Teachers day essay in marathi शिक्षक दिन निबंध मराठी, शिक्षक दिन वर निबंध : संपूर्ण भारत देशात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. हा शिक्षक दिवस सर्व शाळा आणि कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
या पोस्टमध्ये शिक्षक दिवस वर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध वेगवेगळ्या शब्दात लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.
Table of Contents
शिक्षक दिन वर निबंध १०० शब्दात | Teachers day essay in marathi in 100 words
आपल्या भारतातील प्रथम शिक्षक महात्मा ज्योतिबा राव फुले आणि सावित्रीबाई फुले हे होते. आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात त्यानंतर शिक्षक हे आपले गुरू असतात. कारण आई वडील आपल्याला लहानपणापासून चांगल्या सवयी शिकवतात आणि आपल्यावर चांगले संस्कार करतात. तर शिक्षक हे विद्यार्थ्यांना सामाजिक, आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान देऊन त्याचा सर्वांगीण विकास करतात.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भावी शिल्पकार असतो. एखादा मूर्तिकार ज्याप्रमाणे दगडावर संस्कार करून त्यापासून सुबक आणि सुंदर मूर्ती बनवतो त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवतात.
शिक्षक दिन वर निबंध २०० शब्दात | Teachers day essay in marathi in 200 words
शिक्षक हा ज्ञानाचा आणि पवित्रतेचा सागर आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक होते. त्यांना शिक्षनाचा आदर आणि शिक्षणावर प्रेम होते. त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेमध्ये मोठे मोठे कार्यक्रम साजरे केले जातात जातात.
आम्ही लहान असताना हा कार्यक्रम आमच्या शाळेत खूप छान साजरा केला जायचा. इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षक बनून आम्हाला छोट्या वर्गाना शिकवायचे. हा दिवस खूपच मनोरंजनाचा असायचा. आमचे शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात. आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात.
विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांचा आदर केला पाहिजे. विद्यार्थ्यांचे भविष्य हे शिक्षणावर आवलंबून असते. विद्यार्थ्याचे मन शिक्षनात लावणे हे त्यांना माहीत असते. जेव्हा जेव्हा विद्यार्थी चूक करतो तेव्हा शिक्षक त्याला समजावून सांगतो. माझ्या आयुष्यात शिक्षकांचे खूप मोठे स्थान आहे.
शिक्षक दिन वर निबंध ३०० शब्दात | Teachers day essay in marathi in 300 words
आपल्या भारत देशात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून जगासमोर आला. दिव्य भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस भारत देशात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. ते विद्वान आणि थोर महात्मे होते तसेच एक आदर्श आणि चांगले शिक्षक देखील होते. शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊन त्यापासून एक चांगली व्यक्ती घडवतो.
शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञानच नव्हे तर व्यावहारिक ज्ञान देखील देखील, तसेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार देखील करतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागचा हेतू असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले वळण लाऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडवतात.
शिक्षकाला सर आणि गुरुजी म्हणतात. पण आम्ही त्यांना गुरुजी म्हणतो. आम्हाला प्रत्येक ठिकाणी शिक्षक खूप मार्गदर्शन करतात. चांगले शिक्षण देण्यासाठी मोठी शाळा शोधू नका तर चांगले आणि आदर्श शिक्षक शोधा. कारण शिक्षकांन पासून आपण सर्व काही शिकतो.
सर्व शाळांमध्ये हा दिवस खूप मोठा साजरा केला जातो. असे म्हणतात की या दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांना मनापासून आशीर्वाद देतात तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी मोठ्या वर्गातील विद्यार्थी वर्गाने लहान असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात . जीवनात शिक्षकांचे खूप महत्त्व आहे. शिक्षकांनी मार्गदर्शन केलेल्या मार्गावर आपण सर्व जीवन जगतो.
शिक्षक दिन वर निबंध ५०० शब्दात | Teachers day essay in marathi in 500 words
५ सप्टेंबर हा दिवस भारत देशात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देखील असते. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा खरा शिल्पकार असतो. तो विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करतो आमचे शिक्षक आम्हाला सर्वांशी चांगले वागावे, चांगले अन्न खाणे, इतरांशी चांगले वागणे, वाईट सवयी पासुन दूर राहणे, खोटे बोलू नये या गोष्टी सांगतात. शिक्षक हा विद्यार्थ्याचा चांगला मार्गदर्शक असतो.
आपल्या भारत देशा बरोबरच इतर देशांमध्ये शिक्षक दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. सर्व देशांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे शिक्षकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक करणे. हा कार्यक्रम साजरा करत असताना विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठी तयारी केली जाते.
आईवडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही जीवनातील सर्वात पहिले गुरू आपले आई-वडील आसतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. शिक्षका मुळेच भविष्यातले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, कलेक्टर यान पेक्षा अनेक पदव्या विद्यार्थ्यांनी मिळवलल्या आहेत. शिक्षकच चांगले चरित्र निर्माण करू शकतात.
शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना चांगला मार्ग दाखवतात. विद्यार्थी या दिवशी आपल्या शिक्षकांना आदराने फुल आणि भेटवस्तू देतात. शिक्षका शिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपूर्ण आहे.
मी एक विद्यार्थी असल्याने माझ्या सर्व शिक्षकांसाठी मी आभारी राहीन. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूला एक महत्त्वाचे स्थान असते. हा दिवस शिक्षकांसाठी खूप आनंदाचा असतो. त्याला आपल्या कष्टाचे आणि कर्तव्याची जाणीव करून देतो. शिक्षका शिवाय विद्यार्थ्याचे जीवन असहाय्य आहे.