ताज महल वर निबंध (essay on taj mahal in marathi)

ताज महल वर निबंध (essay on taj mahal in marathi) :- ताज महल ही भारतातील एक सर्वात सुंदर वास्तू आहे आणि ही वास्तू म्हणजे भारतीय पर्यटनाचे केंद्रबिदू म्हणून ओळखल्या जाते. तसेच भारतातील आग्रा येथे स्थित असलेल्या ताज महालची जगातील सात आश्चर्ये मध्ये गणना होते. ताज महाल ही एक भारतीय पर्यटनाला मिळालेला अलंकार आहे.

पाहिले पासून ते दहावी पर्यंत ताज महल वर निबंध (essay on taj mahal in marathi) किंवा मग माझे आवडते पर्यटन स्थळ – ताज महाल (आग्रा) अशा प्रकारचा निबंध हमखास येतो. त्यामुळे या पोस्टमध्ये आपण ताज महल निबंध (essay on taj mahal in marathi) पाहणार आहोत.

ताज महल वर निबंध ( 10 lines on essay on taj mahal in Marathi )

१) ताज महाल ही जगातील सात आश्चर्ये पैकी एक वास्तू आहे.

२) ताज महल ही वास्तू यमुना नदीच्या तीरावर वसलेल्या आग्रा या शहरात आहे.

३) मुघल बादशाह शाहजहान याने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून ताज महल या सुंदर वास्तूची निर्मिती केली.

४) संपूर्ण ताज महल हा पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवलेला आहे.

५) ताजमहाल ही केवळ एकच वास्तू नसून यात अनेक इमारतींचा समावेश आहे.

६) ताज महलमध्ये दोन मशीद, चार मनुरे, एक गेस्ट हाऊस, चार कोपऱ्यात चार तलाव, सुंदर बगीचा आणि मधोमध पाण्याचे फवारे उडवणारे अनेक कारंजे आहेत.

७) ताज महल हे मुघल स्थापत्य शैलीचे अप्रतिम उदाहरण मानले जाते.

८) ताज महल हे मानवी कला आणि कार्याचे उत्कृष्ट नमुना म्हणून देखील ओळखल्या जाते.

९) ताज महलची मुख्य इमारत ६० फूट उंच आणि ८० फूट लांब आहे.

१०) ताज महलच्या मुख्य इमारतीच्या मध्य भागी मुघल बादशहा शहाजहान ची पत्नी मुमताज बेगम ची समाधी आहे.

essay on taj mahal in marathi {300 words}

मला भारत देशातील खूप सारे पर्यटन स्थळे आवडतात. पण त्यातील उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे स्थित असणारे ताज महल हे माझ्यासाठी खूपच खास आकर्षण आहे. कारण ताज महल ची वास्तुकला आणि संपूर्ण परिसर खूपच आकर्षक आणि मनाला आचंबित करणारा आहे. कारण ताज महल मध्ये खूपच सुरेख आणि रेखीव कोरीव काम करण्यात आलेले आहे.

तसेच ताज महल ही वास्तू संगमरवर दगडपासून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचे पांढरे शुभ्र रूप आणखीनच उठून दिसते. असे ही म्हटले जाते की ताज महल चा रंग वेळेनुसार बदलत असतो म्हणजे सकाळी ताज महल पांढरा शुभ्र दिसतो आणि संध्याकाळी सूर्य मावळतीला तो गुलाबी भासतो. ताज ही वास्तू इतकी सुंदर आहे की कुणालाही या वास्तूची भुरळ पडू शकते.

मी जेंव्हा पहिल्यांदा ताज महल पहिला होता तेंव्हा त्याच्या सुंदेरतेमुळे चक्क भारावून गेलो होतो. मला आजही आठवतंय मी इयत्ता आठवी मध्ये असताना आमच्या शाळेची सहल आग्रा पाहण्यासाठी आलेली होती. त्यावेळेस आम्ही तीन दिवस येथे आग्रा शहरात थांबलो होतो. आम्ही आग्रा शहरातील जवळपास सर्व पर्यटन स्थळे पहिली होती. पण त्यातील ताज महल हे मला सर्वाधिक आवडले होते.

आम्ही सहलीच्या वेळेस ताज महलचा पूर्ण परिसर फिरून पहिला होता. ताज महालच्या तोंडाला खूप मोठे भव्य प्रवेश द्वार आहे. त्या प्रवेश द्वारातून आत प्रवेश करताच खूप सारे पाण्याचे कारांजे आहेत. यातील विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व कारंजे एकाच वेळेस पाण्याचा फवारा सोडत होती. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. असे वाटत होते की करांजातील फवारे जणू काही एखाद्या संगितावर नृत्यच करत आहेत.

ताज महालचा संपूर्ण परिसर सुंदर बागीच्याने व्यापलेला आहे. त्यात परिसराला शोभा देणारी खूपच सुंदर वेग वेगळी झाडे आहेत आणि त्यातील काही झाडांच्या सावलीत पर्यटकांना बसण्यासाठी बाकांची देखील व्यवस्था आहे. संपूर्ण ताज महालाचा परिसर फिरून थकलेली लोक या बाकावर बसून थंड सावलीत विसावा घेताना दिसत होती.

ताज महाल च्या मुख्य इमारतीच्या भोवताली चार उंच मनोरे उभे आहेत. या परिसरात दोन मशीद आहेत पण त्यातील एका मशिदीच्या तोंड मक्केच्या दिशेने नसल्याने त्यातील एकच मशीद वापरात आहे, असे तेथील काही लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली. तसेच पर्यटकांसाठी येथे एक गेस्ट हाऊस देखील आहे. पण या गेस्ट हाऊस मध्ये सध्या पर्यटकांना राहण्यासाठी अनुमती नाहीये.

या परिसरात चार कोपऱ्यात चार छोटे तलाव आहेत त्यात सुंदर कमळाची फुले आहेत आणि इतर परिसर देखील मनाला खूप प्रसन्न करणारा आहे.

ताज माहालचा संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर आम्ही सर्वांनी हॉटेल मध्ये जेवण केले आणि आम्ही सायंकाळच्या वेळी घराकडे रवाना झालो. खरंच ताज महल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खूपच मनाला उल्हासित करणारा होता. ताज महल पाहून मला खूप प्रसन्न आणि आनंदी वाटले. त्यामुळे मला ताज महल (आग्रा) हे पर्यटन स्थळ खूप खूप आवडते.

essay on taj mahal in marathi {500 words }

ताज महल ही भारताची शान आहे. ताज महाल हा मुघल बादशहा शहाजहान याने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ ताज महल या अप्रतिम वास्तूची निर्मिती केली. त्यामुळे ताज महल या वास्तूला प्रेमाचे प्रतिक म्हणून देखील ओळखल्या जाते. ही वास्तू दिल्ली पासून जवळपास 300 किमी अंतरावर असणाऱ्या आग्रा शहरात स्थित आहे.

या वास्तूची विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण वास्तू पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे या वास्तूचे स्वरूप अतिशय सुंदर आणि मनाला भावणारे आहे. ताज महल ही वास्तू म्हणजे मानवी कार्याचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जाते.

दरवर्षी जगभरातून जवळपास 3 ते 5 लक्ष पर्यटक ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी येत असतात. यात अनेक देशांतून इतिहासकार आणि वास्तू अभ्यासक देखील ताज महालाच्या अप्रतिम वास्तूचा अभ्यास करण्यासाठी येथे येतत. त्यामुळे भारताच्या पर्यटन विकासामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे कारण ताज महल हे भारतीय पर्यटनाच्या केंद्र स्थानी स्थित आहे.

ताज महल या वास्तूला मुघल वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जाते. ही अप्रतिम वास्तू तयार करण्यासाठी जगभरातील 37 मुख्य डिझायनर आणि 25000 पेक्षाही जास्त कामगारांनी काम केले आहे. ही वास्तू तयार करण्यासाठी शहाजहानने विविध देशांतून उत्तम वास्तुशास्त्र वस्तादांची निवड केलेली होती. त्यांच्या प्रयत्नातून च ही सुंदर वास्तू निर्माण झालेली आहे.

याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. असे सांगण्यात येथे की ताज महाल सारखी दुसरी वास्तू कुणी तयार करू नये म्हणून शहाजहानने ताज महाल बनवणाऱ्या सर्व कामगारांचे हाथ कापले होते.

ताज महाल या वास्तूची निर्मिती 1630 सालि सुरू करण्यात आली होती. ही संपूर्ण वास्तू तयार होण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागली होती. ही संपूर्ण वास्तू जवळपास 44 एक्कर मध्ये आहे आणि यातील मुख्य इमारतीची उंची 60 फूट आणि लांबी 80 फूट आहे.

ही वास्तू इतकी सुंदर आहे की या वास्तूला जगातील साथ आश्चर्य पैकी एक गणले जाते. तसेच ताज महल ला 1983 मध्ये युनोस्कॉने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

ताज महाल ही वास्तू जरी अतिशय सुंदर असली तरी सुद्धा आता तिच्या सुंदरता वर आंच येत आहे. आज जागतिक कारणामुळे कारखाने आणि वाहनांमुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणत होत आहे. याच गोष्टीचे परिणाम ताज महाल वर पडत. अतिशय शोभनिय असणारा ताज महल प्रदूषणामुळे पिवळा पडत आहे.

ताज महाल ही भारत देशाची शान आणि आभिमान आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे हे आपण सर्वांचं कर्तव्य आहे. ताज महाल ही वास्तू मनाला भुरळ पाडणारी आहे. मला ताज महल खूप खूप आवडते.

टीप : मित्रानो आजच्या या पोस्टमध्ये आपण ताज महल वर निबंध (essay on taj mahal in marathi) हा निबंध पहिला. हा निबंध तुम्ही पहिली पासून ते बारावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता.

मला आशा आहे की ताज महल निबंध (essay on taj mahal in marathi) हा निबंध taj mahal nibandh in marathi तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर इतर कोणत्याही विषयावर आधारित निबंध हवा असेल तर मला कॉमेंट मध्ये कळवा, धन्यवाद.

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment