जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh

जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh : पाणी हा घटक सजीव सृष्टी साठी किती महत्वाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक जण पाण्याचे महत्व जाणतो. पाणी हे संपूर्ण सजीव जगतासाठी अमृत आहे. पाण्याविना जगणे अशक्य आहे.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला “जल हेच जीवन आहे” मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.

जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh ( पाणी हेच जीवन मराठी निबंध)

Jal hech jivan ahe marathi nibandh
जल हेच जीवन आहे मराठी निबंध

पाणी हे सजीव शृष्टीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. पृथ्वीतलावर पाण्याची उपलब्धता आहे म्हणूनच येथे सजीवांचे वास्तव्य शक्य आहे. पृथ्वीवर पाणी असल्या कारणाने येथे सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. ज्या दिवशी पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत संपतील त्या दिवशी पृथ्वीवरील सजीव सृष्टी देखील नष्ट होईल.

आज मनुष्याने खूप प्रगती केली आहे. तो चंद्र, मंगळ यासारख्या ग्रहांची सफर करत आहे. तेथें जावून तो मानवी वस्ती प्रस्थापित करण्याच्या विचारात आहे. पण ज्याठिकाणी मानवी वस्ती असेल त्याठिकाणी सजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व मूलभूत घटक देखील असायला हवेत. त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी शिवाय मानवी वस्ती अशक्य आहे.

कारण पाणी हा मनुष्याला जिवंत राहण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. तोच जर उपलब्ध नसेल तर तेथे मनुष्य वस्तीचे वास्तव्य ही संकल्पनाच मुळात खोटी ठरेल. त्यामुळेच मनुष्य मानवी वस्ती प्रस्थापित करण्यासाठी अनेक ग्रहावर पाण्याचा शोध घेत आहे.

पाण्याला जल हेच जीवन आहे असे म्हटले जाते किंवा त्याला हिंदीमध्ये जल ही जीवन हैं असे म्हटले जाते. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त पिण्यासाठीच नव्हे तर इतर अनेक कामासाठी पाण्याचा वापर करत असतो. त्यात स्वच्छतेसाठी वापर, घरगुती कामासाठी वापर, जेवण बनवण्यासाठी व इतर अगण्य असे कार्य आहेत जेथे आपल्याला पाण्याची आतोनात गरज भासते.

हेच पाणी आपल्याला नदी, तलाव, विहीर, धरण यांच्या मार्फत वापरण्यासाठी उपलब्ध होते. शिवाय पाऊस हा देखील पृथ्वीतलावरील पण्याचा सर्वात मुख्य स्रोत आहे. पाण्याच्या या स्रोतातील पाणी आपण पिण्यासाठी , शेतीसाठी, कारखाने उद्योग धंद्यासाठी वापरत असतो.

Also read : सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध

पाऊस हा भारत देशातील शेतीचा मुख्य आधार आहे. शेतीसाठी लागणारे सर्व पाणी हे पावसातून उपलब्ध होत असते. शिवाय पावसाव्यातरिक्त नद्या, तलाव, विहीर, बोर, इत्यादी मधील पाणी देखील विद्युत पंपाच्या साहाय्याने शेतीला पुरवले जाते. त्यामुळेच शेती भरपूर पिकून आपल्याला अन्नधान्य उपलब्ध होते.

पण आजच्या काळातील शेतकरी खूप हवालदिल झाला आहे. कारण मागच्या काही वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे, शेतीला पाणी पुरत नाही , त्यामुळे अपेक्षित तेवढे उत्पन्न देखील शेतीतून मिळत नाही.

पाणी असेल तरच शेती शक्य आहे आणि शेती नसेल तर अन्नधान्य कुठून येणार ? माणूस काय खाणार ? म्हणजे पाण्याच्या थेट संबंध सजीवांच्या जगण्याशी आहे. त्यामुळे पाणी खरोखरच मनिष्यासाठी जीवन आहे. अशा वेळेस ” जल हेच जीवन आहे ” (jal hech jivan ahe marathi nibandh) ही उक्ती अगदी बरोबर आहे असे वाटते.

पण आज सजीवांना पुरेशे पाणी या पृथ्वीतलावर उपलब्ध आहे का हो ? जेवढे आहे तेवढे तरी पिण्यायोग्य आहे का?

जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh (part – २)

पृथ्वीवर एकूण ७१% पाणी उपलब्ध आहे. पण हे सर्व पाणी पिण्यायोग्य नाही. यातील केवळ दोन ते तीन टक्केच पाणी सजीवासाठी पिण्यायोग्य आहे. बाकीचे पाणी वाफ, ग्लेशियर, बर्फ, हिमनग, समुद्रातील खारट पाणी यांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे पृथ्वीवर केवळ मर्यादित पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा खूप काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.

जेवढे पिण्यायोग्य पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे त्यातील सर्वात जास्त पाणी हे पृथ्वीच्या भूगर्भात आहे. ते आपल्याला विहीर, बोअरवेल यांच्या मार्फत उपलब्ध होते. शिवाय हे पाणी पिण्यासाठी खूप शुद्ध असते कारण या पाण्याची नेसर्गिक पद्धतीने चाळणी होते.

पण ग्लोबल वॉर्मिग, जल प्रदुषण, बदलते जागतिक हवामान यामुळे पृथ्वीच्या पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे. ते पाणी मिळवणे आज खूप कठीण कार्य बनले आहे. ६००-८०० फूट बोअरवेल पाडून देखील त्याला पाणी लागत नाही म्हणजे ही धोक्याची घंटा आहे.

शिवाय जे पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उपलब्ध आहे ते सुद्धा खूपच दूषित आणि पिण्यासाठी अयोग्य आहे. आज नद्या नाले, ओढे, तलाव आटत आहे. जे पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्यातही मनुष्य शहरातील सांडपाणी सोडत आहे, कारखाने आणि उद्योग धंद्याचे दूषित आणि विषारी पाणी सोडत आहे त्यामुळे कित्येक जलचर प्राणी देखील संपुष्टात आले आहेत.

मानवाने विकासाच्या नावाखाली पृथ्वीवरील उपलब्ध संपूर्ण पाणी साठी दूषित आणि प्रदूषित करून टाकले आहेत. त्यातील पाणी अगदी पिण्यायोग्य झाले आहे. पृथ्वीवरील पाण्याचा साठा मर्यादित आहे ही गोष्ट मनुष्य नक्कीच विसरला आहे. पण त्याला एक दिवस या गोष्टीची नक्कीच जाणीव होईल, त्याने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल. पण तोपर्यंत खुप वेळ निघून गेलेली असेल.

Also read : नदीचे आत्मवृत्त / नदीची आत्मकथा मराठी निबंध

जर भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी संकटापासून वाचायचे असेल तर पाण्याची बचत करणे फार गरजेचे आहे. पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहेच परंतु जे पाणी उपलब्ध आहे ते पाणी दूषित होण्यापासून वाचवणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

सरकारने देखील पाणी वाचविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. जल्युक्त शिवार यासारख्या काही शासकीय योजना अस्तित्वात देखील आहेत पण त्यांना जनतेकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे आपल्या मुला बाळांच्या, येणाऱ्या पुढच्या पिढीचे भवितव्य जर उज्वल ठेवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीला वयक्तिकपणे पणी बचत करणे आणि ते काटकसरीने वापरणे फार गरजेचे आहे.

मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जे पाणी मानवासाठी सध्या जीवन आहे तेच पाणी त्याच्यासाठी भविष्यात मृत्यू ओढवू शकते. त्यामुळे पाणी बचत करणे फार गरजेचे आहे.

शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते –

जल हैं तो कल हैं…

टीप : विद्यार्थि मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला जल हेच जीवन आहे मराठी निबंध किंवा पाणी हेच जीवन मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल.

पणी हेच जीवन / जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh या विषयावरील निबंध इयत्ता दहावी वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत हमखास असतो. त्यामुळे तुम्ही जर अश्या प्रकारचा निबंध परीक्षेत लिहिला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात.

तुम्हाला जर इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा निबंध तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment