Essay on cricket in marathi / my favourite game cricket essay in marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध : शालेय जीवनात आपण अनेक खेळ खेळतो. प्रत्येक खेळाचे काही ठराविक नियम असतात आणि त्या नियमांचे पालन करूनच खेळ खेळले जातात. पण प्रत्येकाला कोणता न कोणता खेळ हा नक्कीच आवडत असतो. बहुदा क्रिकेट हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. या खेळाचे संपूर्ण जगात खूप जास्त चाहते आहेत.
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात देखील माझा आवडता खेळ हा निबंध लिहायला असतो. बहुदा अनेक मुले माझा आवडता खेळ क्रिकेट असाच निबंध लिहितात. त्यामुळे या पोस्टमध्ये आम्ही क्रिकेट वर निबंध लिहिलेला आहे. हा निबंध तुम्हाला परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल !
Table of Contents
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध १०० शब्दात | essay on cricket in marathi in 100 words
माझा आवडता खेळ क्रिकेट हा आहे. क्रिकेट हा मैदानी खेळ आहे. मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात. क्रिकेट हा मैदानावर दोन संघांनी खेळला जाणारा खेळ आहे. एका संघात अकरा खेळाडूं असतात. तसेच काही राखीव खेळाडू देखील असतात. जर या आकरा खेळाडू पैकी एखादा खेळाडू जर खेळताना जखमी झाला, किंवा त्याला काही समस्या असेल तर त्याचाजागी राखीव खेळाडू मैदानावर उतरतो.
दोन्ही संघातील मिळून एकूण बावीस खेळाडू मैदानावर खेळत असतात.एक संघ फलंदाजी संग म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. या संघाला पुढच्या संघाला बाद करण्यासाठी त्यानी दिलेले टार्गेट पूर्ण करायचे असते. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्या नंतर किंवा शतके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपली जागा बदलतात.
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध २०० शब्दात | essay on cricket in marathi in 200 words
क्रिकेट हा सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. यात दोन्ही संघाचे मिळून २२ खेळाडू खेळत असतात. प्रत्येक संघामध्ये एक कॅप्टन, उप कॅप्टन आणि इतर खेळाडू असतात. संघातील सर्व निर्णय हे कॅप्टन च्या हाती असतात. कॅप्टन दिलेली आज्ञा सर्व खेळाडूंना पाळावी लागते.
एकच गोलंदाजाने एकामागोमाग सहा वेळा चेंडू फेक केल्यानंतर चेंडू फेकीचे एक शतक पूर्ण होते त्याला ओव्हर असे म्हटले जाते. क्रिकेट मॅच हा २० किंवा ५० ओवर्सचा असतो. त्यानंतर दुसरा गोलंदाज खेळ पट्टी च्या दुसऱ्या बाजूने टाकतो.
दोन्ही संघाचे खेळाडू दोन रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचा शिवाय काही खेळाडू चेंडू लागून होणाऱ्या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी संरक्षण साधने वापरतात. क्रिकेट हा खेळ महिलासुद्धा खेळत आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी बॅट आणि चेंडूची आवश्यकता असते.
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध ३०० शब्दात | essay on cricket in marathi in 300 words
क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ आहे. क्रिकेटचे मैदान हे वर्तुळाकार किंवा दीर्घ वर्तुळाकार असते. प्रत्येक खेळात दोन्ही संघ आणि क्षेत्ररक्षण जागा आदला बदलतात. मैदानाच्या मधोमध आयताकृती खेळपट्टी असते. त्या आयाताकृती खेळपट्टी वर फलंदाज आणि गोलंदाज खेळतात आणि बाकीच्या मैदानात इतर खेळाडू क्षेत्र रक्षण करतात.
क्रिकेट हा एक राष्ट्रीय खेळ आहे. हा खेळ एकाच देशातील दोन संघा दरम्यानच नाही तर भारत-पाक , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशाच्या दोन संघात देखील खेळला जातो. प्रत्येक देशातील संघाचा एक ड्रेसकोड असतो त्यानुसारच संघाची ओळख होते.
दर चार वर्षांनी आयसीसी स्तरावर क्रिकेटची सामने आयोजित केली जाते. विविध क्रिकेट संघाद्वारे खेळासाठी इच्छा स्थापना केली जाते. यात अनेक देशांचे क्रिकेट संघ सहभागी होतात. यात सहभागी देशांच्या क्रिकेट संघाचे एकमेकांच्या विरुद्ध सामने खेळवले जातात. ज्या देशाचा संघ सर्व देशाविरुद्ध सामने जिंकतो तो संघ विजयी संघ ठरतो.
विजयी संघाला पारितोषिक आणि ट्रॉफी दिली जाते. तसेच जे खेळाडू खेळा दरम्यान विशेष कामगिरी करतात त्यांना “मॅन ऑफ द मॅच” चा पुरस्कार दिला जातो. जास्तीत जास्त रण करणाऱ्या आणि जास्तीत जास्त खेळाडूंना बाद करणाऱ्या खेळाडूंना देखील पुरस्कार दिले जातात.
तसेच आजच्या युगात महिला देखील क्रिकेट या खेळात आघाडीवर आहेत. महिलांचे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅच खेळवले जातात. आज भारतीय महिला देखील क्रिकेट खेळात आघाडीवर आहेत. भारतीय महिला खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारत देशाला मिळवून दिलेले आहेत. ही सर्व भारतीयांसाठी खूप कौतुकास्पद बाब आहे.
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध ५०० शब्दात | essay on cricket in marathi in 500 words
क्रिकेट हा खेळ प्रत्येकाला आवडतो. प्रत्येक शाळेमध्ये क्रिकेट हा खेळ घेतला जातो. हा खेळ लहान मैदानात, रस्ते आणि मोकळ्या ठिकाणी मुले खेळतात. लहान मुले या खेळाचे खूप वेडी आहेत. आज लहान मुलापासून मोठ्या पर्यंत सर्वांना क्रकेट खेळायला आवडते. क्रिकेट हा खेळ पाहण्यासाठी देखील खूप लोकांमध्ये उत्साह असतो.
आपल्या भारत देशात भरपूर खेळ आहेत पण क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडणारा आहे. क्रिकेट हा खेळ मला खूप आवडतो. हा खेळ इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. भारत देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे. क्रिकेट हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ जरी नसला तरी तो सर्वांना खूप आवडतो. या खेळात शरीराचा खूप व्यायाम होतो त्यामुळे हा खेळ खेळल्याने शरीर मजबूत राहते.
क्रिकेट हा खेळ इतका रमणीय आहे की तो एकदा पाहिला की आणखी पहावासा वाटतो. क्रिकेट खेळन्या मध्ये एक वेगळाच आनंद आहे. तो आनंद इतर खेळां मध्ये नाही . खेळामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो. या खेळामध्ये चेंडू आणि लाकडी फळी महत्त्वाची आहे जिला बॅट असे म्हटले जाते. कुणाला चेंडू फेकायला आवडतो तर कुणाला बॅटिंग करायला आवडते.
या खेळातील माझा सर्वात आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. हा खेळ गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा कोणीही खेळू शकतो. म्हणून मला हा खेळ खूप आवडतो. आम्ही हा खेळ रबरी बोलनी खेळतो. मला या खेळाचे नियम खूप आवडतात.