[15 ऑगस्ट] स्वातंत्र्य दिवस वर मराठी भाषण 2021 | best independence day speech in marathi | 15 august speech in marathi

स्वातंत्र्य दिवस वर मराठी भाषण independence day speech in marathi, 15 august speech in marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवट मधून आजादी मिळाली. आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तेंव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस हा संपूर्ण भारत देशात खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हा दिवस देशातील प्रत्येक शाळेत, कॉलेजात आणि ऑफिस मध्ये साजरा केला जातो. अशा वेळेस 15 ऑगस्ट वर मराठी भाषण स्पर्धा (15 august speech in marathi) आयोजित केल्या जातात.

जर तुम्ही देखील 15 ऑगस्ट वर भाषण किंवा स्वातंत्र्य दिवस वर भाषण (imdependence day speech in marathi) शोधत असाल तर तुम्हाला या पोस्टमध्ये स्वातंत्र्य दिवस वर भाषण independence day speech in marathi मिळणार आहे. त्यामुळे या पोस्टला शेवटपर्यंत नक्की वाचा. तसेच हे स्वातंत्र्य दिवस वर भाषण तुम्ही 15 ऑगस्ट वर भाषण (15 august speech in marathi) म्हणून देखील वापरू शकता.

स्वातंत्र्य दिवस वर मराठी भाषण 2021 | best independence day speech in marathi | 15 august speech in marathi

15 ऑगस्ट वर भाषण 100 शब्दात | 15 august speech in marathi in 100 words

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या बाल मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासमोर स्वातंत्र्य दीन वर भाषण म्हणजेच १५ ऑगस्ट वर भाषण सांगण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला. या दिवसापासूनच आपल्या देशातील इंग्रजांची सत्ता संपुष्टात येऊन भारत एक स्वतंत्र राष्ट्र बनला.

महात्मा गांधीच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आणि लोकमान्य टिळक यांच्या सारख्या जहाल मतवादी विचाराने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य पूर्वी आपल्या देशात इंग्रजांची सत्ता होती. त्यांनी भारतीय जनतेवर खूप अन्याय आणि जुलूम केले. ते भारतीय लोकांना गुलाम म्हणून वागवत आणि त्यांच्याकडून कामे करवून घेत. इंग्रज सरकार भारतीय जनते कडून अनेक कर वसूल करत असे. त्यामुळे भारतीय लोकांची खूप पिळवणूक होत असे.

पण आज आपला देश स्वतंत्र आहे. आपल्या देशात लोकशाही अस्तित्वात आहे. आपल्या देशाने स्वातंत्र्य नंतरच्या काळात खूप प्रगती केली आहे. आज आपला देश सर्वच बाबतीत आत्मनिर्भर आहे.

आपल्या देशातील संविधानाने आपल्याला सर्व मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहेत. त्यामुळे आज आपण एक शांत आणि आरामदायी आयुष्य जगू शकतो. हे सर्व शक्य झाले आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे त्यामुळे आपण नेहमीच त्यांचे आभारी आहोत.

आपल्याला देखील आज पासून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावायचा आहे. भारतातील सर्व कायदे आणि नियम यांचे पालन करून देशाच्या प्रत्येक वाईट परिस्थितीत देशाच्या सोबत उभे राहायचे आहे. हीच आपल्यासाठी सर्वात मोठी देशभक्ती आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या या पवित्र दिनी तुम्ही मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद ! जय भारत….!

स्वातंत्र्य दिन वर भाषण 300 शब्दात | independence day speech in marathi in 300 words

येथे जमलेल्या सर्व प्रौढ व्यक्तींना, आदरणीय शिक्षक आणि गुरुजनांना माझा नमस्कार ! विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण येथे का जमलो आहोत ते तर सर्वांनच माहिती असेल. आज आपल्या देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय सण आहे म्हणजेच आज आपण येथे भारत देशाचा स्वातंत्र्य दीन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत.

सर्वप्रथम येथे उपस्थित सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी तुमच्या सर्वांचाच आभारी आहे कारण तुम्ही मला आजच्या पवित्र दिनी मला विचार मांडण्याची संधी दिली.

मित्रांनो 15 ऑगस्ट हा आपला स्वतंत्र दीन आहे ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. इंग्रजांचे जाचक आणि क्रूर अत्याचार सहन करावे लागले आहेत, त्यांच्या विरुद्ध लढा दिल्यानंतर आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या खूप स्वातंत्र्य सैनिकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत.

सुरूवातीला इंग्रज लोक भारतीय किनाऱ्यावर व्यापार करण्यासाठी आले. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी सुरूवातीला अगदी माफक भावात वस्तू विकण्यास सुरुवात केली. त्यांनी हळू हळू आपला व्यापार वाढवत संपूर्ण भारत देशाची बाजारपेठ काबीज केली. त्यांनी लोकांचे विचार, रूढी परंपरा, राहणीमान यांचा अगदी जवळून अभ्यास केला.

त्यांनी व्यापार करत करत आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेत दखल देण्यास सुरुवात केली आणि एक दिवस त्यांनी संपूर्ण भारत देशावरच आपले वर्चस्व निर्माण केले. त्यांनी भारत देशातील राजवट नेस्तनाबूत करून त्याठिकाणी इंग्रजांची राजवट म्हणजेच सत्ता स्थापन केली.

त्यांनी भारतीय लोकांचे अधिकार हिरावून घेतले आणि त्यांना गुलाम बनवले. त्यांनी भारतीय लोकांवर खूप आत्याचार केले. जे लोक त्यांचे जुलमी कायदे कानुन पाळत नसत त्यांना ते फासावर चढवत असत. भारतीय लोकांचे संपूर्ण स्वातंत्र्याच त्यांनी हिरावून घेतले होते.

भारतीय लोकांना शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती शिवाय त्यांना मोकळेपणाने जीवन जगण्याचे अधिकार देखील प्राप्त नव्हते. त्यामुळे इंग्रज अधिकारी भारतीय लोकांचा खूप छळ करत असत.

इंग्रज अधिकारी भारतीय शेतकऱ्यावर केवळ व्यापारी पिके घेण्यासाठी सक्ती करत असत. त्यांच्याकडून शेतीचे विविध कर वसूल करत असत. इंग्रज भारतीय लोकांकडून शेतातील कच्चा माल अगदी कमी भावात विकत घेऊन त्यांच्या मायदेशी पाठवत असत आणि त्याच मालावर प्रक्रिया करून खूपच जास्त भावात विकत असत. त्यामुळे भारतीय जनतेची आणि शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असे.

भारत देशातील ही परिस्थिती बदलण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, पंडित नेहरू, खुदीराम बोस यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.

हा स्वातंत्र्य लढा 1857 मध्ये सुरू झाला जेंव्हा मंगल पांडे नावाच्या भारतीय सुपुत्राने इंग्रज आधिकरीला गोळी मारली. तेंव्हा पासूनच भारतातील सर्व स्वातंत्र्य चळवळींनी जोर धरला.

आज आपण जे शांत आणि सुखाचे आयुष्य जगत आहोत ते फक्त आपल्या स्वातंत्र्य सैनिकामुळे. आपल्याला गर्व आणि अभिमान असायला हवा कारण आपण एका स्वातंत्र्य राष्ट्राचे नागरिक आहोत.

शेवटी मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे स्वातंत्र्य दिवस वर भाषण (independence day speech in marathi) संपवून माझ्या विचारांना विराम देतो, धन्यवाद….!

जय हिंद ! जय भारत…..!

स्वातंत्र्य दिन वर भाषण 500 शब्दात | independence day speech in marathi in 500 words

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो ! आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूपच महत्त्वाचा आहे. आज कोणता दिवस आहे आणि आजच्या दिवसाचा इतिहास जवळपास प्रत्येकालाच माहिती आहे.

आज १५ ऑगस्ट आहे म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलो आहोत.

मित्रानो भारत देशाचा स्वातंत्र्य संग्राम खूप मोठा आहे, तो एका भाषण मध्ये सांगणे शक्य नाही. पण आज मी तुम्हाला इतिहासातील असे काही प्रसंग सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगाला नक्कीच शहारे येतील आणि तुम्ही भारत देशाचे नागरिक असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.

भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला जवळपास २०० वर्ष इंग्रज राजवटी विरुद्ध लढा द्यावा लागला. यात आपल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्राण गमवावे लागले.

कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे हा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा आणि अभिमानाचा दीन आहे. आजच्या दिनी आपल्याला सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे.

इंग्रजांविरुद्ध लढा तेंव्हा सुरू झाला जेंव्हा एक मंगल पांडे नावाच्या क्रांतिकारी युवकाने एका इंग्रज अधिकारी वर गोळी झाडली. त्याच्या या साहसी कृत्यामुळे जागोजागी इंग्रजां विरोधात उठाव झाले. याच कृत्यामुळे देशातील स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळाली. त्यामुळे भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ही गोष्ट खूप महत्वाची मानली जाते. याच दिवशी इंग्रजांविरुद्ध पहिली चिंगारी पेटली गेली.

त्यानंतर देशामध्ये जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी असे दोन गट निर्माण झाले. दोन्ही गट देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत होते. जहाल मतवादी हे हिंसक विचाराचे होते, त्यांच्या म्हणण्यानुसार इंग्रज हे सहजासहजी समजणार नाहीत त्यांच्या विरोधात हिंसक पद्धतीनेच लढा द्यावा लागेल.

पण मवाळ नेत्यांचा विचार वेगळा होता. त्यांच्या मते आपण सत्य आणि अहिंसा च्या मार्गाने देशातील जनतेला संघटित करून इंग्रजांना नमवु शकतो, त्यांना आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी भाग पाडू शकतो.

महात्मा गांधी हे मवाळ विचारांचे सर्वात महत्वाचे नेते होते. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंब करून देशातील जनतेला एकत्रित केले. सत्याग्रह करून इंग्रजांचे जुलमी आणि जाचक कायदे मोडून काढले. तुम्हाला दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह नक्कीच आठवत असेल !

लोकमान्य टिळक हे जहाल गटातील मुख्य नेता होते. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. जागोजागी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून त्यांना सलो की पळो करून सोडले.

तुम्हाला भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या भारत मातेच्या सुपुत्रांचा प्रसंग तर माहितीच असेल. यांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आणि देशासाठी हसत हसत फाशीच्या सुळावर चढले. अशा या महान भारत मातेच्या पुत्रांना माझा शतशः प्रणाम !

जहाल आणि मवाळ या दोन्ही गटांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली. त्यांच्यमुळेच आज आपला देश स्वातंत्र्य आहे, आपण शांतीने आणि आनंदाने आपले जीवन जगू शकतो. म्हणून आजचा दिवस सर्वच भारतीय नागरिकांसाठी गर्व आणि अभिमानाचा आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास अगदी अंगाला शहारे आणणारा आहे. मी इतिहासातील तुम्हाला सांगितलेले काही प्रसंग ऐकून नक्कीच तुमच्याही अंगावर काटे आले असतील. तुम्हाला आपल्या भारत मातेबद्दल नक्कीच अभिमान वाटला असेल.

तुम्ही सर्वांनी माझे स्वातंत्र्य दिवस वर भाषण independence day speech in marathi शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मी माझे दोन संपवतो, धन्यवाद…!

भारत माता की जय….!

टीप : मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला स्वातंत्र्य दिवस वर भाषण independence day speech in marathi आणि १५ ऑगस्ट वर भाषण 15 august speech in marathi या विषयावर भाषण लिहून दिलेले आहे. या पोस्टमध्ये 100 शब्दात, 200 शब्दात, 300 शब्दात, 400 शब्दात आणि 500 शब्दात निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्ही वर्ग 1,2,3,4,5,6,7,8,9,10 पर्यंत वापरू शकता.

तुम्हाला स्वातंत्र्य दीन वर भाषण independence day speech in marathi कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

Leave a Comment