my online school essay in marathi माझी ऑनलाईन शाळा निबंध, ऑनलाईन शाळेवर मराठी निबंध : 2020 वर्ष हे संपूर्ण जगासाठी खूपच कठीण आणि वाईट होते. कारण याच वर्षी मार्च महिन्यापासून करुणा (Covid -19) नामक रोगाने संपूर्ण जगामध्ये थैमान घालायला सुरुवात केली होती.
हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे या रोगाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याची लागण होते. त्यामुळे 2020 च्या मार्च महिन्यापासून भारत देशातील सर्व शाळांनी विद्यार्थांच्या सुरुक्षिततेसाठी ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या पोस्टमध्ये माझी ऑनलाईन शाळा, ऑनलाईन शाळेचे फायदे तोटे या विषयावर निबंध लिहून दिलेले आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे.
माझी ऑनलाईन शाळा निबंध | My online school essay in marathi in 500 words
2020 वर्ष हे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कारण हे वर्ष मी आणि माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय वर्ष आहे. कारण या वर्षाने अनेक शालेय विद्यार्थांच्या आयुष्यात अनेक संकटे आणली, विद्यार्थांच्या शिक्षणामध्ये बाधा आणली. त्यामुळे कित्येक विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले. याच काळात कोरोना नावाच्या महारोगाने थैमान घातले असल्यामुळे ऑनलाईन शाळेची संकल्पना उदयास आली.
2020 या वर्षातील फेब्रुवारी महिना अभ्यासाच्या, खेळण्याच्या धुंदीत कधी संपला कळलेच नाही. मार्च महिन्याची सुरुवात झाली आणि जवळपास सर्वच विषयांचा अभ्यासक्रम देखील शाळेमध्ये शिकवून झालेला होता. त्यामुळे आता सर्वच विद्यार्थांना वेध लागले होते ते म्हणजे द्वितीय सत्र परीक्षेचे. कारण या परीक्षेनंतर सर्वांनाच उन्हाळी सुट्या मिळणार होत्या.
मी पण याच विचारात होतो की द्वितीय सत्र परीक्षा कधी चालू होतील आणि अचानक वर्गामध्ये सूचना आली की मार्च महिन्याच्या 26 तारखेपासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होणार आहेत. तसे मॅडमने फळ्यावर परीक्षेचे वेळापत्रक ही लिहून दिले. मी पटकन वेळापत्रक माझ्या वही मध्ये लिहून घेतले आणि परीक्षेच्या तयारी बाबत मित्रांसोबत चर्चा सुरू केली.
परीक्षा सुरू होणार म्हटल्यावर वर्गातील सर्वच मुले झपाटून अभ्यासला लागली आणि मी पण सकाळी लवकर उठून नियमित प्रश्न उत्तरे पाठ करायला सुरुवात केली. पण अश्यातच करोना रोगाचे रुग्ण भारत देशात आढळून आल्याची बातमी मी टीव्हीवर पहिली.
या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आमच्या शाळेने सात दिवसांची सुट्टी जाहीर केली. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप खुश झालो. पण रुग्णांची संख्या सारखी वाढतच होती आणि यामुळे खूप लोक मरणही पावत होती त्यामुळे आमच्या द्वितीय सत्र परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि सर्व विद्यार्थांना पुढच्या वर्गासाठी पास करण्यात आले.
जून महिना उजाडला तरीही करोणा रोगाचा प्रभाव काही कमी होईना त्यामुळे सर्वच शाळांनी ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 15 जून पासून आमची पहिली ऑनलाईन शाळा सुरू झाली. हि माझ्या आयुष्यातील पहिलीच ऑनलाईन शाळा होती त्यामुळे मी खूप उत्साही होतो.
शाळेची जाण्याची, मित्र मैत्रिणीशी परत भेटण्याची मनामध्ये ओढ होती. सकाळी ठीक दहा वाजता मोबाईल वर शाळेची लिंक येणार होती त्यामुळे मी शाळेचा गणवेश परिधान करून आणि शाळेचे दप्तर घेऊन तयार होतो. जशी लिंक आली तशी सर्व मुले लिंक वर क्लिक करून ऑनलाईन शाळेत जॉईन व्हायला लागली, मी पण पटकन लिंक वर क्लिक केले आणि जॉईन झालो.
त्यानंतर मला माझे शाळेतील सर्व मित्र त्यांच्या घरून जॉईन झालेली दिसू लागली आणि लगेच आमच्या सरांनी ऑनलाईन शाळेबद्दल सूचना द्यायला सुरुवात केली. हा ऑनलाईन शाळेचा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी नवीन असल्यामुळे पहिल्या दिवशी सर्वांचीच धांदल उडाली. आवाज बंद करणे, व्हिडिओ बंद / चालू करणे यासाठी सर्वांनाच अडचणी आल्या.
ऑनलाईन शाळेचा हा माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे ही शाळा मला नियमित ऑफलाईन शाळेपेक्षा खूपच वेगळी वाटली. यात नियमित शाळेप्रमाणे बसायला बेंच नव्हती पण मी माझ्या मित्रांना मोबाइलच्या स्क्रीनवर नक्कीच पाहू शकत होतो. या ऑनलाईन शाळेत मी मित्रांसोबत गप्पा मारू शकत नव्हतो, धिंगा मस्ती करू शकत नव्हतो पण दुपारी जेवणाचा ब्रेक मात्र या शाळेत देखील होता.
ऑनलाईन शाळेचे फायदे आणि तोटे निबंध | Online school advantages and disadvantages essay in marathi in 700 words
ऑनलाइन शाळा, ज्यांना व्हर्च्युअल शाळा किंवा ई-लर्निंग म्हणूनही ओळखले जाते, या अलीकडच्या काळात अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वाढीमुळे, आता विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या आरामात उच्च दर्जाचे शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या निबंधात, आम्ही ऑनलाइन शाळांचे फायदे आणि तोटे लिहून दिलेले आहेत.
ऑनलाइन शाळांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांनी ऑफर केलेली लवचिकता म्हणजेच वेळेचे कुठलेही बंधन नाही. विद्यार्थी स्वतःच्या गतीने आणि त्यांच्या स्वत:च्या वेळापत्रकानुसार शिकू शकतात, वैयक्तिकरित्या वर्गात उपस्थित राहण्याची गरज नाही.
ज्यांच्याकडे काम किंवा कौटुंबिक जबाबदारी आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. ऑनलाइन शाळा पारंपारिक शाळांपेक्षा विस्तृत अभ्यासक्रम देखील घेतात, कारण विद्यार्थी इंटरनेट कनेक्शनसह कोणत्याही ठिकाणाहून वर्गात जॉईन होऊ शकतात.
ऑनलाइन शाळांचा आणखी एक फायदा म्हणजे ते पारंपारिक शाळांपेक्षा अधिक परवडणारे असू शकतात. ऑनलाइन शाळांसाठीचे शिक्षण शुल्क पारंपारिक शाळांपेक्षा कमी असते आणि विद्यार्थ्यांना वाहतूक किंवा निवास यासारख्या अतिरिक्त खर्चाची काळजी करण्याची गरज नसते.
सामाजिक चिंता किंवा इतर मानसिक आरोग्य समस्यांशी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शाळा देखील फायदेशीर ठरू शकतात. घरबसल्या शिकून, विद्यार्थी पारंपारिक शाळांमध्ये कधीकधी उद्भवू शकणारे सामाजिक दबाव आणि विचलित करणारे प्रकार टाळू शकतात. याव्यतिरिक्त, ऑनलाइन शाळा बर्याचदा मानसिक आरोग्य समुपदेशन आणि शैक्षणिक शिकवणी यासारख्या समर्थन सेवांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेश प्रदान करतात.
मात्र, ऑनलाइन शाळांचे काही तोटेही आहेत. शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांशी समोरासमोर संवाद नसणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्या कामावर वैयक्तिक अभिप्राय मिळवणे अधिक कठीण होऊ शकते. यामुळे शिकणार्या समुदायापासून अलिप्तपणाची आणि वियोगाची भावना देखील होऊ शकते.
ऑनलाइन शाळांचा आणखी एक तोटा असा आहे की त्यांना उच्च प्रमाणात स्वयं-शिस्त आणि प्रेरणा आवश्यक आहे. पारंपारिक वर्गाची रचना आणि उत्तरदायित्वाशिवाय, विद्यार्थ्यांसाठी मागे पडणे किंवा त्यांच्या अभ्यासक्रमातील रस गमावणे सोपे होऊ शकते. ऑनलाइन शाळांना विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या असाइनमेंटसह ट्रॅकवर राहण्यासाठी सक्रिय असणे आवश्यक आहे.
शेवटी, ऑनलाइन शाळांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. ते लवचिकता, परवडणारी क्षमता आणि अभ्यासक्रम आणि समर्थन सेवांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेश देतात. तथापि, त्यांना स्वयं-शिस्त देखील आवश्यक आहे. शेवटी, ऑनलाइन शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय वैयक्तिक गरजा आणि परिस्थितींवर आधारित असावा आणि विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्यापूर्वी फायदा आणि नुकसान याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.