Sound pollution essay in marathi ध्वनी प्रदुषण वर निबंध : आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, दररोज काही न काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज आणि सोपे जरी केले असले तरी पण काही समस्या देखील निर्माण केल्या आहेत. यातील ध्वनी प्रदुषण ही सध्या सर्वात गंभीर समस्या आहे.
आजच्या या पोस्टमध्ये ध्वनी प्रदुषण वर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. या निबंधातून ध्वनी प्रदुषण कसे होते, त्याची कारणे, ध्वनी प्रदूषणाचे मनुष्यावर होणारे परिणाम व तसेच ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाय या विषयावर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल!
Table of Contents
ध्वनि प्रदूषण वर निबंध १०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 100 words
तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन खूप सोयीचे झाले आहे. आज काही क्षणात दूर असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करणे, बोलणे संभव आहे. तसेच मोबाईलच्या माध्यमातून अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुचाकी वाहने, चारचाकी वाहने यामुळे वाहतूक सोयीची झाली आहे. परंतु या सर्वातून माणसांचे जीवन जगणे जरी सोपे झाले असले तरी यातून हवा प्रदूषण, ध्वनी प्रदुषण, जल प्रदूषण यासारख्या अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत.
ध्वनी प्रदुषण हे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे सर्वात घातक प्रदूषण आहे. यातूनच अगदी कमी वयापासूनच श्रवणाच्या समस्या जाणवत आहेत. यापासून बहिरेपणा येणे, मानसिक स्थिती बिघडणे, चिडचिड होणे यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदुषण नियंत्रणात असणे खूप गरजेचे आहे.
ध्वनि प्रदूषण वर निबंध २०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 200 words
भारत हा देशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. वाढत्या प्रवाहात लोकांमध्ये तीव्रता वाढली आहे. सहज ऐकू न येणे आणि बहिरेपणा हे प्रदूषनाचे परिणाम दिसून येत आहेत.
उच्च तीव्रतेच्या आवाजाने बहिरेपणा हा कायम स्वरूपी देखील होऊ शकतो. लग्नकार्यात, जयंत्या साजऱ्या करताना, गणेश उत्सव साजरा करताना मोठ्या आवाजाचा डीजे लावलेला जातो, कर्कश आवाज करणारा बँड देखील असतो. त्यामुळे वातावरण अगदी सुन्न होऊन जातं. इतक्या उच्च तीव्रतेच्या आवाजाने कानाचे पडदे फाटण्याची देखील वेळ येऊ शकते.
ध्वनि प्रदूषण वर निबंध ३०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 300 words
ध्वनी हा हवेद्वारे प्रवेश करतो त्याची गुणवत्ता वातावरणात केली जाते. हळू आणि मृदू आवाज कानाला ऐकायला बरा वाटतो. पण हाच आवाज जर कर्कश असेल तर तो नकोसा वाटतो, त्यापासून त्रास होतो. त्यामुळेच पर्यावरणातील उच्च तीव्रतेच्या कर्कश आवाजाने आज ध्वनी प्रदुषण सारखी समस्या निर्माण झाली आहे.
उच्च आवाजाच्या तीव्रतेमुळे मनुष्याच्या श्रवण यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. ध्वनी प्रदूषण, शहरी आवाज, वाहनांचा आवाज, उच्च तीव्रतेच्या गाण्याचा गोंगाट, कारखान्यातून निर्माण होणारा आवाज यापासून होते. मोबाईल आणि दूरध्वनी यामुळे आज आपण निसर्गाचा शांत आवाज विसरत आहोत. ध्वनी प्रदूषण हे अदृश्य आहे ते दिसत नाही.पण त्यापासून होणारे विपरीत परिणाम मात्र नक्कीच जाणवतात.
ध्वनी प्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना जगणे नकोसे होते. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था बिघडते. भूकंप, त्सुनामी, सोसाट्याच्या वारा, विजेचा आवाज, ढगांची गडगड यासारखे प्रदूषणाचे काही नैसर्गिक कारणे देखील आहेत. ती पर्यावरणाचे मोठे नुकसान करतात.
आपण ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी काही नियम पाळायला हवेत. जसे की बोलत असताना हळू आवाजात बोलावे, गाणे ऐकत असताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, आवश्यक असेल तरच वाहनांचा वापर करावा, इत्यादी.
ध्वनि प्रदूषण वर निबंध ५०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 500 words
ध्वनी प्रदूषण हे निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे सर्वात घातक प्रदूषण आहे. वेगवेगळ्या संख्येच्या शोधातून व तसेच विविध संशोधनातून असे दिसून आले आहे की अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनी प्रदूषणाची बळी पडत आहेत. यापासून निर्माण होणारे दुष्परिणाम मानवी आरोग्यासाठी खूप घातक आहेत.
याची लवकर दक्षता घेतली गेली नाही तर याचे संपूर्ण सजीव सृष्टीवर भयानक परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतात. त्यामुळे सध्या ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करायला हव्यात. सरकारने यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी विविध मोहीम राबवून जनजागृती करायला हवी तसेच ध्वनी प्रदूषणाची विरोधात काही नियम आणि कायदे बनवून त्याची अंमलबजावणी करण्यात यायला हवी.
सरकार ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. मोबाईलचा वापर शक्यतो कमी करावा. मोबाईलवर गाणी ऐकत असताना गाण्याचा आवाज कमी असावा जेणेकरून आपल्या कानाला कोणतीही हानी होऊ नये. ध्वनी प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे.
वृद्ध माणसासाठी आणि गरोदर महिलांसाठी हे प्रदूषण अत्यंत घातक आहे. या कर्कश आवाजाने गर्भवती स्त्रियांनी खूप त्रास होतो तसेच वृध्द व्यक्तींना देखील यापासून हार्ट अटॅक चा धोका आहे कारण उच्च तीव्रतेच्या आवाजाने काळजाचे ठोके वाढतात. कार्यक्रमांमध्ये विविध पक्ष आयोजित करणे उपयुक्त ठरेल. गडगडणारे ढग, विजेचा आवाज, जोराचा वारा या नैसर्गिक क्रियातून देखील ध्वनी प्रदुषण होते. भूकंप, चक्री वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून ध्वनी प्रदूषणावर जास्त परिणाम होतो.
निसर्गाने आपल्याला स्वच्छ आणि निरोगी वातावरण दिले आहे. आपण या पर्यावरणात राहतो व हे पर्यावरण एका विशिष्ट आवरणाने आच्छादलेले आहे त्यात आपण सुरक्षित राहतो. पर्यावरण हे आपले जीवन आहे. पण मानवी कृतीमुळे आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. भविष्यात मानवी जीवन निरोगी ठेवायचे असेल तर आता ध्वनी प्रदुषण सारख्या समस्या कमी कराव्या लागतील.