भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock in marathi)

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock in marathi) :- सर्व पक्ष्यांमध्ये सुंदर पक्षी, पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे मोर. मोर हा पक्षी खूपच सुंदर आणि मोहक स्वरूपाचा आहे. याला जो कुणी पाहेल तो मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही.

आजच्या पोस्टमध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोर बद्दल माहिती ( essay on peacock in marathi ) पाहणार आहोत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला मोर या पक्षाचे संपूर्ण वर्णन आणि माहिती निबंधाच्या माध्यमातून सांगणार आहे.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर १० ओळीचा निबंध ( 10 lines on peacock in marathi )

१) मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

२) मोर हा शांतता आणि सौंदर्य यांचे प्रतिक आहे तसेच तो भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे.

३) त्यामुळे २६ जानेवारी १९६३ रोजी भारत सरकार द्वारे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.

४) मोर हा पक्षी सर्व पक्षात खूपच सुंदर आहे त्यामुळे त्याला पक्षांचा राजा असे देखील म्हटले जाते.

५) मोर हा नर पक्षी आहे. मोराच्या मादेला ‘ लांडोर ‘ असे म्हटले जाते.

६) मोराचे आयुष्य जवळपास २० ते २५ वर्षांचे असते आणि त्याचे वजन ३ ते ५ किलोच्या दरम्यान असते.

६) मोर हा पक्षी भारतभर जवळपास सर्वत्र आढळून येतो. हा पक्षी बहुदा दऱ्या खोऱ्याचा परिसर, नदीकाठी दाट झाडीत, आणि राना वणात आढळून येतो.

७) साप, विविध प्रकारचे कीटक, शेतातील दवणे हे मोराचे मुख्य अन्न आहे. तसेच मोर मंसहराबरोबरच अन्नधान्य देखील खातो.

८) कोल्हा, रानमांजर यासारख्या त्याच्या शत्रू पासून बचाव करण्यासाठी तो उंच झाडावर निवास करतो.

९) मोराच्या पाठीवर विविध रंग छटानी नटलेला पिसारा असतो. हा पिसारा जवळपास २०० ते २५० सेमी लांब असतो.

१०) मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडते वेळेस मोर आपला पिसारा फुलवून सुंदर नृत्य करतो त्याला मयुरनृत्य असे म्हटले जाते.

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध ( essay on peacock in marathi ) [ 300 words ]

Essay on peacock in marathi
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर

मला पक्षी खूप आवडतात. मला रानावनात हिंडून विविध पक्षी पाहणे आणि त्यांच्या सानिध्यात राहणे खूपच जास्त आवडते. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या गावाकडे गेल्यानंतर दररोज शेतात जाण्याचा दिनक्रम ठरवतो. शेतात गेल्यानंतर मी रानावनात राहणाऱ्या पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न याची व्यवस्था करतो. त्यासाठी मी पाण्याने भरलेले डबके झाडाच्या फांदीला अडकवून ठेवतो आणि झाडाच्या बुंध्यावर अन्न ठेवतो.

तसे तर मला सर्वच पक्षी आवडतात. पण मोर हा पक्षी मला सर्वाधिक जास्त आवडतो. मोर हा पक्षी मला आवडण्याचे कारण म्हणजे त्याचा रंगीबेरंगी पिसारा. मोराचा विविध रंग छटाणी नटलेला पिसारा मला खूपच मोहक वाटतो. मी सुट्टीत गावाकडे शेतात गेल्यानंतर रानावनात हिंडून मोराचे पीस गोळा करणे हा माझा नेहमीचा उपक्रम असे. मी हे मोराचे पीस गोळा करून माझ्याकडे संग्रहित करून ठेवतो.

मोराच्या पाठीवर मोराचा सुंदर पिसारा असतो त्यात १०० – १५० मोराचे पीस असतात. मोराचे हे पीस हळूहळू गळायला लागतात व त्याच बरोबर मोराला नवीन पीस देखील फुटत असतात. मोराच्या पिसाच्या टोकाला डोळ्यासारखा आकार असतो. त्याच्या आजू बाजूचा परिसर काळया, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंग छटानी नटलेला असतो.

त्याचा हा पिसारा फुल्यानंतर तर आणखीनच उठून दिसतो. मोर पावसाळा ऋतूमध्ये नृत्य करतात. मृग नक्षत्राच्या पावसाच्या वेळी मोर पिसारा फुलवून नृत्य करतात. त्यांच्या या नृत्याला ‘ मयुरनृत्य ‘ असे म्हटले जाते. मोर ना हा प्रसंग खूपच सुंदर डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो.

मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. हा तुरा देखील मोराच्या सुंदरतेत भर पाडतो. मोराची मान उंच आणि लांब लचक असते आणि ती निळ्या रंगाची असते. त्यामुळे मोराला ‘ नीलकंठ ‘ असे देखील म्हणतात.

संपूर्ण मोर जरी सुंदर आणि मोहक असला तरी त्याचे पाय मात्र कुरूप असतात. पण त्याचे कुरूप दिसणारे हे पायच त्याला अनेक संकटातून वाचवतात.

मोर हा बहुदा जमिनीवर राहणारा पक्षी आहे. त्याला पंख जरी असले तरी उंच आकाशात भरारी घेऊ शकत नाही. त्याचे वजन आणि मोठा आकार यामुळे तो फक्त काही अंतर उंच उडू शकतो. तो इतर प्रण्याप्रमाने हवेत तरंगत देखील राहू शकत नाही. त्यामुळे मोर हे बहुदा रानावनात हिंडताना च दिसून येतात.

मोर हा हवेत केवळ २० ते २५ फूट उंच उडू शकतो. तो त्याच्या शत्रू पक्षी आणि प्राण्यांपासून वाचण्यासाठी उंच झाडावर निवास करतो.

मोर हा नेहमी झुंड करून राहतो. त्याच्या गटामध्ये १-२ मोर आणि ३-५ लांडोर असतात. ते एकत्र अन्न धान्याच्या शोधात बाहेर पडतात. साप, कीटक, रानावनात आढळणारे किडे हे मोराचे मुख्य खाद्य आहे. या बरोबरच तो अन्नधान्य देखील खातो.

भारताचा राष्ट्रीय पक्षी असणारा मोर हा पक्षी मला खूप खूप आवडतो.

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध (essay on peacock in marathi) [ 500 words ]

मोर हा माझा आवडता पक्षी आहे. मला मोर हा पक्षी खूप खुप आवडतो. मोर हा पक्षी भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे. मोर हा पक्षी त्याचे सुंदर आणि मोहक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मोर हा भारताप्रमाणेच म्यानमार देशाचा देखील राष्ट्रीय पक्षी आहे.

मोर हा मोर, मयुर, नीलकंठ, सारंग, शिखी यासारख्या अनेक नावाने ओळखला जातो. मोराला इंग्रजी मध्ये peacock असे म्हणतात तर त्याला संस्कृतमध्ये ‘ मयुर ‘ असे नाव आहे. हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळून येतो. मोर हा पक्षी मुख्यतः नदी खोऱ्याच्या क्षेत्रात आणि रानावनात आढळून येतो. तसेच भारताबाहेर देखील म्यानमार, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतान यासरख्या देशात देखील मोर हा पक्षी आढळून येतो. काही देशात पांढरा रंगाचे मोर देखील आढळतात आणि ती मोराची फारच दुर्मिळ प्रजाती आहे.

मोर हा पक्षी मूळचा भारताचाच आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये देखील मोराचे अस्तित्व आढळून येते. पूर्वी अनेक राजांच्या काळातील नाण्यावर मोराचे चित्र दिसून येथे. तसेच मुघल बादशहा शहाजहान देखील मोर पिसंपासून तयार करण्यात आलेल्या राजसिंहासनावर बसायचा. विद्येची देवता असणारी सरस्वती माता आणि भगवान गणेश चा भ्राता कार्तिक यांचे वाहन देखील मयुर म्हणजे मोराच आहे.

मोरांचा पिसारा आणि त्याचा डोक्यावर असणारा तुरा मोराची शोभा वाढवतो. ज्याप्रमाणे कोंबड्याच्या डोक्यावर तुरा असतो त्याचप्रमाणे मोराच्या डोक्यावर देखील तुरा असतो. पण मोराचा तुरा हा नाजुक आणि अतिशय सुंदर असतो.

हिंदू संस्कृतीमध्ये मोराच्या पिसाला खूप जास्त महत्व आहे. मोराचे पिस पवित्र मानले जाते त्यामुळे ते अनेकवेळा देवघरात ठेवले जाते. काही लोकांना मोरपीस खुप आवडते त्यामुळे काही जण ते पुस्तकात ठेवणे देखील पसंद करतात. पूर्वी मोरपिसाची वापर लिखाण करण्यासाठी केला जायचा.

मोर हा पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. मी पहिल्यांदा मोर शाळेत असताना पहिला होता. मी इयत्ता सातवी मध्ये असताना आमच्या शाळेची सहल रायगड जल्ह्यामधील कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी आम्ही सर्वांनी एका गाडीमध्ये बसून कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहिले होते.

त्यावेळी आमच्या सोबत एक टुरिस्ट गाईड देखील होता. जो की आम्हाला अभयारण्यातील प्रत्येक पक्षी आणि प्राण्याबद्दल माहिती देत होता. त्यावेळेस सायंकाळी अभयारण्यातून बाहेर पडते वेळेस आम्ही एक मोरांचा गट पहिला. त्यातील एक मोर सायंकाळच्या वेळी पसारा फुलवून खूपच सुंदर नृत्य करत होता. तो प्रसंग पाहून मन खूपच उल्हासत झाले.

बघता क्षणी तो क्षण माझ्या डोळ्यात साठवून गेला. आजही तो मोराचा नृत्य आठवला की संपूर्ण प्रसंग माझ्या डोळ्या समोर येतो आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते. आम्हाला गाईड कडून माहिती मिळाली की असे मोराचे नृत्य पावसाळा ऋतूमध्ये खूप पाहायला मिळतात, इतर ऋतूमध्ये असे क्षण क्वचितच पाहायला मिळतात. मोर मादीला उल्हासित करण्यासाठी अशा प्रकारचा नृत्य करत असतात.

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याच्या संरक्षणासाठी भारत सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मोराला मारणे कायद्याने गुन्हा आहे, असे केले तर जेलमध्ये देखील जावे लागू शकते. तसेच एक भारतीय नागरिक या नात्याने आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

मी पहिल्यांदा पाहिलेला मोर मला अजूनही आठवतो. मला नृत्य करणारा मोर पाहायला खूप खूप आवडतो.

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आपण माझा आवडता पक्षी मोर किंवा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध (essay on peacock in marathi) यावर निबंध पहिला. मी या निबंध मार्फत तुम्हाला मोर या पक्षाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला.

मोर मराठी निबंध (peacock marathi nibandh) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा निबंध तुम्ही इयत्ता पाहिले पासून ते बारावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता. तुम्हाला जर इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, धन्यवाद…!!!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

Leave a Comment