शेतकऱ्याचे मनोगत निबंध (shetkaryache manogat marathi nibandh) :- नमस्कार मंडळी ! शेतकरी केवळ आपल्या भारत देशाचा च नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात दिवस रात्र राब राब राबतो आणि शेतातून अन्न धान्य पिकवतो तेंव्हा कुठे आपल्याला पोठभार जेवण मिळते. पण संपूर्ण जगाचे पोट भरणारा शेतकरी कधीमात्र उपाशी पोटी राहतो. हे दुर्दैव!
पण या गोष्टीची कुणाला फिकीर आहे? शेतकऱ्याच्या अडी – अडचणी – समस्या जाणून घ्यायला कुणाला वेळ आहे? प्रत्येकजण आपापल्या परीने विकास करण्याच्या आणि पैसे कमावण्याच्या नादात धुंद आहे.
पण तुम्ही देशाचा कितीही विकास केलात, कितीही पैसे कमावले तरीही जोपर्यंत शेती आणि शेतकरी समृध्द होणार नाही तोपर्यंत तुमच्या कार्याला काहीच अर्थ राहणार नाही. हे कोण सांगणार या लोकांना !
अहो ! जर शेती आणि शेतकरीच समृध्द नसेल तर काय पैसे खाणार आहात का ?
आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत (shetkaryache manogat marathi nibandh) सांगणार आहे.
शेतकऱ्याचे मनोगत निबंध(shetkaryache manogat marathi nibandh)
शेतकरी हा शब्द ऐकला की प्रत्येक व्यक्तीला लगेच आत्महत्या आठवते. जणू आजघडीला ” शेतकरी म्हटलं की आत्महत्या ” असं समीकरणच तयार झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला शेतकरी आठवतो तो म्हणजे व्याजला कंटाळून आत्महत्या करणारा. पण त्या आत्महत्येची कारणे, त्याने सोसलेल्या हाल – आपेष्टा त्याने दिवस – रात्र उपसलेले कष्ट कुणीच लक्षात घेत नाही. हे खूपच दुःखद आहे!
मी मागच्या वर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये गावाकडे गेलो होतो. गावाकडे गेलं की शेतात फिरून ऊस, पेरू, बोरं असा रानमेवा खाणे आणि शेतातील गुरा ढोरांसोबत वेळ घालवणे, त्यांना वैरण – पाणी करणे हा माझा नेहमीचा ठरलेला उपक्रम असे.
एके दिवशी मी सायंकाळच्या वेळी गावच्या हनुमान मंदिराकडे निघालो. देवाचे दर्शन घेतले आणि थोडा वेळ तिथेच झाडाखाली बसावे या हेतूने मी जागा शोधत होतो. तेवढ्यात मला मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली पुंडलिक आण्णा दिसले. ते थोडे टेन्शन मध्ये दिसत होते. त्यामुळे मी त्यांना टेन्शन च कारण विचारले.
त्यांनी थोड्या दबक्या आवाजात उत्तर दिले ” तुम्हा शाळकरी मुलांना काय कळणार आमची शेतकऱ्यांची व्यथा ? ”
त्यांनी पुढे त्यांचे शेतकऱ्याचे मनोगत (shetkaryache manogat marathi nibandh) सांगायला सुरुवात केली….
शेतकऱ्याचे मनोगत निबंध (shetkaryache manogat marathi nibandh)
माझं नाव पुंडलिक दामोधर कदम. गावच्या खालच्या वडीला माझी चार एक्कर शेती आहे. मला दोन मुले आणि एक मुलगी आहे आणि दोन्ही मुले तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आहेत. मागच्या वर्षीच मुलीचे मोठ्या थाटामाटात लग्न लाऊन दिले.
दरवर्षी काही न काही पीक शेतात होत असते त्यावर घरचा प्रपंच आणि कसेबसे लेकरांचे शिक्षण भागते. पण यंदा मिरगाची पेरणी झाल्यापासून पावसाचा थेंब देखील नाही पडला. आज तीन महिने उलटले तरी पण पाऊस पडण्याचा काही नेम दिसत नाही. पाऊस राजा आम्हा शेतकऱ्यांची कुटली परीक्षा पाहतोय कुणास ठाऊक !
शेतातल पीक वाळून चाललंय , सोयाबीन तर शेंगा धरायचा आधीच कोमेजून गेला आहे, कापसाची पण तीच दशा आहे. असच चालत राहील, आणखी एखादा महिना पाऊसच नाही पडला तर पिकांचा काय होईल, यंदा उत्पन्न तरी कसं होईल ?
त्यामुळे अगदी जीव वैतागून गेलाय, नाय नाय ते विचार मनात यायला लागलेत. मीर्गाच्या पेरणीसाठी सावकाराकडून खत – बियासाठी कर्ज काडल होत , लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून भरायचे, घरचं पण दुखणं भान आहेच की !
आजपर्यंत सावकाराकडून घेतलेले पैसे पुरले पण आता इथून पुडचा प्रपंच कसा भगवावा या विचाराने डोकं किर्र झालंय, काहीच सूचना. सरकार पण काही मदत करत नाही. डोक्यात नुसते वंगाळ वंगाळ विचार येत आहेत. सावकाराचे पैसे कसे फेडायचे, पुढच्या पेरणीला पैसे कुठून आणायचे, लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार, घर प्रपंच कसा भागवयचा…….? असे अनेक प्रश्न मनात घर करत आहेत.
दिवसरात्र शेतात महीनत घेऊन, राब राब राबून असे वाईट दिवस शेतकऱ्याला पहावे लागतात. अहो ! तुम्हाला काय सांगणार, पोटच्या लेकरासारख आम्ही शेतकरी लोक पिकांची काळजी घेत असतो. शेवटी निसर्गापुढे कुणाचे काही चालते का ?
मग अशा वेळेस शेतकऱ्या समोर फास घेऊन जीव संपवण्याशिवय कुठला पर्याय उरतोया ? आणि तुम्ही मोठ्या उत्सुकतेने विचारता की शेतकरी गळफास का घेतो? तुम्हा शहरी लोकांना काय कळणार आमच्या शेतकरी लोकांच्या व्यथा…!
ही तर या वर्षीची गत आहे. पण दरवर्षी काय वेगळी परिस्तिथी नसते. शेतकऱ्याला काय कमी शत्रू हाईत व्हय ! कदी पाऊस कमी पडतो, तर कधी एवढा जास्त पाऊस पडतो की हातात आलेलं पीक वाया जातं, हे झालं नैसर्गिक संकट.
पण कधी पाऊस पाणी पुरेसे पडून जर निसर्गाने साथ दिली तर मग सावकार आणि सरकार यासारखे शत्रू देखील आहेतच की शेतकऱ्याला. सुकाळात मिळालेल्या उत्पणाच्या अर्ध्यापेक्षा जास्त भाग सावकार त्याचं व्याज घेऊन जातो आणि वूरल्या – सुरल्या मालाला सरकार कवडीमोल भाव देतो.
सरकारकडून कधीच हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्याला कुणीच वाली नाही. असे बोलून पुंडलिक आण्णा भरलेल्या डोळ्यांनी तीतून निघून गेले.
मी मात्र तिथे त्याच गोष्टीचा विचार करत बसलो. त्या गरीब शेतकऱ्याचे मनोगत (shetkaryache manogat marathi nibandh) एकूण माझे देखील डोळे पाणावले आणि मी निश्चय केला की संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी माझ्या आयुष्यात नक्कीच काही तरी करणार. खूप शिकून एखादा मोठा अधिकारी होऊन त्यांचा प्रश्नांना सरकार दरबारी नक्कीच वाचा फोडणार आणि त्यांना हक्काचा हमीभाव आणि इतर सुविधा मिळवून देणार.
खरच शेतकरी राजा खूपच महान आहे. त्याला माझे शतशः नमन !
टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत (shetkaryache manogat marathi nibandh) पाहिले. मला अशा आहे की तुम्हाला हा निबंध नक्कीच आवडला असेल. हा निबंध तुम्ही पहिली पासून ते बारावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता
तुम्हाला जर (shetkari marathi nibandh) या निबंधात आणखी काही सुचवायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सुचवू शकता.तसेच तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर निबंध हवा असेल तर ते ही कळवा, धन्यवाद…!!!