[१०००+ शब्दात] माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi

my village essay in marathi माझे गाव मराठी निबंध : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आपल्याला आपले गाव नेहमीच प्रिय असते, आपण जरी शहरात राहायला गेलो तरी गावाकडील आठवणी या नेहमीच आपल्या सोबत असतात. आपल्याला गावाकडील ओढ नेहमीच असते. बहुतेक वेळेस परीक्षेत देखील माझे गाव वर निबंध my village essay in marathi लिहायला सांगितला जातो.

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi

त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मित्रांसाठी माझे गाव या विषयावर सुंदर शब्दात निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शाळकरी विद्यार्थी मित्रांसाठी खूप उपयुक्त आहे.

माझे गाव या विषयावर १० ओळीत निबंध | 10 lines on my village in marathi

  1. माझ्या गावाचे नाव अहमदपूर आहे. हे गाव लातूर जील्यामध्ये वसलेले आहे.
  2. हे एक छोटं गाव आहे. गावामध्ये फक्त 170 घरे आहेत.
  3. हे गाव गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
  4. गावातील जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. गावातील सर्व शेतकरी दिवसरात्र शेतात कष्ट करतात.
  5. आमच्या गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे.
  6. गावातील नदीच्या किनाऱ्यावर शिवमंदिर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.
  7. गावामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे.
  8. माझे गाव खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे.
  9. गावामधील सर्व लोक सामंजस्याने आणि एकोप्याने राहतात.
  10. माझे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे त्यामुळे मला माझे गाव खूप

माझे गाव मराठी निबंध 100 शब्दात | my village essay in marathi in 100 words

माझ्या गावाचे नाव धारासुर आहे. हे गाव लातूर शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. गावाला प्राचीन इतिहास आहे, गावामध्ये घृष्णेश्वर प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 200 वर्ष पुराणे अतिप्राचीन असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे खूप मोठी यात्रा भरते. यात्रेत खाद्यपदार्थांचे, फळा फुलांचे, खेळण्यांचे स्टॉल लागतात.

मी दरवर्षी महाशिवरात्रीला माझ्या गावी यात्रेला जातो. यात्रेत खूप मोजमजा करतो. मला ही गावातील यात्रा खूप आवडते. येथे घृष्णेश्वर म्हणजेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लोक येतात. तसेच या प्राचीन मंदिराच्या कलाकृतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक देखील येथे येत असतात.

माझे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. गावातील शांत आणि प्रसन्न वातावरण आहे, गावातील लोक देखील खूप दयाळू आहेत. गावामध्ये राहणे मला खूपच आल्हादायक वाटते, त्यामुळे मला माझे गाव खूप आवडते.

माझे गाव मराठी निबंध 300 शब्दात | my village essay in marathi in 300 words

माझ्या गावाचे नाव अंगलगाव आहे. हे गाव परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात वसलेले आहे. माझ्या गावापासून 2किमी अंतरावर अंगलेश्वराचे खूप मोठे मंदिर आहे. येथे भगवान राम यांनी वनवासात असताना यज्ञ केला होता अशी अख्यायिका सांगितली जाते, त्यामुळे या ठिकाणी खूप मोठे महादेवाचे मंदीर उभारण्यात आलेले आहे. हे अंगलेश्र्वराचे मंदिर म्हणजे गावातील सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. या अंगलेश्वराच्या मंदिरवरुंच माझ्या गावाचे नाव अंगलगांव पडले असावे असे मला वाटते.

अंगलेश्र्वराच्या मंदिरात प्रत्येक एकादशीला भजन कीर्तन होते, तसेच फराळ वाटप देखील होतो. त्यामुळे प्रत्येक एकादशीच्या दिवशी संपूर्ण गाव या मंदिराच्या परिसरात भजन कीर्तनात तल्लीन होऊन जातो.

माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. गावातील लोक शेतातून अन्न धान्य पिकवण्यासाठी खूप मेहनत घेतात. तसेच सर्व लोक सायंकाळी गावातील हनुमान मंदीरात एकत्र जमतात, इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करतात. गावामध्ये गणपती उत्सव, होळी, दसरा यारखे सण उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. माझ्या गावातील लोक कधीही शुल्लक कारणावरून एकमेकांशी भांडत नाहीत, ते खूप गुण्यागोविंदाने राहतात.

गावामध्ये एक व्यायामशाळा देखील आहे. शहरातील व्यायाम शाळे एवढी प्रगत उपकरणे जरी आमच्या व्यायाम शाळेत नसली तरी पण येतील तरुण मुलामध्ये व्यायाम करण्यासाठी एक अप्रतिम उत्साह आहे. ही व्यायाम शाळा सकाळी आणि सायंकाळी तरुण मुलांनी गच्च भरलेली असते.

माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे. गावाच्या मध्यभागी एक विहीर आहे. गावातील महिला या विहिरीतून पाणी शेंदुन भरतात. या विहिरीचे पाणी खूपच स्वच्छ आणि गोड आहे. तसेच संडवांडीच्या पाण्यासाठी घरोघरी नदीचे पाणी नळाने पोहचवले जाते.

मला गावात राहायला खूप आवडते कारण गावामध्ये माझे खूप जिवलग मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत खूप सारे खेळ खेळत असतो. मी नेहमी उन्हाळ्याच्या सुटीत माझ्या गावी जातो.

माझे गाव मराठी निबंध 500 शब्दात | my village essay in marathi in 500 words

माझा जन्म परभणी जिल्ह्यातील पोखरणी या गावी झाला आहे. माझे बालपण मी या गावीच जगले आहे. या माझ्या गावातील माझे खूप सारे अविस्मरणीय अनुभव आहेत. मला नेहमी माझ्या गावाची, गावाकडील मित्र – मैत्रिणींची आठवण येते.

मी नेहमी शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये माझ्या गावी जातो. माझे गाव परभणी शहरापासून 30 किमी अंतरावर आहे. माझ्या गावी जाण्यासाठी परभणी बस स्थानकातून प्रत्येकी एका तासानंतर बस असते. त्यामुळे मला गावी जाण्यासाठी पुणे ते परभणी रेल्वेने आणि त्यानंतर परभणी पासून माझ्या गावापर्यंत बसणे प्रवास करावा लागतो.

परभणी पासून माझ्या गावापर्यंत चा प्रवास खूप सुखद असतो, कारण या प्रवासादरम्यान हिरवीगार शेते, विविध फळा फुलांच्या झाडांनी आच्छादलेले डोंगर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

माझे गाव हे खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे. माझे गाव हे असे ठिकाण आहे जेथे शहराप्रमाणे कचऱ्याचे ढीग नाहीत, रसायनयुक्त प्रदूषित पाणी आणि हवा देखील नाही. माझ्या गावामध्ये खूपच स्वच्छ पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत.

गावाच्या मधोमध पिण्याच्या पाण्यासाठी मोठी विहीर आहे. या विहिरीवर सकाळी आणि सायंकाळी पाणी भरण्यासाठी बाया पोरांची नेहमीच लगबग दिसते. विहिरीतून शेंदून पाणी काढण्यात एक ओरच मज्जा असते. शिवाय गावातील हवा देखील स्वच्छ आणि प्रदूषण विरहित असते त्यामुळे गावातील संपूर्ण वातावरण पोषक आणि आल्हादायक असते.

शिवाय गावातील लोक देखील खूपच प्रेमळ आणि मदत करणारे असतात. ते नेहमी एकत्र सामंजस्याने राहतात, एकत्र सण उत्सव साजरे करतात, यातून गावातील एकोप्याचे यथार्थ दर्शन घडते. गावातील वातावरण अत्यंत शांत असते, येतील लोक कधीही भांडणे करत नाहीत. गावातील लोक एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होतात, ते खूप सहाय्यक वृत्तीचे असतात.

माझ्या गावातील जवळपास सर्वांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे. त्यामुळे गावाच्या आजूबाजुला सर्वत्र हिरवीगार बहरलेले शेते आहेत. मी गावाकडे गेल्यानंतर नेहमी शेतात जातो, शेतातील ऊस, जांब, बोर यासारखा मेवा खायला मला खूप आवडतो.

महानगरातील जीवन हे अत्यंत सुखद आणि मनोरंजक असले तरी ते गावातील जीवना इतके समृध्द असूच शकत नाही. गावात जरी शहराप्रमाणे प्रगत सुविधा नसल्या तरी गावातील निसर्ग सौंदर्य, येतील सण उत्सव, रूढी परंपरा, जनजीवन नक्कीच मनाला ओढ लावते. त्यामुळे मला शहरापेक्षा माझे खेडेगाव खूप आवडते.

आपण काय शिकलो?

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझे गाव मराठी निबंध my village essay in marathi या विषयावर वेगवेगळ्या शब्दात निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्ही इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत वापरू शकता.

मला आशा आहे की तुम्हाला माझे गाव निबंध खूप आवडला असेल. हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला एखाद्या विषयावर निबंध हवा असेल तर ते ही कळवा, धन्यवाद…!

Leave a Comment