मृदा प्रदूषण मराठी निबंध | Soil pollution essay in marathi

Soil pollution essay in marathi मृदा प्रदुषण मराठी निबंध : मृदा म्हणजेच माती हा एक पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे हवा आणि पाण्याचे मानवी जीवनात खूप महत्व आहे त्याप्रमाणेच मृदा देखील मानवासाठी खूप महत्वाची आहे. कारण या मृदेमध्येच झाडे उगवतात आणि मानवासाठी अन्न निर्मिती करतात. शेतीसाठी सुपीक जमीन खूप आवश्यक आहे. पण आज मृदा प्रदूषणामुळे जमीन नापीक आणि ओसाड होत चालल्या आहेत. यातून अन्न संकट उद्भवू शकते. त्यामुळे आज मृदा प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय योजना करणे खूप गरजेचे आहे.

आजच्या या पोस्टमध्ये मृदा प्रदुषण मराठी निबंध soil pollution essay in marathi लिहून दिलेला आहे. या निबंधातून मृदा प्रदुषण, मृदा प्रदूषणाची कारणे, मृदा प्रदुषण कमी करण्यासाठी उपाय, मातीची धूप यासारख्या विषयावर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा निबंध सर्व विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.

मृदा प्रदूषण मराठी निबंध १०० शब्दात | Soil pollution essay in marathi in 100 words

मृदा प्रदूषण म्हणजे जमीन किंवा माती मधील काही आवश्यक घटक नाहीसे होऊन ती नापीक बनणे. आज अनेक कारणाने मृदा प्रदूषण होत आहे. आपल्या पर्यावरणातील हवा आणि पाणी यांच्यासोबत जमीन हा देखील एक उपयुक्त घटक आहे. आपण जे अन्न खातो त्याची निर्मिती मतीमधून च होते, मतीमधूनच झाडांना वनस्पतींना वाढीसाठी व अन्न निर्मितीसाठी आवश्यक असणारे मूलद्रव्य मिळतात. त्यामुळे मृदा म्हणजेच माती देखील पर्यावरणातील खूप आवश्यक घटक आहे.

शेतीमध्ये जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर केला जातो हा देखील मृदा प्रदुषण करणारा महत्वाचा मुद्दा आहे. रासायनिक खतातील विषारी रसायने मृदेतील अनेक झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जीव जंतूंना मारून टाकतात. त्यामुळे मृदा प्रदुषण रोखणे खूप गरजेचे आहे.

मृदा प्रदूषण मराठी निबंध २०० शब्दात | Soil pollution essay in marathi in 200 words

वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होत चालली आहे. हे देखील मृदा प्रदूषणाचे एक कारण आहे. आपण मातीमध्ये धान्य पिकवतो. मातीत अनेक झाडे झुडपे, गवत उगवते आणि झाडांमुळीच आपण ऑक्सिजन वापरू शकतो. त्यामुळे पाणी आणि हवे प्रमाणेच मृदा देखील मानवासाठी पर्यावरणातील एक महत्वाचा घटक आहे. पण मृदा प्रदूषणामुळे माती खारट, आणि कडक होत आहे.

मृदा सुपीक व निरोगी राहण्यासाठी शेणखताचा आणि सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे. भूपृष्ठ भागातील खडकाची झीज होऊन त्यापासून माती तयार होते. त्यापासून मातीची भांडी, विटा, मातीची खेळणी अशा अनेक वस्तू तयार होतात. मृदा प्रदूषण है नैसर्गिक कारणांमुळे होते. तर काही मनुष्य कृत्यामुळे मुळे देखील होते. केमिकल जमिनीमध्ये मिसळल्यामुळे जमिनीमध्ये आवश्यक असणारे जिवाणूंचा नाश होतो.

माती आणेक कामासाठी वापरली जाते. विषारी रसायने माती प्रदूषित करतात आणि माती मद्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करू शकतात. कीटकनाशके आणि बुरशी यांचा जमिनीवर घातक परिणाम होतो. मृदा प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काही उपाय केले पाहिजे. मृदा प्रदूषण हे सुपीक आणि नापीक या दोन्ही भागांवर होते.

मृदा प्रदूषण मराठी निबंध ३०० शब्दात | Soil pollution essay in marathi in 300 words

आज मृदा प्रदुषण हे एक सर्व मनुष्याला आव्हान आहे. जमिनीची नापिकता हे एक खूप मोठे संकट आहे. पूर्वीच्या काळात शेतीमध्ये कोणत्याही खताचा वापर न करता शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन निघायचे. आता वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची जास्त मागणी असल्यामुळे शेतकरी शेतामध्ये अनेक प्रकारचे खते आणि फवारणी साठी औषधे वापरू लागला आहे.

यामुळे अन्नाचे उत्पादन वाढले आहे परंतु अन्नाची गुणवत्ता मात्र नक्कीच कमी झाली आहे. तसेच यातूनच मृदा प्रदुषण सारखी नवी समस्या देखील निर्माण झाली आहे. विषारी घटक जमिनीत मिसळल्याने मृदा प्रदूषण होते. पृथ्वीवरील सजीवांना हवा आणि पाणी जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाची माती आहे. मातीची धूप ही पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होते. लोकांच्या चुकीच्या सवयी मुळे मृदा प्रदूषण वाढत आहे.

मृदा प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे .याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. वृक्षतोड न करता वृक्षांची लागवड करने आणि त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे जेणेकरून वृक्षांच्या मुळांद्वारे माती घट्ट पकडुन राहील आणि मातीची धूप फार कमी प्रमाणात होईल.

मृदा प्रदूषण मराठी निबंध ५०० शब्दात | Soil pollution essay in marathi in 500 words

मृदा प्रदूषण ही एकंदर एक नवीन उदयास आलेली समस्या आहे. जल, वायू आणि वेगवेगळ्या प्रदूषणामुळे मातीची नैसर्गिक क्षमता कमी होत असताना दिसून येत आहे. यामुळे जमीन नापीक होऊन जमिनीचे वाळवंटात रूपांतर होताना दिसून येत आहे. मृदा प्रदूषणास अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यामध्ये मातीची धूप हा एक सर्वात महत्वाचा घटक मानला जाऊ शकतो.

कारण मातीची धूप झाल्याने शेतीयोग्य जमीन कमी होत आहे. खडकातील मुळ गुणधर्म हे मातीमध्ये आढळतात. मृदेतील अनेक खनिज घटक हे पिकांच्या आणि वनस्पतीचा वाडीला पोषक असतात. पिकांच्या अन्न निर्मितीसाठी लागणारे सर्व आवश्यक खनिजे मतिमधून च मिळतात तसेच पिकांना लागणारे पाणी देखील झाडांची मुळे मतीतूनाच शोषून घेतात.

शेतामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्यास देखील मृदा प्रदुषण होते कारण यामुळे मातीतील आवश्यक घटक कमी होऊन जमीन खारावते. कारखान्यातून केमिकल युक्त पाणी बाहेर सोडले जाते तेव्हा त्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही. यामुळे मृदा प्रदूषण होते. योग्य हवामान उपलब्ध असेल तर ही खनिज घटक युक्त मृदा पिकांचा, वनस्पतींच्या वाढीला अतिशय उपयुक्त असते.

मृदेचे नैसर्गिक गुणधर्म व अनेक उपयोग आहेत. वस्त्यांमधून कचरा गोळा करून कुठे तरी तो जमिनीमध्ये पुरला जातो. तसेच काही वेळा एका ठिकाणी गोळा केलेला कचरा नंतर जाळून टाकतात यातून मृदा प्रदुषण आणि हवा प्रदुषण मोठ्या प्रमाणावर होते. यासारख्या अनेक मानवी कृत्यामुळे आज मृदा प्रदुषण होताना दिसून येत आहे.

मृदा प्रदूषण भागात जी पीके व गवत उगवते. त्याच्या आहारातून विषारी द्रव्य पोटात गेल्याने अनेक पक्षी व प्राणी मृत पावतात. प्रदूषित मृदेमध्ये पिकलेले अन्न देखील मानवी आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम करणारे असते कारण त्यात मृदेतिल अनेक विषारी घातक पाण्याद्वारे पिकांच्या आत मिसळतात.

त्यामुळे आज मृदा प्रदुषण रोखणे अत्यंत महत्वाचे आहे. मृदा प्रदुषण नियंत्रनात आणण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून वृक्षांची लागवड करने गरजेचे आहे जेणेकरून मातीची धूप होणार नाही. शेतीमध्ये जास्तीत जास्ती सेंद्रिय खतांचा उपयोग करणे आवश्यक आहे.

तसेच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी द्रव्याची योग्य विल्हेवाट लावायला हवी. घाण कचऱ्याछा पुनर्वापर करणे आणि शक्य तितक्या लोकानी वृक्ष लागवड केली पाहिजे. हे सर्व उपाय आमलात आणले तर नक्कीच मृदा प्रदुषण नियंत्रनात येऊ शकते.

Leave a Comment