संगणक वर मराठी निबंध | Essay on computer in marathi

essay on computer in marathi संगणक वर मराठी निबंध , संगणकाचे महत्त्व मराठी निबंध, संगणक काळाची गरज मराठी निबंध : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या आधुनिक युगात संगणकाचा वापर वाढतच चालला आहे जणू संगणक हा मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे. मानवी जीवनात दवाखान्यात रुग्णांचे ऑपरेशन करण्यापासून ते देशाच्या सुरेक्षेपर्यंत सर्वत्र या संगणकाचा वापर दिसून येत आहे.

विद्यार्थी जीवनात देखील संगणकाचे खूप सारे उपयोग आहेत यामुळे शिक्षण अगदी सहज आणि सोपे वाटू लागले आहे. आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला संगणक वर मराठी निबंध essay on computer in marathi संगणकाचे महत्त्व, संगणक काळाची गरज, संगणकाचे फायदे व तोटे यासारख्या विषयार निबंध लिहून दिलेले आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त आहे.

संगणक वर मराठी निबंध | essay on computer in marathi

संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे विविध प्रकारच्या कम्प्युटिंग साठी वापरले जाते. हे यंत्र अतिजलद आणि प्रगतशील आहे जे की अवघडातील अवघड गणितीय क्रिया अगदी चुटकी सरशी करते. संगणकाच्या शोधामुळे मानवी जीवन खूपच सुखद आणि सोयीस्कर झाले आहे. कारण आज जवळपास सर्वच गोष्टी संगणकाच्या माध्यमातून अगदी सहजपणे आणि जलद करणे शक्य झाले आहे.

चार्ल्स ब्याबेज नामक शास्त्रज्ञाने संगणक या प्रगतशील यंत्राचा शोध लावला आहे. त्यालाच संगणकाचा जनक असे म्हणतात. परंतु संगणकाच्या निर्मितीचे सर्व श्रेय त्यालाच देता येत नाही. कारण संगणकाच्या आज पर्यंतच्या जडणघडणीमध्ये अनेक शास्त्रज्ञाने आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.

किंबहुना संगणकाच्या वेगवेगळ्या अंगाचा शोध देखील वेगवेगळ्या शास्त्रज्ञाने लावला आहे. त्यामुळे आज प्रगत दिसणाऱ्या संगणकाच्या निर्मितीचे श्रेय त्या सर्व शास्त्रज्ञांना जाते ज्यांनी यात आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.

संगणक हा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा मिळून बनवलेला एक संच आहे. यात एक मॉनिटर असतो जी की संगणकाची स्क्रीन असते. मॉनिटर वर संगणकावर होणाऱ्या सर्व क्रिया प्रदर्शित होतात.

तसेच यात एक सिपियू असतो ज्याला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. संगणकावर होणाऱ्या सर्व क्रियांचे लॉजिक हे सिपियू मध्ये प्रोसेस होते. सिपियूद्वारे च सर्व सूचना या मॉनिटर पर्यंत पोहचवल्या जातात.

संगणकामध्ये माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर यासारखे काही इनपुट साधने आहेत जे मॉनिटर पर्यंत यूजरच्या सूचना पाठवतात. मॉनिटर आणि प्रिंटर हे संगणकाचे आऊटपुट उपकरणे आहेत. या आऊटपुट उपकर्णावर संगणकीय क्रियांचा आऊटपुट म्हणजेच निकाल प्रदर्शित होतो.

आजचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे. संपूर्ण जग नवनवीन संशोधनाच्या स्पर्धेत उतरले आहे. आज संगणकाच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचे रोबोट, मानव विरहित आवकाश याने, कृत्रिम बुद्धिमत्ता ने चालणारी कार शास्त्रज्ञांनी बनवली आहेत.

हि सर्व संगणकीय संशोधने नक्कीच मानवी जीवनात आनंद आणि समाधान निर्माण करतील मात्र ही यंत्रणा नियंत्रणाच्या बाहेर गेल्यावर मनुष्याच्या अंगलट देखील येऊ शकते. त्यामुळे मनुष्याने ही गोष्ट देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

संगणकाचे महत्त्व मराठी निबंध | Essay on computer in Marathi

Importance of computer essay in marathi – पूर्वीच्या काळी संगणक हे केवळ काही मर्यादित कार्य करण्यासाठी बनवले गेले होते परंतु आजचे प्रगत संगणक हे अगणित कार्य करण्यात तत्पर आहेत. शिवाय सर्वात पहिला संगणक हा केवळ काही गणितीय क्रिया करू शकायचा पण आज संगणकाची क्षमता खूप वाढली आहे.

आज संगणक शाळेत, कार्यालयात, दवाखान्यात, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, संशोधन केंद्र या सर्वच ठिकाणी उपयोगात येत आहेत. तसेच आवकशतील ग्रहांचा शोध लावणे आणि त्यांच्या प्रतिमा, माहिती संकलित करणे हे देखील केवळ संगणकामुळे च शक्य झाले आहे. संगणकामुळे च आज मनुष्य चंद्र आणि मंगळ यासारख्या ग्रहांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येऊ शकला आहे. वेगवेगळ्या संशोधनामध्ये देखील संगणकांचे अनमोल महत्व आहे.

दैनंदिन जीवनात देखील संगणक मनुष्याच्या खूप उपयोगात पडतो. आज संगणकाच्या मदतीने ऑनलाईन रेल्वे आणि विमानाचे तिकीट बुक करणे, लाईट बिल भरणे, टॅक्स भरणे, ऑनलाईन विवध वस्तूंची खरेदी – विक्री करणे सहज शक्य झाले आहे.

संगणकाचा उपयोग मनोरंजनाच्या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात होतो. यातून आपण चित्र पाहणे, संगीत ऐकणे, व्हिडिओ पाहणे, विविध संगणकीय खेळ खेळणे यासारखी मनोरंजनाची कामे करू शकतो. शिवाय चित्रपटांची शूटिंग, एडिटिंग, संगीताची निर्मिती आणि चित्रपटामध्ये VFX वापरून काल्पनिक गोष्टी दर्शवणे हे देखील संगणकामुळे च शक्य झाले आहे.

संगणकामुळे संपूर्ण जग अगदी जवळ आणले आहे. यामुळे दुर देशात राहणाऱ्या व्यक्तीशी संवाद करणे देखील शक्य झाले आहे. पूर्वी संवादाची साधने देखील अतिशय कमी ऊपलब्ध होती, त्यासाठी टपाल चा उपयोग करून दुर राहणाऱ्या व्यक्ती पर्यंत संदेश पोहचवला जायचा.

यातून त्या व्यक्ती पर्यंत संदेश पोहचण्यासाठी कित्येक दिवसे जायचे. पण आज संगणकाच्या मदतीने कितीही दुर राहणाऱ्या व्यक्तीशी काही क्षणातच संवाद साधने शक्य आहे. शिवाय व्हिडिओ कॉलच्या मदतीने समोरा समोर संवाद देखील करता येतो.

शिक्षणाच्या क्षेत्रात देखील संगणकाचा खूप मोठा वाटा आहे. आज संगणकामुळे च ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य मिळत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थांना घरी बसून लेक्चर करणे शक्य झाले आहे, शिवाय सर्व पुस्तके संगणकावर ऊपलब्ध असल्यामुळे दप्तराचे ओझे देखील कमी झाले आहे.

यातून शिक्षक देखील त्यांच्या घरी बसून विद्यार्थांना शिकवू शकत आहेत. संगणक हे एक ज्ञानाचे भांडार आहे. त्यामुळे हवी ती माहिती संगणकावर सहज मिळत असल्यामुळे विद्यार्थांना अभ्यास करणे देखील सोपे झाले आहे.

Leave a Comment