भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध | Essay on Indian farming in marathi

Essay on Indian farming in marathi भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध, भारतीय शेतीवर निबंध : भारताची शेती हा मुख्य व्यवसाय आहे. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. भारत देशांत अनेक पीक घेतले जातात. कापूस ,ज्वारी ,बाजरी ,गहू, मका,सोयाबीन यासारखी अनेक पीके भारतातील शेतकरी घेतो. आपल्या देशातील आर्थिक उत्पन्नात आणि राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचे खूप महत्त्व आहे.

आजच्या या पोस्टमध्ये भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध भारतीय शेती व्यवस्था, भारतीय शेती व्यवस्थेचे प्रकार, भारतीय शेती यासारख्या विषयावर वापरला जाऊ शकतो. या निबंधातून भारतीय शेती व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.

भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध १०० शब्दात | Essay on Indian farming in marathi in 100 words

भारत देशात अनेक व्यवसाय केले जातात पण शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. याच व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या राज्यव्यवस्थेला प्राप्त होते. त्यामुळेच शेती या व्यवसायाला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते. भारत हा आशिया खंडातील मुख्य अन्नधान्य उत्पादक देश आहे. भारत देशातून बराचसा शेतीमधील कच्चा माल आणि अन्नधान्य हा युरोपीय देशात निर्यात केला जातो.

आपल्या भारत देशात तीन ऋतू आहेत. यामुळे शेतीची भूरचना हे सतत बदलत असते. बागायती शेती हा एक मुख्य प्रकार आहे. शेतीमध्ये अनेक अवजारे किंवा यंत्रे वापरले जातात. ट्रॅक्टर, नांगर, मळणी यंत्र यांहुन अनेक यंत्रे चालवले जातात. शेतीमध्ये अनेक प्रकारची खतही वापरली जात आहेत. गांडूळ खत, शेण खत, युरिया, सुफला १५-१५-१५ असे अनेक खत वापरतात.

भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध २०० शब्दात | Essay on Indian farming in marathi in 200 words

महाराष्ट्र मध्ये अनेक प्रकारच्या फळांची शेती केली जाते. संत्री, आंबा, चिकू, केळी, मोसंबी, लिंबू यापेक्षा अनेक फळांचे उत्पन्न घेतली जाते. बागायती शेती हा शेतीचा एक मुख्य प्रकार आहे. फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो म्हणून फुल शेती केली जाते. शेतीमध्ये घेतली जाणारी भाजीपाल्याचे पीक हे नाशवंत स्वरूपाचे असल्याने भाजीपाल्याला लवकर विक्रीसाठी नेणे गरजेचे असते.

वाहतुकीची सोय असल्यास ही उत्पादने घेतली जातात. भारतातील शेतकरी आपल्या जमिनीला काळी मानतो आणि तिची जिवापाड सेवा करतो. शेतीवर संशोधन हे नेहमी झाले पाहिजे. शेती म्हणजे मातीची मशागत करून त्यामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात.

भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध ३०० शब्दात | Essay on Indian farming in marathi in 300 words

शेती अनेक प्रकारे केली जाते . आपले जीवनी हे अण्ण वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टींवर अवलंबुन आहे. या तिन्ही गोष्टी शेतीतून निर्माण होतात. शेतीची अवजारे हे लाकडापासून बनवले जातात. खेड्यात सुतार व लोहार यासारखे बलुतेदार अवजारे दुरुस्त करतात . शेतीत अवजारे ओढण्यासाठी बैलांचा उपयोग केला जातो.

शेतीमुळे जंगल तोड होत आहे . जंगल तोडून लोक त्या जागी शेती करू लागले. शेताही कधीच संपत नाही. पावसाळ्यात चांगला शेतकरी पेरणी करतो. शेती हा एक प्रकार नसून ती उत्पन्न काढण्याची पद्धत आहे. शेती करण्यासाठी जमीन, पाणी आणि मनुष्यबळ या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

आता चांगले बियाणे आणि किटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्यामुळ आपण अधिक धान्य पिकवू शकतो. आताच्या कृत्रिम बियानामुळे आणि रासायनिक खतांमुळे शेतीतील उत्पादन खूप प्रमाणात वाढले आहे. पण रासायनिक खते आणि कीटनाशके यामुळे अन्नधान्याची गुणवत्ता मात्र कमी झाली आहे.

भारतीय शेती व्यवस्थेवर निबंध ५०० शब्दात | Essay on Indian farming in marathi in 500 words

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायाशी संबंधित आहेत. काही लोक शेती हा व्यवसाय करतात तर काही लोक शेतीतून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ, वस्तू तयार करण्याचा व्यवसाय करतात. भारत देशात व्यवसायाचे तीन स्थर आहेत प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय.

शेती हा भारत देशातील एक प्राथमिक व्यवसाय आहे. यात मजुरांची संख्या जास्त लागते शिवाय मेहनत देखील जास्त करावी लागते. शेती हा प्राथमिक व्यवसाय असून यातून मेहनतीच्या तुलनेत हवा तसा मोबदला मिळत नाही. यास अनेक घटक कारणीभूत आहेत. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतीमालाला मिळणारा भाव.

परंतु भारत देशात शेतातील मिळणाऱ्या कच्चा मालाला कधीही हमीभाव मिळत नाही, हे खूप मोठे दुर्दैव आहे! त्यामुळेच भारत हा देश कृषीप्रधान असला तरी भारतातील शेतकरी मात्र अजूनही समृध्द बनला नाही, तो अजूनही हलाखीच्या परिस्थितीत आहे.

भारतीय शेती व्यवसाय हा कच्चा मालाचा उत्तम स्रोत आहे. यातून कापूस, सोयाबीन, ऊस यासारखे व्याव्हारिक पिके घेतली जातात. यातूनच कापूस गिरण्या, सोयाबीन पासून तेल बनवणाऱ्या कंपन्या आणि ऊस कारखाने यांना कच्चा माल मिळतो. भारतातील मुख्य व्यवसाय शेती असल्याने येथील बराचसा कच्चा माल चीन, अमेरिका, रशिया सारख्या देशात निर्यात देखील केला जातो.

Leave a Comment