savitribai Phule essay in marathi : सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलींचे शिक्षण आणि स्त्रियांचे कल्याण साधण्यात व्यथित केले. मुलींना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ज्योतिबा फुले यांच्या साह्याने पुणे शहरात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांनी समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध देखील लढा दिला. त्यांनी केलेले कार्य संपूर्ण स्त्रियांसाठी खूपच मूल्यवान आहे.
आजच्या या पोस्टमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वर निबंध लिहून दिलेला आहे. या निबंधातून सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती, शिक्षण, पुरस्कार, कार्य या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
सावित्रीबाई फुले वर निबंध १०० शब्दात | savitribai phule essay in marathi in 100 words
सावित्री बाई फुले जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. सावित्री बाई फुले यांचे वयाच्या नऊव्यावर्षी जोतिबा फुले यांच्याशी लग्न झाले. महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान विचारवंत समाजसुधारक, लेखक आणी क्रांतिकारक होते. सावित्री बाई फुले यांना भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.
त्यांना भारतीय स्त्रीविधाची जननी मानले जाते. त्यांचे पती जोतिबाराव फुले यांच्या प्रदेशात त्यांनी भारतातील महिला आधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्री बईनी आणि ज्योतिबा रावांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली.
त्यांनी विधवा, केशवपन थांबवण्यासाठी नहाव्याचा संप केला. सवित्री बाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते तर वडीलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते . सावित्री बाईचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे गोरे परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली. त्यामुळे त्यानंतर त्यांचे गोरे हे आडनाव संपुष्टात येऊन तेथील लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागली.
सावित्रीबाई फुले वर निबंध २०० शब्दात | savitribai phule essay in marathi in 200 words
सावित्री बाई फुले यांचे टोपण नाव ज्ञानज्योती आणि ज्योती असे होते. सावित्री बाई फुले या धर्माने हिंदू होत्या. त्यांचा जन्मदिवस हाा संपूर्ण भारत देशात बालिका दिन म्हणून साजरा केेला जातो. स्वतः सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत. त्याकाळी मुलींना शिक्षण घेण्यास त्या काळातील लोकांची परवानगी नव्हती. त्यामुळे सावित्रीबाई देखील सुरुवातीला अशिक्षित होत्या. मुलींना शाळेत शिकवण्या अगोदर सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे घेतले.
पण त्याकाळी मुलींना शिकवणे हे इतके सोपे नव्हते. त्यांना लोकांच्या कडक विरोधाचा सामना करावा लागला. सावित्री बाई शाळेत जात असताना धर्माचे आणि स्त्री शिक्षणाचे विरोधी लोक कचरा , गाळ, आणि शेण त्यांचावर टाकत. यामुळे सावित्री बाईंचे कपडे घान व्हायचे , म्हणुन त्या आणखी एक साडी आपल्या सोबत घ्यायच्या आणि शाळेत आल्यावर ती साडी बदलत असे.
इतके असूनही त्यांनी हार मानली नाही. स्त्री बालहत्या रोकण्यासाठी त्यांनी नवजात मुलांसाठी एक आश्रम ही उघडल. त्यानंतर सावित्री बाई फुले यांनी माघे फिरून पाहिले नाही. त्यांच्या जीवन काळात त्यांनी पुण्यात 18 महिला शाळा उघडल्या . जोतिबा फुले हे स्वतः अध्यक्ष होते आणि सावित्री बाई फुले या महिला विभागाच्या प्रमुख होत्या .
जोतिबा फुले यांनी जन्मभर खालच्या जाती , महिला आणि दलीत यांच्यासाठी काम केले. या कामात सावित्री बाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी मोलाची कामगिरी केली.
सावित्रीबाई फुले वर निबंध ५०० शब्दात | savitribai phule essay in marathi in 500 words
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री कल्याणासाठी देखील खूप कार्य केले. त्यांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आपल्या पती समवेत काशीबाई नावाच्या विधवेचा स्वीकार केला आणि तिला आपुलकी दिली. नंतर त्यांनी यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याला चांगले संस्कार व शिक्षण दिले. तो मुलगा नंतर मोठा डॉक्टर झाला. सावित्रीच बाई फुले मुळे आज प्रत्येक घरातील मुली शिकत आहेत. सावित्री बाई शिकल्या म्हणून मुलींना स्वतःचा हाक निर्माण करता आला.
सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक महिलांचे जीवन जगणे सोपे केले आहे. आज प्रत्येक जागी स्त्रीला मान दिला जात आहे म्हणून त्या खूप मेहनत करत आहेत. पहिल्या कली स्त्रियांना शिक्षण घेण्याचे, मनसोक्त जगण्याचे अधिकार नव्हते आणि आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियाच अव्वल आहेत. त्यांच्यामुळेच आज सर्व क्षेत्रात स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. सावित्रीबाई शिकल्या नसत्या तर आजही स्त्रिया चूल आणि मूल यातच गुंतून राहिल्या असत्या.
सावित्रीबाई फुले या अगदी नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी लाऊन देण्यात आला. परंतु त्यांना स्त्रियांवरील बंधने मुळीच मान्य नव्हती. त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचार थांबावे यासाठी स्त्रियांचे कल्याणासाठी काम करायला सुरु केले. त्यांना माहिती होते की जर स्त्रियांना समाजात मान, संमान मिळवून द्यायचा असेल, त्यांच्यावरील अत्याचार थांबवायचे असतील तर त्यांना अगोदर शिक्षित करणे खूप गरजेचे आहे. म्हणून त्यांनी पुण्यातील भिडे गुरुजी यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
सावित्री बाई फुले या लेखिका आणि कवयत्री सुद्धा होत्या. त्यांनी 1854 मध्ये काव्यफुले आणि 1892 मध्ये बावन काशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि “जा शिक्षण मिळवा” नावाची कविता प्रकाशित केली. ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतः ला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले.
त्यांनी महिलांसाठी निवारा स्थान उघडले जिथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची साक्षी तकणे प्रसूती करू शकत होत्या. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सती प्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी आश्रमाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे.