Essay on my country in marathi भारत देश महान मराठी निबंध, माझा देश मराठी निबंध : फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय वासियांना “भारतीय” असण्याचा अभिमान आहे. त्याला कारणही तसेच आहे. येथील निसर्ग संपद्दा, प्राणी, पशू पक्षी, वनस्पती यातील विविधता तसेच येथे अनेक विविध धर्माचे गुण्यागोविंदाने राहणारे लोक, लोकशाही, इत्यादी. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे. असे असून देखील आपला भारत देश हा संपूर्ण जगासाठी एकात्मतेचा सर्वात मोठा उदाहरण आहे.
भारत देश महान मराठी निबंध, माझा देश निबंध अश्या अनेक विषयावर शाळेत असताना निबंध लिहायला असतो. त्यामुळे या पोस्टमध्ये अत्यंत सुंदर शब्दात भारत देशावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल !
भारत देश महान मराठी निबंध १०० शब्दात | Essay on my country in marathi in 100 words
भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे. आपल्या देशाला इंग्रजीमध्ये india आणि हिंदी मध्ये हिंदुस्तान या नावाने ओळखतात. भारत देश हा अनेक थोर आणि पुण्यवंत विचारवंत आणि क्रांतिकारकांचा देश आहे. या देशात अनेक थोर महात्मे होऊन गेले. उदाहरणात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले , गौतम बुद्ध, संत सावता माळी, संत एकनाथ असे अनेक महात्मे होऊन गेले. या सर्व महात्म्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आपल्या देशाला लाभला आहे.
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक जाती धर्मांच लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. मराठी, हिंदी ,नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात.भारत हा देश खूप मोठ्या लोकसंख्येचा आहे आणि तो जगातील दुसऱ्या नंबरचा देश आहे.
भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे आणि तो तीन रंगांनी नटलेला आहे . त्यात केशरी ,पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आहेत. म्हणून आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाला “तिरंगा” असे देखील म्हटले जाते. ध्वजाच्या मध्यभागी एक निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.
भारत देश महान मराठी निबंध ३०० शब्दात | Essay on my country in marathi in 300 words
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रदेशात अनेक धर्माचे लोक राहतात. या देशात सर्वांना समान अधिकार आहेत. कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार प्राप्त नाहीत. प्रत्येक व्यक्तीला समान न्याय दिला जातो. त्यामुळेच भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे.
भारताच राज्यकारभार लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी चालवतात. भारतातील प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा, आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा तसेच बहुमतद्वारे सरकार बरखास्त करण्याचा अधिकार आहे. देशामध्ये वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळ्या भाषा आसतानाही लोक प्रेमाने राहतात. त्यामुळे माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्याला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या भारत देशातील शेतकरी गहू ,मका ,तांदूळ, ज्वारी, बाजरी ,कापूस, ऊस ,हरभरा यासारखी पिके घेतली जातात. आपल्या भारत देशासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव,चंद्रशेखर अशा अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपला भारत देशा परंपरांनी नटलेला आहे.
भारत देश महान मराठी निबंध ५०० शब्दात | Essay on my country in marathi in 500 words
मला माझा भारत देश खूप आवडतो. आपला भारत देश महान आहे आणि मला याचा अभिमान वाटतो. आपल्या भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” आहे आणि राष्ट्रीय प्रार्थना “वंदे मातरम” आहे. देशातील प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये सकाळी राष्ट्रीय गीत गायले जाते आणि देशातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि आदर करतो.
या देशाचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. आपल्या भारताची संस्कृती ” अतिथी देवो भव” ही आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक धर्माचे सण उत्सव मोठा रीतीने साजरे केले जातात. दिवाळी हा भारत देशात साजरा केलं जाणारं सर्वात मोठा सण आहे. तसेच इतर आनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण परंपरेने साजरे केले जातात.
तसेच देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे होतात आणि यातून भारतीय संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडते. आपल्या देशात साजरे होणारे सण उत्सव पाहायला बाहेर देशातून देखील अनेक पर्यटक येतात .
आपला भारत देश हा एक विशाल देश आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भारत देशाचा जगात दुसरा क्रमांक आहे. सुमारे तीनशे वर्ष भरात देश हा इंग्रजाच्या आधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजगुरू, सुखदेव यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे या सर्व क्रांतिकारकांनी देशासाठी दिलेली आहुती प्रत्येक भारतीयाची खूप मोठी प्रेरणा आहे.
भरात हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. आपल्या भारतातील हिमालयात अनेक नद्यांचा उगमालय आहे. गंगा, यमुना, गोदावरी, तापी अशा अनेक नद्या भारतातून वाहतात. देशात खूप प्रसिद्ध आणि संपन्न प्राचीन मंदिरे आहेत.
देशात अनेक खेळ खेळले जातात. भारत देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. आपल्या भारत देशात अनेक प्रकारच्या फळबागा आहेत. स्वातंत्र्यानंतर आंबा हे फळ राष्ट्रीय फळ म्हणून निवडले होते. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. भारत देशात महाराष्ट्र उद्योग धंद्यात सर्वात अग्रणी आहे.
भारत देश हा आशिया खंडात आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारत देशात पशु ,पक्षी ,प्राणी आणि निसर्ग याबाबतीत विविधता आहे. भारत देशाचा एक नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. मला माझा देश खूप आवडतो.