माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi

माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi :- छंद हा मानवाच्या जीवनातील खरा दागिना आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कारण मानवाला सर्वात जास्त सुख, समाधान आणि आनंद जर कोणत्या गोष्टीमुळे मिळत असेल तर तो म्हणजे छंद. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या आवडीचा एखादा तरी छंद जोपासत असतो.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi या विषयावर १०० शब्दात, ३०० शब्दात आणि ५०० शब्दात असे तीन चार निबंध लिहून दिलेले आहेत. माझा आवडता छंद my favourite hobby essay in marathi या विषयावर लिहिलेले सर्वच निबंध तुम्हाला खूप आवडतील.

माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi (२०० शब्दात)

My favourite hobby essay in marathi
माझा आवडता छंद

माझा आवडता छंद इतरांपेक्षा खूप हटके आहे. मला वर्तमान पत्रात छापून येणारी विशेष माहितीपर लेख कापून संग्रहित करायला खूप आवडते. त्यामुळे वर्तमान पत्रात छापून येणारी प्राणी, पशू पक्षी, वनस्पती, मनुष्य, जगातील सुंदर वास्तू यांच्याबद्दल मजेशीर आणि आश्चर्यचकीत करणारी माहितीपर लेख गोळा करणे हा माझा छंद आहे.

मी रिकाम्या वेळात घरातील जुनी वर्तमान पत्रे चाळत बसतो. त्यातील जे लेख मला खूप विशेष वाटतील ते मी कापून घेऊन संग्रहित करून ठेवतो. दररोज पेपर मध्ये एखादा नेता, खेळाडू, अभिनेता यांचा जीवन संघर्ष सांगणार लेख प्रकाशित होत असतो. मला अश्या प्रकारचे लेख वाचायला खूप आवडतात. त्यामुळे ते लेख मी नंतर भविष्यात वाचण्यासाठी कापून माझ्याकडे संग्रहित करतो.

आज माझ्याकडे असे खूप सारे लेख जमा झालेले आहेत. ते सर्व लेख मी एका मोठ्या रजिस्टर मध्ये चिटकवून ठेवलेले आहेत. मला जेंव्हा विरंगुळा मिळेल तेंव्हा मी ते लेख वाचत बसतो. वर्तमान पत्र वाचत असताना मला एखादी माहिती महत्वाची वाटली की ती मी कापून माझ्या रजिस्टर मध्ये चिटकवून ठेवतो.

यातून मला खूप सारी माहिती मिळते आणि माझे ज्ञान देखील वाढते. या रजिस्टर मधील माहितीपर लेख मी जेंव्हा पाहिजे तेंव्हा वाचू शकतो. त्यामुळे मी हे सर्व लेख खूप जपून ठेवतो. हे काम करायला मला खूप आनंद आणि समाधान मिळते. म्हणून वर्तमान पत्रातील रंजक माहितीचे लेख गोळा करणे हा माझा आवडता छंद (my favourite hobby essay in marathi) आहे.

माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi (४०० शब्दात)

मनुष्याला छंद जोपासणे खूप आवडते. छंद जोपासले की त्याला आनंद मिळतो व मन देखील समाधानी होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती निदान एक तरी छंद जोपासत असतो. त्याच्या आवडीचे एखादे काम तो छंद म्हणून नित्य नेमाने करत असतो.

मला देखील छंद जोपासायला खूप आवडतो. माझा आवडता छंद म्हणजे वाचन करणे. मला लहानपणापासूनच गोष्टींची आणि कवितांची पुस्तके वाचायला खूप आवडतात. त्यामुळे माझा हा छंद मी आजही जोपासत आहे. माझ्या सोबत नेहमी एकदोन पुस्तके असतात. मला जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा ते वाचत असतो.

मी जेंव्हा लहान होतो, तेंव्हा माझी मोठी बहीण अशी गोष्टींची आणि कवितांची पुस्तके वाचायची आणि त्यातील तिने वाचलेल्या गोष्टी मला सांगायची. या गोष्टी ऐकून मला खूप छान वाटायचे. तसेच ती अनेक कविता मला चालीवर म्हणून दाखवायची. त्या कविता ऐकून मला खूप प्रसन्न वाटायचे.

मी जसा जसा मोठा झालो तसा मला वाचनाची आवड निर्माण झाली. दिदिने घरी आणून ठेवलेली गोष्टीची आणि कवितांची पुस्तके मीही वाचू लागलो. त्यातूनच मला तेनालीराम, अकबर बिरबल, आली बाबा ऑर चालीस चोर अशी रंजक गोष्टींची पुस्तके वाचण्यात लळा लागला. मीही गोष्टीची खूप सारी पुस्तके वाचू लागलो. नवीन गोष्टीची पुस्तके विकत घेण्यासाठी बाबांकडे हट्ट धरू लागलो.

तेंव्हापासून मला पुस्तके वाचनाचा खूप छंद लागला आहे. मी आजही थोर नेत्यांची , इतिहासावर आधारित, राजकारणावर आधारित अनेक पुस्तके वाचत असतो. मला जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा मी या पुस्तकामध्ये रमत असतो.

त्यामुळे मला या गोष्टीचा खूप आभिमान आहे की, मला पुस्तके वाचन यासारख्या चांगल्या गोष्टींचा छंद लागला. या छंदामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वांचा खूप विकास झाला आहे. माझे विचार शुद्ध झाले आहेत. माझे राहणीमान बदलले.

मी शाळेत असताना देखील हा छंद जोपासत असे. आमच्या शाळेत खूप भव्य लायब्ररी होती. त्यात अनेक विषयातील आणि अनेक भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. आमची शाळा सुटल्यानंतर शाळेची लायब्ररी एक घंटा उघडी राहायची. या वेळात शाळेतील विद्यार्थी लायब्ररी मधून घरी वाचनासाठी पुस्तके घेऊन जात असत.

मी देखील शाळा सुटली की सर्वांच्या अगोदर पळत लायब्ररी मध्ये जाऊन एखादे छान गोष्टीचे पुस्तक शोधत असे. ते पुस्तक घेऊन मी लायब्ररी चालू असे पर्यंत तिथेच वाचत बसत असे. लायब्ररी बंद झाल्यानंतर मी ते पुस्तक घरी वाचनासाठी घेऊन जात असे.

शाळेतील लायब्ररी मधील पुस्तके घरी घेऊन जायची असतील तर त्या पुस्तकाची रजिस्टर मध्ये नोंद करावी लागे आणि त्या समोर आपली सही करावी लागे. त्याशिवाय लायब्ररी मध्ये अनेक अटी देखील होत्या. एका वेळेस एकच पुस्तक घरी नेता यायचे, शिवाय ते पुस्तक एका आठवड्याच्या आत वाचून लायब्ररी मध्ये परत करावे लागे.

घरी नेलेले पुस्तक फाटले तरी त्याचे पैसे लायब्ररी मध्ये भरावे लागायचे. त्यामुळे मी घरी नेलेली पुस्तके खूप काळजीपूर्वक हाताळायचे. ते वाचून झाले की लगेच परत करायचो आणि लायब्ररी मधून दुसरे नवीन पुस्तक घेऊन यायचो.

मी आजही खूप सारे पुस्तके वाचत असतो. मला जेंव्हा माझ्या कामातून विरंगुळा मिळेल तेंव्हा मी मोबाईल मध्ये टाइम पास करण्यापेक्षा एखादे छान पुस्तक वाचतो. यातून मला खूप सारे ज्ञान आणि माहिती मिळते शिवाय माझे मनोरंजन देखील होते.

त्यामुळे पुस्तक वाचन हा छंद (my favourite hobby essay in marathi) मला खूप आवडतो. माझा आवडता छंद पुस्तक वाचन मी आजही जोपासत आहे.

माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi (५०० शब्दात )

चित्रकला हा माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मला चित्र काढायला आणि त्यात माझ्या आवडीचे रंग भरायला खूप आवडतात. शिवाय मला कश्याचेही अगदी हुबेहूब चित्र काढण्याची कला अवगद आहे. मला जेंव्हा विरंगुळा मिळेल तेंव्हा मी चित्र काढत असतो.

सुरूवातीला मला चित्र अजिबात काढता येत नव्हते. शाळेत मी काढलेल्या चित्रावर सर्व विद्यार्थी खूप हसायचे. सरांनी बैलाचे किंवा घोड्याचे चित्र काढायला सांगितले की माझे चित्र एखाद्या गाढवासारखे दिसायचे. त्यामुळे वर्गात माझी खूप हस्या व्हायची.

मी इयत्ता आठवीमध्ये असताना आम्हाला चित्रकला हा विषय शिकवण्यासाठी श्री धनावडे सर होते. ते चित्रकला या विषयामध्ये खूप मास्टर होते. त्यांनी आम्हाला चित्रकला हा विषय खूप छान शिकवला. त्यांनी चित्रकलेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आकार आणि आकृत्यांची आमच्याकडून खूप सराव करून घेतला.

ते स्वभावाने खूपच कडक होते, चित्र चुकले की शिक्षा करायचे पण ते जवळ घेऊन समजून देखील सांगायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुंदर चित्रे काढायला शिकलो. काही काळापूर्वी मला चित्रकला हा विषय आजिबात आवडायचा नाही पण तो आता मला आवडायला लागला होता. मी चित्र काढण्यात चांगलाच रमलो होते.

तेंव्हापासून मला चित्र काढण्याचा छंद लागला. मी चित्र काढण्याच्या नवीन नवीन सकल्पणा शिकून त्याचे माझ्या चित्रात अनुसरण करू लागलो. त्यामुळे माझे चित्र अगदी हुबेहूब दिसू लागली.

मोठ्या पुष्टावर काढलेले छञपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे मी काढलेले चित्र सरांना खूप आवडले होते. त्यामुळे त्यांनी ती दोन्ही चित्रे वर्गातील भिंतीवर लावली. त्यामुळे मला आणखीनच प्रेरणा मिळाली. मी नवीन चित्रे काढायला उत्तेजीत झालो.

मी शाळेत होणाऱ्या चित्रकलेच्या स्पर्धामध्ये सहभागी होऊ लागलो आणि बक्षिसेही मिळवू लागलो. जिल्हा स्तरीय झालेल्या चित्रकलेच्या स्पर्धेत मी आमच्या शाळेला पहिला क्रमांक मिळवून दिला होता. त्यामुळे शाळेत माझे खूप कौतुक करण्यात आले.

शिवाय पुष्पगुच्छ देवून आमच्या शाळेतील मुख्यद्यापक् सरांनी माझा व माझ्या वडिलांचा सत्कार देखील केला. त्यामुळे त्यादिवशी मला स्वतःचा खूप अभिमान देखील वाटला.

चित्रकला विषयात पारंगत होण्यासाठी मी अनेक कोर्सेस जॉईन केली. चित्र काढण्याच्या नव्या नव्या पद्धती मी शिकू लागलो. रंगांची किमया मला लक्षात आली होती. कोणत्या चित्राला कोणता रंग द्यायचा हे मला चांगलेच समजले होते. चित्राला व्यवस्थित रंगरंगोटी केल्यामुळे माझे चित्रे हुबेहूब दिसायची.

मी आजही हा चित्र काढण्याचा छंद जोपासत आहे. मी शाळेत असताना काढलेली अनेक चित्रे माझ्याकडे संग्रहित आहेत. ती चित्रे पहिली की आजही मला खूप हसू येते. शाळेत असताना काढलेली चित्रे आणि आज काढत असलेली चित्रे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

मी आज चित्र काढण्यात खूप पारंगत झालो आहे. मी काढलेली अनेक चित्रे आमच्या बेडरूम मध्ये लावलेली आहेत. आमच्या घरी नवीन येणारा प्रत्येक व्यक्ती ती छित्रे पाहून माझे खूप कौतुक करतो. या छंदामुळें मला खूप ख्याती मिळाली आहे. शिवाय मी काढलेली अनेक चित्रे वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये देखील प्रकाशित होतात.

या चित्रकलेचे माझ्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. आज चित्रकला म्हणजे माझी ओळख बनली आहे. यातून मला खूप आनंद आणि समाधान मिळतो. मझा आवडता छंद चित्रकला (my favourite hobby essay in marathi) हा छंद मी आजही जोपासत आहे.

मला जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा चित्र काढत असतो आणि पुढील शिक्षण देखील मी या चित्रकला विषयात घेणार आहे. मला चित्रकला या विषयात करीअर घडवून एक नावलौकिक चित्रकार बनायचे आहे.

टीप : विद्यार्थि मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi हा छंद वेगवेगळ्या शब्दात लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.

माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi हा निबंध पहिली पासून ते बारावी पर्यंत सर्व वर्गांसाठी उपयुक्त आहे. हा निबंध तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment