जल प्रदूषण वर निबंध | water pollution essay in marathi

Water pollution essay in marathi जल प्रदुषण वर निबंध : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजचे मानवी जीवन हे जरी सोयीस्कर झाले असले , जरी आज मनुष्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्यातूनच प्रदूषणाची देखील निर्मिती झाली आहे. अनेक प्रकारचे प्रदुषण आज मनुष्याच्या निरोगी शरीरावर परिणाम करत आहेत. त्यामध्ये जल प्रदुषण हे आजच्या काळात आणि भविष्यात मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. यातूनच स्वच्छ पाण्याचे साठे दूषित होऊन पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण कमी होत आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आम्ही जल प्रदुषण वर निबंध water pollution essay in marathi लिहून दिलेला आहे. हा निबंध परीक्षेत नेहमीच विचारला जातो. त्यामुळे सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी हा जल प्रदुषण वर मराठी निबंध अत्यंत उपयुक्त ठरेल.

जल प्रदुषण वर निबंध १०० शब्दात | Water pollution essay in marathi in 100 words

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक पिके घेतली जातात आणि त्या पिकांसाठी अनेक प्रकारचे खते, औषधे यांचा वापर केला जातो. पावसाळ्याच्या पाण्याबरोबर खतांचा आणि औषधांचा निचरा होऊन ते पाण्यात मिसळले जातात आणि पाणी प्रदूषित होते. त्यामुळे मृदा प्रदुषण होऊन जमीन पण नापीक होत चालली आहे. म्हणून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून मृदा आणि जल प्रदुषण होणार नाही.

पृथ्वीवरील पाणी हे अनेक मार्गाने प्रदूषित होत आहे. यासाठी सर्वस्वी मनुष्य जबाबदार आहे. मनुष्याने विकासाच्या हावसापोटी नैसर्गिक संपत्तीचा दुरुपयोग करून प्रदुषण सारखे संकट ओढून घेतले आहे. आज जल प्रदुषण ही मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. यातून पिण्याचा पणुळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जल प्रदुषण वर निबंध २०० शब्दात | Water pollution essay in marathi in 200 words

सांडपाण्यामध्ये रसायने आणि जीवाणू असतात जे मानवी जीवनासाठी आणि पर्यावरणीय आरोग्यासाठी हानिकारक असतात. हे सर्व दूषित पाणी आपण नदी नाल्यामध्ये सोडून पाण्याचे नैसर्गिक स्रोत देखील दूषित करत आहोत. आजच्या काळात दूषित पाणी पिल्याने अनेक पशू पक्षी आणि जलिय जीव मरत आहेत. तसेच मानवी आरोग्यावर देखील दूषित पाण्यामुळे विपरीत परिणाम होत आहेत.

त्यामुळे जल प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. विविध मोहीम राबवून गावातील आणि शहरातील लोकांना जल प्रदूषणाबाबत जागृत करायला हवे, त्यांना पाण्याची बचत करून पाण्याचे प्रदुषण कसे रोखता येईल यासाठी मार्गदर्शन करायला हवे.

तसेच नागरिकांनी देखील जल प्रदुषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरातील सांड पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जर सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर जल प्रदुषण नक्कीच नियंत्रणात येऊ शकते.

जल प्रदुषण वर निबंध ३०० शब्दात | Water pollution essay in marathi in 300 words

जल हेच जीवन आहे अशी एक म्हण आहे आणि ती अत्यंत योग्य आहे. कारण मनुष्याला जीवन जगण्यासाठी लागणारा पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पाणी असेल तरच मनुष्याचे जीवन आहे. पाणी आपल्या जीवनाचा आधार आहे. आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे असे आपण म्हणतो, पण पाणी शुद्ध ठेवणे खुप महत्वाचे आहे.

पाणी मानवाचा नाही तर पक्षी, प्राणी आणि सर्व सजीव जीवनाचा आधार आहे. पण हेच पाणी आज पिण्यायोग्य राहिले नाही. आज शहरातील दूषित कचरा आणि सांडपाणी हे नदीत सोडले जाते तसेच कारखान्यातील रसायनयुक्त दूषित पाणी देखील नदी, तलावात सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे.

तसेच खेडे गावात नदीच्या पाण्यात भांडी, कपडे धुतले जातात तसेच जनावरे देखील नदीच्याच पाण्यात धुतली जातात. त्यामुळे देखील नदीचे पाणी दूषित होत आहे. याचा परिणाम सर्व जलिय प्राणी तसेच मनुष्यावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. नदीतील, समुद्रातील जलीय जीव या प्रदूषणामुळे मोठ्या संख्येने मारताना दिसत आहेत, कित्येक जलिय प्रजाती आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आजच्या काळात मानव जी रसायने बनवतो आणि वापरतो त्यामूळे पाणी दूषित होते. आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक , गवत यांच्यावर औषधाचा वापर करतो ते औषधाचे रसायन पाण्याच्या मध्यामाने जमिनीत मुरते आणि त्यापासून देखील जल प्रदुषण होते.

भारतातील जल प्रदूषणाची परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत वाईट आहे. भारतातील सर्वात प्रदूषित गंगा नदी आहे. त्यामुळे जर भविष्यात स्वच्छ पाणी प्यायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर आज जल प्रदुषण रोखणे खूप गरजेचे आहे.

जल प्रदुषण वर निबंध ५०० शब्दात | Water pollution essay in marathi in 500 words

हवा, पाणी ,अन्न या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या सर्व मूलभूत गरजा आपल्याला निसर्गातून मिळतात त्यामुळे जर निसर्ग स्वच्छ आणि सुंदर राहिला तर मनुष्याचे आरोग्य ही नक्कीच तंदुरुस्त राहील. परंतु आज जल प्रदूषणामुळे निसर्गातील उपलब्ध पाणी दूषित होत आहे. त्यामुळे कित्येक आजार पसरत आहेत. त्यामुळे आज पाणी स्वच्छ करणे आणि शुद्ध करणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

आपल्या पृथ्वीवर निश्चित पाणी आहे. त्यातील 75% पाणी हे समुद्रात पिण्यायोग्य आहे. इतर 25% पाणी हे विविध रूपात उपलब्ध आहे पण त्यातील केवळ 1% ते 2% पेक्षा कमी पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यामुळे जर मनुष्याला भविष्यात पाणी संकटापासून स्वताला वाचवायचे असेल तर आज पाण्याची बचत करणे आणि जल प्रदुषण रोखणे खूप गरजेचे आहे.

जलचक्र ही एक निसर्गाची प्रक्रिया आहे. जल प्रदूषण म्हणजे विविध प्रदूषित कारके मिसळून बनलेले प्रदूषित पाणी किंवा खराब पाणी. नद्या, ओढे ,तलाव ,समुद्र ,विहिरी ,तळे यातील पाणी दूषित होत आहे. पाणी हा मानव आरोग्याचा महत्त्वाचा घटक आहे. प्रदूषित पाणी मानवाच्या शरीरावर परिणाम करते, रोगराई निर्माण करते.

दूषित पाण्यामुळे पोटदुखी, डायरिया, उलटी होणे, कावीळ यासारखे आजार जडतात . आपल्या जीवनातील पाण्याचे महत्व लोकांना समजले पाहिजे आणि ते स्वच्छ करणे आवश्यक आहे. जेव्हा पण आपण प्रदूषित पाणी पितो तेव्हा रसायने आणि जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आरोग्य बिघडते. आजच्या काळामध्ये जल प्रदूषण ही एक खूप मोठी समस्या बनली आहे.

Leave a Comment