणापासूनच मला पोपट हा पक्षी खूप आवडतो. पोपट हा पक्षी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो. त्याला राघू, मिटू असे अनेक नावे आहेत. पोपट हा पाळीव पक्षी आहे. जो व्यक्ती पोपट पाळतो तो देखील त्याच्या पोपटाला एखादे छान नाव ठेवतो.

मी लहान असताना सकाळी आणि सायंकाळी आमच्या घरासमोरील आंब्याच्या झाडावर खूप सारे पोपट यायचे. त्यांच्या किलबिलाटाने अगदी प्रसन्न वाटायचे. ते अंगणात पडलेले अन्नाचे कण खायचे आणि पून्हा आपल्या पुढील प्रवासाला मार्गक्रमण करायचे.

मी पोपट पक्ष्याला नियमित पहायचो. त्यामुळें माझे त्यांच्याबद्दल निरक्षण अगदी हुबेहूब आहे. पोपट पक्षी हे हिरव्या रंगाचे असतात. तसे तर पोपट पक्षी अनेक रंगामध्ये आढळतात. पण भारत देशामध्ये बहुदा हिरव्या रंगाचे पोपट आढळतात. त्यांची चोच बाकदार असून फारच टोकदार असते.

पोपटाच्या मानेवर काळया रंगाच्या पट्ट्या असतात. पाठीवर हिरवे पंख असतात. पोपट पक्ष्यांचे पाय जरी ओबडधोबड असले तरी पण ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असतात. पोपटाच्या पायांची रचना अशा प्रकारे असते की ते सहज दोन पायांच्या मध्ये झाडाची फांदी ठेवून त्यावर बसू शकतात.

शिवाय पोपट (essay on parrot in marathi) हे कित्येक वेळा त्यांच्या पायाचा वापर अन्न धान्य उचलण्यासाठी देखील करतात. ते झाडाच्या खोडावर होल करून त्यात आपले घरटे बनवतात. पोपटाला सर्वच फळे आवडतात पण पेरू आणि मिरची ही त्यांची सर्वात जास्त आवडणारी फळे आहेत.

पोपट हे पक्षी रानावनात थवा करून राहतात. त्यांच्या झुंडमध्ये नर आणि मादी असे दोन्ही प्रकारचे पक्षी असतात. नर आणि मादी पोपट दोघेही सारखेच दिसतात. त्यांच्यात कुठलाच फरक नसतो. मादा पोपट एका वर्षात १०-१२ अंडे देऊ शकते.

पण आज पोपट हा पक्षी क्वचितच पाहायला मिळत आहे. पूर्वी ज्याप्रमाणे नियमित पोपट पक्षी पाहायला मिळायचे पण आज ते कधीतरी दिसतात. त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. पण पोपट पक्षी कमी होण्याची कारणे काय असावीत मी विचारात पडलो !

जगभरात पोपट या पक्ष्यांच्या ३०० पेक्षा देखील जास्त प्रजाती आहेत. यामध्ये लाल, पोपटी, पिवळ्या, निळ्या अशा विवध रंगांनी नटलेली सुंदर असे पोपट पक्षी आढळतात. पण आज त्यातील फक्त काहीच प्रजाती अस्तित्वात आहेत. यातील बऱ्याच प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

याला केवळ मानवच जबाबदार आहे. मानवाने विकासाच्या नावाखाली ध्वनी प्रदुषण, हवा प्रदुषण, पाणी प्रदुषण यासारख्या समस्या निर्माण केल्या. त्यामुळे पक्ष्यांच्या जगण्यावर मर्यादा आल्या. शिवाय मानवाने विकासाच्या हावसापोटी कित्येक जंगले नष्ट केली. त्यामुळे पोपट पक्ष्यांचे राहण्याची ठिकाणे नष्ट झाली. त्यामुळेच आज पोपट पक्ष्यांच्या खूप प्रजाती नष्ट नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे पोपट या पक्ष्याचे संरक्षण करणे फार गरजेचे आहे.

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi (५०० शब्दात)

पोपट हा पक्षी सर्व पक्षात उठून दिसणारा पक्षी आहे. त्याची लाल रंगाची चोच त्याला खूप शोभून दिसते शिवाय ती त्याला खूपच उपयुक्त ठरते. कारण त्याची चोच खूपच मजबूत आणि टोकदार असल्यामुळे तो कितीही टणक फळे दाताने कुर्तुडून खाऊ शकतो.

मला पोपट पक्ष्याबरोबर खेळायला खूप आवडते. मी लहान असताना माझ्या बाबांनी एक छोटे पोपटाचे पिल्लू पाळण्यासाठी घरी आणले होते. ते पिलू दिसायला खूपच सुंदर होते. त्याचे मांजर, बोक्यापासून संरक्षण व्हावे यासाठी आम्ही त्याच्यासाठी एक पींजर्याची व्यवस्था केली आणि त्या पोपटाच्या पिलाला त्या पिंजऱ्यात ठेवले.

सुरूवातीला ते पिल्लू त्या पिंजऱ्यात रात्रभर मिटू मिटू करून ओरडत असे. त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटायची. पण नंतर त्याला सवय झाली. तो तो त्या पिंजऱ्यात शांतपणे राहू लागला.

मी त्या पोपटाच्या पिलाची खूप काळजी घेत असे. त्याला पिण्यासाठी वाटीत पाणी ठेवत असे आणि त्याला खाण्यासाठी फळे देखील ठेवत असे. कधी कधी मला खायला दिलेली फळे देखील मी त्यालाच ठेवत असे. माझी आणि त्या पोपटाची खूप छान गट्टी जमली होती.

आता तर पोपटाला त्या पिंजऱ्यात करमायला देखील लागले होते. मी नेहमी त्याच्यासोबत खेळत असे, त्याच्याशी बोलत असे. पोपट देखील माझ्या बोलण्याची नक्कल करत असे. पोपट हा पक्षी खूप हुशार असतो. तो माणसाप्रमाणे बोलू देखील शकतो.

माझे बाबा देखील पोपटाला दररोज बोलायला शिकवायचे. पोपट रामराम, नमस्कार असे काही शब्द बोलायला शिकला होता. तो घरी नवीन येणाऱ्या पाहुण्यांना सुस्वागतम देखील म्हणत असे. त्यामुळे घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्याचे खूप कौतुक वाटे.

पोपट ज्यावेळेस मोठा झाला त्यावेळी आम्ही त्याला पिंजऱ्यातून मुक्त देखील केले. कारण त्याचे देखील आयुष्य असते, त्याला देखील मनसोक्त फिरावे वाटते, उंच हवेत उडावे वाटते, रानातील गोड फळांचा मेवा खावासा वाटतो. म्हणून आम्ही त्याला पिंजऱ्यातून मुक्त केले.

त्यावेळी मला खूपच दुःख झाले होते. आमच्या घरातून कुणीतरी आम्हाला सोडून दूर गेले आहे असे आमच्या सर्व परीवरालाच वाटत होते. कारण त्या पोपटाने आपल्या मंजुळ आवाजाने सर्वानाच आपलेसे केले होते, आमच्या घरातील सर्वानाच त्याची सवय झाली होती.

मला वाटले होते आता तो पोपट पक्षी कधीच परत येणार नाही. आम्हाला सोडून गेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमिप्रमाने मी बालकनित बसून दात घासत होतो. अचानकपणे नेहमीसारखा मिटू मिटू असा आवाज माझ्या कानावर पडला. पण लगेच खिडकीच्या दिशेने धावलो.

मी पाहिले की घरासमोरच्या नारळाच्या झाडावर एक पोपट पक्षी बसलेला आहे. मी लगेच ओळखले तो आमचाच राघू आहे. ही वार्ता मी खाली जाऊन सर्वांना सांगितली. सर्वानाच खूप आनंद झाला. सर्व घरासमोरील अंगणात येऊन आमच्या राघुकडे पाहत होते. सर्वानाच विश्वास पटला की तो आपला राघुच आहे.

बाबांनी सांगितले की पक्षी खूप प्रामाणिक असतात. आपण जर त्यांच्यावर प्रेम केले तर ते देखील आपल्यावर विश्वास ठेवतात. आपल्या प्रेमाची, उपकाराची जाणीव ठेवतात.

आजही तो पोपट आमच्या दारात नियमित सकाळ संध्याकाळ न चुकता येतो. दारात पडलेले धान्य खातो, आमच्या आंगा खांद्यावर खेळतो आणि निघून जातो. मला त्या पोपटाच्या प्रामाणिकपणा खूप आवडला. म्हणूनच मला तेंव्हापासून पोपट हा पक्षी (essay on parrot in marathi) खूप खुप आवडतो.

टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध essay on parrot in marathi हा निबंध वेगवेगळ्या शब्दात लिहून दिला आहे. हे सर्व निबंध तुम्हाला खूप आवडतील अशी आशा आहे.

माझा आवडता पक्षी पोपट essay on parrot in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!!!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment