माझे आवडते शिक्षक मराठी निबंध my favourite teacher essay in marathi :- नमस्कार मंडळी ! शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच खास असतात. कारण प्रत्येकाचे आयुष्य घडवण्यामागे आई वडील नंतर जर कुणी व्यक्ती असेल तर तो म्हणजे शिक्षक असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी एखादा तरी शिक्षक आदर्श असतोच जो की त्याला सर्वात जास्त आवडत असतो.
आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी माझे आवडते शिक्षक (my favourite teacher essay in marathi) या विषयावर सुंदर शब्दात निबंध लिहून दिला आहे. यात वेगवेगळ्या शब्दात दोन तीन निबंध लिहून दिलेले आहेत. त्यातील निबंध तुम्हाला नक्कीच आवडतील.
Table of Contents
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध वर १० ओळी ( 10 lines on my favourite teacher essay in marathi)
१) श्री धापसे सर हे माझे आवडते शिक्षक आहेत. ते इतिहास हा विषय शिकवतात.
२) धापसे सर स्वभावाने खूपच गरीब आणि शांत आहेत. ते आम्हाला कधीही मारत नाहीत.
३) धापसे सर खूपच उंच आहेत व त्यांचे वय ३० वर्ष जवळपास आहे.
४) धापसे सर खूपच छान इतिहास विषय शिकवतात.
५) ते शिकवताना इतिहासात घडलेला प्रत्येक प्रसंग प्रत्यक्ष आमच्या डोळ्यासमोर आणतात.
६) ते आमच्याकडून इतिहास या विषयाची खूप छान तयारी करून घेतात.
७) धापसे सर इतिहासात मास्टर आहेत. त्यांना इतिहास या विषयाची खूपच सखोल माहिती आहे.
८) ते आमच्याकडून वेळोवेळी गृहपाठ देखील करवून घेतात.
९) शिकवताना ते इतिहासातील प्रत्येक प्रसंग अगदी सखोलपणे स्पष्ट करतात. त्यांना शिकवलेली प्रत्येक गोष्ट माझ्या लगेच लक्षात बसते.
१०) इतिहास या विषयाची माझ्या मनातील भीती श्री धापसे सर यांच्या मुळेच निघून गेली. म्हणून मला ते खूप आवडतात.
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध my favourite teacher essay in marathi ( २०० शब्दात )
श्री वसंत शिंदे सर हे माझे आवडते शिक्षक (my favourite teacher essay in marathi) आहेत. मला ते इंग्रजी हा विषय शिकवतात. शिंदे सर इंग्रजी विषयामध्ये खूपच हुशार आहेत. शिवाय ते खडखड इंग्रजी देखील बोलतात.
ते शिकवताना नेहमी आमच्याशी इंग्रजी भाषेत संवाद साधण्यात मग्न असतात. त्यांचे प्रयत्न असते की प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी हा विषय समजावा. त्यासाठी ते प्रयत्न देखील करतात. त्यांच्या मते इंग्रजी शब्द हे इंग्रजी भाषेचा पाया आहेत. त्यामुळे तुम्हाला जर इंग्रजी भाषा लिहायला आणि बोलायला शिकायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजी शब्दार्थ पाठ करावे लागतील.
शिंदे सर दररोज इंग्रजी तासिकेच्या शेवटी आम्हाला पाठ करण्यासाठी १० इंग्रजी शब्द देतात. पाठ न झाल्यास ते आम्हाला शिक्षा देखील करतात. मी नेहमी सर्व शब्द सर्वांच्या अगोदर पाठ करतो. त्यामुळे सर मला नेहमी शाबासकी देतात.
माझे इंग्रजी पूर्वी फारच कच्चे होते. मला इंग्रजी अजिबातच समजायचे नाही. पण शिंदे सर आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवण्यासाठी आल्यापासून मला आता इंग्रजी चांगले जमत आहे. ते खूप छान इंग्रजी विषय शिकतात. प्रत्येकाला समजावे यासाठी ते इंग्रजी वाक्यांचे अगदी सोप्या मराठी भाषेत रूपांतर करून समजावून सांगतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी सहज समजते.
शिंदे सर आमच्याकडून इंग्रजी लिखाणाची देखील चांगलीच तयारी करवून घेतात. ते आम्हाला इंग्रजी व्याकरण शिकवतात. तसेच आमच्याकडून इंग्रजी निबंध देखील लिहून घेतात. नंतर निबंधात झालेली चूक आम्हाला समजावून सांगतात व त्या ठिकाणी कोणता योग्य शब्द येईल ते पण सांगतात.
श्री वसंत शिंदे सरांमुळे माझ्या इंग्रजी वाचण्यात आणि लिहिण्यात खूप बदल झाला आहे. त्यामुळे मला शिंदे सर खूप आवडतात.
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध my favourite teacher essay in mrathi ( ३०० शब्दात )
प्रत्येक व्यक्तीच्या मनात शिक्षकाचे विशेष स्थान असते. प्रत्येक व्यक्ती शाळेत शिक्षकाकडून मिळालेली शिदोरी आयुष्यभर आपल्यासोबत वागवत असतो. प्रत्येक शिक्षक आपला विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी बनावा यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी ते शिक्षक त्या विद्यार्थ्यावर सर्व संस्कार करत असतो.
त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थी जीवनाचा शिल्पकार म्हणून ओळखले जाते. खरंच शिक्षक हे विद्यार्थांच्या जीवनाचे शिल्पकार असतात. कारण विद्यार्थांच्या यशामध्ये शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो.
माझ्याही आयुष्यात असेच एक शिल्पकार शिक्षक माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांचं नाव श्री कालिदास कदम सर आहे. ते आम्हाला इयत्ता दहावीच्या वर्गाला संस्कृत विषय शिकवायचे. त्यांनी लावलेली आम्हाला शिस्त आणि आमच्यावर केलेले संस्कार आजही मला भावी आयुष्यात खूप महत्वाचे ठरत आहेत.
आज सर रिटायर्ड झाले आहेत. मी ही इंजिनिअर म्हणून एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. पण आजही मी सरांना विसरू शकलो नाही. त्यांचे वर्गातील सर्व अनुभव आजही माझ्या मनात जिवंत आहेत. त्यांनी आम्हाला लावलेली शिस्त, आम्हाला केलेली शिक्षा आजही मला आठवते.
मी श्री व्यंकटेश विद्यालय मध्ये इयत्ता दहाविमध्ये शिकत होतो. त्यावेळी श्री कालिदास कदम सर आम्हाला संस्कृत विषय शिकवायचे. ते स्वभावाने खूप शांत आहेत पण खूपच शिस्तप्रिय देखील आहेत. त्यामुळे त्यांना वर्गात बेशिस्तपणा जमत नसे. त्यांच्या तसिकेला आम्हाला शिस्तेचे पालन करावे लागे.
सर संस्कृत विषयात खूप हुशार आहेत. त्यांचा अनेक संस्कृत ग्रंथाचा मुखपाठ अभ्यास आहे. ते संस्कृत विषय शिकवताना प्रत्येक प्रसंगाचे प्रमाण त्यांच्याकडे असायचे. ते उदाहरण देऊन आम्हाला संस्कृत मधील प्रत्येक गोष्ट सांगायचे.
मी संस्कृतमध्ये फारच कच्चा होता. त्यामुळे मी सरांचा खूप जास्त मार खाल्ला आहे. पण त्यांच्या त्या मारामुळेच आणि शिक्षेमुळे च आज मी आयुष्यात सफल आहे .
मला संस्कृत वाचायला अजिबात जमत नसे. पण सरांनी मला शब्दांची फोड करून संस्कृत कसे वाचायचे मला शिकवले . त्यामुळे मला आजही संस्कृत वाचायला उत्तम जमते. संस्कृत वाचायला देखील मी त्यांच्याकडूनच शिकलो आहे, पण त्यासाठी मी त्यांचा खूप मार देखील खाल्ला आहे.
आम्हाला संस्कृत विषयामध्ये सुभाषिते असायची आणि ती सुभाषिते परीक्षेत जशास तसे लिहिण्यास यायची . त्यामुळे सर सुरुवातील ती सुभाषिते त्यांचा अर्थ सांगून आम्हाला शिकवायचे. नंतर आमच्याकडून ती सुभाषिते मुखपाठ करून घ्यायचे.
आजही मला त्यातील काही सुभाषिते मूखपाठ आहेत. मला वेळ मिळेल तेंव्हा ते गुणगुणत असतो. पण ते गुणगुणत असताना श्री कालिदास कदम सरांची आठवण मात्र नक्कीच होते.
आज सर रिटायर्ड झाले आहेत. मी आजही प्रत्येक गुरू पौर्णिमेच्या दिवशी सरांच्या घरी जातो. त्यांचा आशीर्वाद घेतो. सर खरंच माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत असे मला वाटते. कारण त्यांनी मला खूपच चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली, त्यांनी माझ्यावर संस्कार केले. त्यांच्यामुळेच आज मी एका चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदी कार्यरत आहे.
सर माझ्यासाठी नेहमीच आदर्श राहतील. मी त्यांना कधीही विसरू शकणार नाही.
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध my favourite teacher essay in mrathi (५०० शब्दात)
मी श्री शिवछत्रपती विद्यालय, परभणी येथील शाळेत आहे. माझी शाळा खूपच सुंदर आहे आणि शाळेतील सर्व शिक्षक देखील खूपच प्रेमळ आहेत. ते खूपच छान शिकवतात.
मला माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आवडतात पण श्री प्रदीप धनावडे सर हे मला सर्वात जास्त आवडतात. ते सर्वात जास्त आवडण्याचे कारण ही तसेच आहे. प्रदीप धनावडे सर आम्हाला गणित हा विषय शिकवतात. गणित शिकवण्याची त्यांची शैली फारच उत्तम आहे. त्यांनी शिकावलेलं गणित मला लगेच समजत.
श्री धनावडे सर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत पण त्यांची नौकरी इथे आमच्या शाळेत असल्यामुळे ते आमच्याच शहरात किरायाने राहतात. त्यांना दोन मुले आणि एक छोटीशी मुलगी आहे. त्यांचे वय जवळपास ४०-४५ च्या आसपास असावे.
श्री धनावडे सरांचा स्वभाव खूपच कडक आहे. ते फारच कडक शिस्तीचे आहेत. त्यांना वर्गात शिकवताना अत्यंत शांत वातावरण लागते. वर्गात शिकवताना जर कुणी विद्यार्थी बोलत असेल तर सर त्याला लगेच शिक्षा करतात शिवाय खूप रागावतात देखील. त्यामुळे गणिताच्या तासाला बोलण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. सर्व विद्यार्थी अगदी शांतपणे गणिते समजून घेतात.
असे असले तरीही श्री धनावडे सरांच्या तासाला कधीच कंटाळा येत नाही. कारण त्यांची गणित शिकवण्याची शैलीच अशी आहे की अगदी कंटाळवाणा वाटणारा गणित विषय देखील तळागाळातील विद्यार्थांना समजतो. शिवाय ते गणित शिकवताना बोर होऊ नये म्हणून मध्ये मध्ये विनोदी चुटकुले देखील सांगत असतात.
मी मात्र सरांचा नेहमीच आवडता विद्यार्थी असे. कारण सरांनी फळ्यावर दिलेले कोणतेही गणित मी वर्गात सर्वात पहिले सोडवून दाखवत असे. तसेच सरांनी दिलेला गृहपाठ देखील सर्वात अगोदर पूर्ण करीत असे.
गणिताची तयारी चांगली व्हावी आणि प्रत्येक मुलगा गणितात पास व्हावा यासाठी सर खूप प्रयत्न करीत असतात. त्यासाठी ते आमचे एक्स्ट्रा क्लास घेऊन गणिताचा सराव करून घेतात. शिवाय खूप सारे गणिते गृहपाठ देखील देतात. सर्वांना तो गृहपाठ पूर्ण करावाच लागतो.
जर एखाद्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही तर श्री धनावडे सर शिक्षा तर करतातच पण त्याला एक दिवस त्यांच्या तासिकेला देखील बसू देत नाहीत. कारण त्यांचे मत असते की, ” मी जर एवढं जीव तोडून शिकवत असेल तर तुम्हाला देखील मेहनत घ्यावी लागेल, मी सांगेल तेव्हढा गृहपाठ पूर्ण करावाच लागेल.”
श्री धनावडे सर गणित विषयामध्ये शाळेला नेहमीच १००% निकाल मिळवून देतात. मागच्या वर्षी त्यांच्या दोन दहावीच्या विद्यार्थांना गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले होते आणि दहावीचे सर्व विद्यार्थी देखील गणित विषयात पास झाले होते. त्यामुळे त्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला होता.
या वर्षीही शाळेला गणित विषयात १००% निकाल मिळवून देणार अशी त्यांनी आमचे मुख्यद्यपक श्री देशमुख सर यांना ग्वाही दिली आहे. त्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत.
सरांची एक विशेष बाब म्हणजे सर कधीही समोर बसणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना जास्त लक्ष देत नाहीत. सरांचे सर्वात जास्त लक्ष मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे असते. कारण सरांचे असे मत आहे की समोर बसणारे विद्यार्थी अगोदरच हुशार असतात. ते सांगितलं तेव्हढा गृहपाठ वेळेवर करतात. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नसते.
पण जे विद्यार्थी मागच्या बाकावर बसतात. त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. कारण नापास होण्याची त्यांची शक्यता असते. म्हणून सर मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थांना अगदी त्यांच्या जवळ जाऊन गणित समजून सांगतात. त्यांना समजल्याशिवाय सर पुढचा भाग देखील घेत नाहीत.
त्यामुळेच सरांच्या वर्गातील सर्व विद्यार्थी गणित विषयात पास होतात आणि शाळेला १००% निकालही मिळवून देतात.
सर वर्गातील सर्वांना बरोबर घेऊन चालतात. त्यांची ही बाब मला सर्वात जास्त चांगली वाटते. शिवाय त्यांच्यामुळे माझा गणिताचा पाया देखील खूप पक्का झाला आहे.
मी पूर्वी गणित विषयात अगदी साधारण होतो पण आज मला सरांमुळे कोणतेही गणित सुटते. त्यामुळे श्री धनावडे सर मला खूप आवडतात. ते सर्व विद्यार्थांना गणित हा कंटाळवाणा वाटणारा विषय अगदी सहज समजावा म्हणून खूप मेहनत घेतात.
टीप : मित्रानो आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता शिक्षक मराठी निबंध (my favourite teacher essay in marathi) यावर २०० शब्दात, ३०० शब्दात आणि ५०० शब्दात असे तीन निबंध लिहून दिले आहेत. ते सर्व निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.
तसेच मी माझे आवडते शिक्षक (my favourite teacher essay in marathi) या विषयावर १० ओळीचा निबंध देखील लिहून दिला आहे. हा निबंध इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थासाठी उत्तम आहे. तुम्हाला हे निबंध कसे वाटले कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा.