Essay on tiger in marathi माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध : सिंह हा जर जंगलाचा राजा असला तरी वाघ या प्राण्याची देखील तेवढीच दहशत आहे. सिंह या प्राण्याप्रमानेच वाघ देखील जंगलावर आपले आधिराज्य गाजवतो. वाघ हा एक मांसाहारी प्राणी आहे जो हरीण, लांडगा, रानमहैस या सारख्या जंगली प्राण्यांची शिकार करून आपली भूक भागवत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे वाघ हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
आजच्या या पोस्टमध्ये माझा आवडता प्राणी वाघ या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात वाघ या प्राण्यांचे संपूर्ण वर्णन, त्याचा दिनक्रम, त्याचे अन्न, निवारा याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत.
माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध १०० शब्दात | essay on tiger in marathi in 100 words
वाघ हा माझा आवडता प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सिंह जंगलाचा राजा जरी असला तरीही मला वाघाच जंगलाचा राजा वाटतो. वाघाची ताकद सिंह पेक्षा जास्त असेल असे मला वाटते. वाघ हा मांसाहारी प्राणी आहे जो हरीण, लांडगा यासारख्या भक्ष्य प्राण्यावर अन्नासाठी अवलंबून असतो.. वाघाला दोन कान , चार पाय , एक शेपूट असते.
वाघा चा रंग पिवळा आणि तपकिरी रंगाचे मिश्रण असतो आणि त्याच्या शरीरावर काळे पट्टे देखील असतात. त्याच्या या रंगामुळे वाघ खूप उठून दिसतो. त्यामुळे वाघ हा हिंसक प्राणी जरी असला तरी तो सर्वांना आवडतो. आपल्या देशात तसेच इतर अनेक देशात वाघाच्या अनेक प्रजाती आढळतात.
परंतु आज वाघाच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वाघ या प्राण्याला संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने अनेक मोहीम राबवल्या आहेत. वाघाच्या शिकारीवर देखील बंधी घालण्यात आलेली आहे. आज पांढऱ्या रंगाचे वाघ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांची प्राणी संग्रालयात वन्य अधिकाऱ्यांच्या नजरेत विशेष काळजी घेतली जाते. वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे त्यामुळे त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे.
माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध ३०० शब्दात | essay on tiger in marathi in 300 words
आपल्या निसर्गात विविध प्राणी आढळतात . पण वाघ हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. वाघ हा प्राणी मांजरीच्या कुळातील आहे. तो मांजरी सारखा दिसतो. त्यामुळे अनेक वेळा मांजरीला वाघाची मावशी म्हणून देखील उल्लेख केला जातो. वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. तो हत्ती आणि सिंहाला सोडून बाकी सगळे प्राण्यांची शिकार करतो. त्याचा लांबलचक जबडा आणि अत्यंत अनखुचीदार सुळ्यासारखे दात त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वाघ एका झडपितच कोणत्याही प्राण्याला आपल्या जबड्यात पकडतो.
वाघ हा आपल्या पर्यावरणातील निसर्ग साखळीचा खूप महत्वाचा भाग आहे. तो इतर प्राण्यांची शिकार करून पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यास मदत करतो. जंगलातील इतर सर्व प्राणी वाघाला घाबरतात. वाघाचे एका डरकाळीने संपूर्ण जंगल हादरते असे म्हणतात. मादी वाघ एका वेळेस आपल्या चार ते पाच पिल्लांना जन्म देते. वाघाच्या पिल्लांना बछडा असे म्हणतात.
वाघ हा प्राणी कधीही समूह करून राहत नाही. तो एकटा शिकार करतो. वाघाच्या शरीरात लांबून शिकार करण्याची क्षमता असते. ज्या प्राणावर वाघाची नजर पडते वाघ त्या प्राण्याची शिकार करतो. वाघ या प्राण्याची पाहण्याची, ऊर्जा क्षमता अत्यंत तीक्ष्ण असते. त्यामुळे वाघ आपली शिकार सहज पकडतो. त्याचे शरीर खूप जड असते.
भारतात वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून सन्मानित केले आहे. हा सर्वात शक्तिशाली आणि आकर्षक प्राणी म्हणून ओळखला जातो . तो घनदाट जंगलात राहतो. वाघाचे जीवन सामान्यतः वीस वर्ष असते तसेच काही मादा वाघ तीस ते पस्तीस वर्षे देखील जगू शकतात. वाघ हा शूरवीर आणि बलाड्यप्राणी आसून आजच्या काळात वाघ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी भारत सरकारने अनेक मोहिमा राबवल्या आहेत.
माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध ५०० शब्दात | essay on tiger in marathi in 500 words
वाघाला इंग्लिश मध्ये टायगर असे म्हणतात. हा प्राणी खूप चपळ असून तो ताशी 65 किलोमीटरच्या वेगाने पळतो. झाडावर खूप जोरात चढतो. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वाघाला खुप महत्वाचा स्थान दिले आहे. वाघाची शिकार न करता वाघांची प्रगती करणे, त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
“प्रोजेक्टर टायगर” हे भारत सरकारने राबवलेली मोहीम आहे. भारतातील वाघांची संख्या वाढवणे आणि टिकून ठेवण्यासाठी तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी ही मोहिमा सुरू केली होती. तसेच वाघाच्या संरक्षणासाठी इतर अनेक मोहिमा देखील कार्यरत आहेत. वाघ जिभेने पाणी पिणारा प्राणी आहे. सांबर हरन वाघाचे आवडते खाद्य असून डुक्कर, हरीण, चितळ यांची सुद्धा शिकार वाघ करतो. वाघ हा प्राणी पाठी मागून शिकार करतो.
निसर्गात वाघ आहेत म्हणून जैविक विविधता सुखात नांदत आहे. वाघाचे अस्तित्व हे निसर्गासाठी नाही तर संपूर्ण जंगलासाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाघाची संख्या कमी होत चालली आहेत. याचे प्रमुख कारणे म्हणजे शिकार करणे, वृक्षतोड करणे, वाढत्या शहरीकरना मुळे जंगल तोड इत्यादी. त्यामुळे वाघांचे निवासस्थान असणारी जंगले संपुष्टात आली आहेत.
प्राणी संग्रहालयात वाघाचे संगोपन केले जाते. जंगलाचे वैभव ,जंगलाची शान ,जंगलाचे प्रतीक म्हणजे वाघ आहे. वाघाच्या ऐकून संखेपैकी 70 टक्के वाघ भारतात आढळतात. म्हणून भारताला वाघाचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. वाघाचा पंजा आणि जबडा खूपच ताकदवान असतो. जबड्यातील सुळे आणि दातांच्या सहाय्याने तो शिकार पकडतो. जास्त करून वाघ रात्री शिकार करतो. वाघाचा आवाजाला डरकाळी म्हणतात. हि डरकाळी तीन किलोमीटर पर्यंत जाते.