वायु प्रदूषण मराठी निबंध | Air pollution essay in marathi

Air pollution essay in marathi हवा प्रदुषण मराठी निबंध : आज पृथ्वीवरील पर्यावरण अनेक प्रदूषणाने जडलेले आहे. प्रदुषण म्हणजे जणू पर्यावरणाला लागलेली एक कीड आहे ज्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा रहास होताना दिसून येत आहे. निसर्गचक्र बदललेले आहे. या सर्वांचा मानवी आरोग्यावर आणि जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यातच हवा प्रदुषण हे सध्या मानवाच्या समोरील सर्वात मोठे संकट आहे.

आजच्या या पोस्टमध्ये हवा प्रदुषण वर निबंध air pollution essay in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात हवा प्रदुषण निबंध, हवा प्रदूषणाची कारणे, हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाय योजना यासारख्या विषयावर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत.

वायु प्रदुषण मराठी निबंध १०० शब्दात | Air pollution essay in marathi in 100 words

मानवाला स्वस्थ राहण्यासाठी हवेतील ऑक्सिजन शरीरात आवश्यक आहे .प्रदूषित हवेतील विषारी वायू शरीरात जात आहेत, त्यामुळे अनेक शारीरिक आजार जडतात. पर्यावरणातील वायु प्रदूषणाचा मानवावर, पशु पक्षी यावर खूप वाईट परिणाम होतो. जेव्हा आपण श्वासोच्छ्वास घेतो तेव्हा ती प्रदूषित हवा असते ती आपल्या शरीरात आणि फुफुसात जाते.

आपल्या शरीरात पूर्ण विरघळण्यासाठी जास्त कफाची पूर्तता करते त्यामुळे आपल्याला सर्दी होते, खोखला, श्वास घ्यायला त्रास होणे व फुफुसा संबंधित अनेक आजार होतात. त्यामुळे प्रदूषित हवा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करते. त्यामुळे हवा प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वायु प्रदुषण मराठी निबंध २०० शब्दात | Air pollution essay in marathi in 200 words

जेव्हा धूळ, विषारी वायू, मोटार, गिरण्या आणि वाहने यामधून निघणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषित होते. तेव्हा त्याला आपण वायु प्रदूषण म्हणतो. वायु प्रदूषण मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. वायु प्रदूषण थांबवण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम आपण सर्वांनी जपली पाहिजे.

वायु प्रदूषणाचे वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक म्हणजे कारखाने ज्यातून खूप मोठ्या प्रमाणात दूषित हवा वातावरणात सोडली जाते आणि ही दूषित रसायनयुक्त हवा पर्यावरणातील स्वच्छ हवेत मिसळून तिला प्रदूषित करून टाकते. आपण जो श्वास घेतो ती म्हणजे हवा असते. हवा दूषित असेल तर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो शिवाय त्यापासून अनेक आजार देखील होतात. त्यामुळे हवा प्रदुषण रोखणे खूप गरजेचे आहे.

वायु प्रदुषण मराठी निबंध ३०० शब्दात | Air pollution essay in marathi in 300 words

शुद्ध व आवश्यक घटकांमध्ये दूषित आणि अशुद्ध आणि अनावश्यक असलेले घटक एकत्र मिसळले जातात. तेव्हा अशा वेळी त्याला प्रदूषण म्हणतात. प्रदुषण हे अनेक प्रकारचे असते जसे ध्वनी प्रदुषण, जल प्रदुषण, मृदा प्रदुषण, इत्यादी. पण हवामान बदलामुळे झालेल्या प्रदूषणाला वायु प्रदूषण असे म्हणतात.

हवा हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. हवा प्रदुषण हे अनेक कारणाने होते. शेतातील पिके काढून घेतल्यानंतर पिकाचा अनावश्यक उरलेला भाग जाळून टाकतात त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरापासून हवा प्रदूषित होते. पिकाला फवारणी करत असताना बारीक तुषार हवेत पसरतात, रासायनिक औषधाचे कन हवेत पसरतात त्यामुळे देखील हवा दूषित होते. या सर्व कारणांमुळे हवा प्रदूषित होते.

वायू प्रदूषणावर वेळेवर नियंत्रण नाही केले तर अनेक रोग उद्भवतील व मानवाला श्वास घेणे देखील शक्य होणार नाही. त्यामुळे हवा प्रदुषण रोखणे खूप गरजेचे आहे. जेव्हा मानवाला अग्नीचा शोध लागला आणि तो उपयोग करू लागला तेव्हापासून प्रदूषण सुरू झाले.

एका अभ्यासक्रमातून असे सिद्ध झाले आहे की पूर्वीच्या काळापेक्षा या काळामध्ये लोकांचे आयुष्य खुप कमी आहे. याचे कारण म्हणजे अपोष्टिक आहार, प्रदूषित हवा व दूषित पाणी यांमुळे मानवी जीवनचक्र विस्कटले आहे. बदलत्या वातावरणाचे कारण हे वायू प्रदूषण आहे. त्यामुळे वायू प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वायु प्रदुषण मराठी निबंध ५०० शब्दात | Air pollution essay in marathi in 500 words

मोठ्या मोठ्या शहरामध्ये उद्योगधंदे आणि कारखाने खूप जास्त प्रमाणात आहेत आणि वायू प्रदुषण हे सर्वात जास्त हे उद्योगधंदे आणि कारखाने यातून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त धुरामुळे होते. त्यामुळे शहरी भागात वायु प्रदूषण जास्त आहे. ग्रामीण भागात उद्योगधंद्यांची प्रमाण अत्यल्प आहे आणि झाडांचे प्रमाण देखील खूप जास्त असते त्यामुळे ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत प्रदुषण कमी प्रमाणत आहे.

दैनंदिन जीवनात आपल्याकडून कळत नकळत अनेक चुका होतात. त्यामुळे आपल्याकडून होईल तेवढे प्रदूषण टाळावे. फटाके फोडणे टाळावे, कचरा कचरा कुंडीतच टाकावा, कचऱ्याला जाळून त्याची विल्हेवाट लावू नये . यांसारख्या अनेक गोष्टी आपण प्रदूषण होऊ नये म्हणून टाळू शकतो.

उदाहरणात, आपण एखादी वस्तू विकत घेताना त्या वस्तूला खुप वेळा तपासून बघतो. पण आपण श्वासाच्या माध्यमातून जी हवा शरीरात घेतो ती हवा शुद्ध आहे की अशुद्ध आहे याच्याकडे लक्ष देत नाही. विज केंद्रा मधून निघणारा धूर आणि रासायनिक उद्योगांमधून तयार होणारे विषारी घटक हे हवेत सोडले जातात. आजही आपल्या भारत देशामध्ये अन्न शिजवण्यासाठी लाकडावर चालणारी चूल वापरली जाते. लाकूड जाळल्याने आपल्या निसर्गावर गंभीर परिणाम होतो.

या सर्व माध्यमातून वायू प्रदूषण होते. त्यामुळे जर भविष्यात शुद्ध हवा हवी असेल आणि मानवाचे जीवन जर वाचवायचे असेल तर आज सर्वांना वायू प्रदुषण कमी करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे कारण झाडे मोठ्या प्रमाणावर हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन सोडतात. तसेच झाडांमुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते आणि जास्त पाऊस पडण्यास मदत होते. त्यामुळे हवा प्रदुषण रोखण्यासाठी झाडे लावणे खूप गरजेचे आहे.

Leave a Comment